अवघ्या 1,69,000 रुपयात खरेदी करा Hyundai i10, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही.
मुंबई : तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल. (bumper offer buy Hyundai i10in just rs 169000, know more about it)
कोरोना काळात आपल्याकडे स्वतःची वैयक्तिक कार असणे गरजेजे झाले आहे. जर आपण सेकंड हँड कार (Second Hand Car) विकत घेण्याचा विचार करत असाल परंतु बजेटमुळे चिंतेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार डीलबाबत माहिती देणार आहोत.
परवडणारी किंमत, मायलेज आणि फीचर्समुळे ह्युंदाय आय 10 (Hyundai i10) ही कंपनीच्या सर्वाधिक विक्री करणाऱ्या कारच्या यादीत समाविष्ट आहे. या कारची किंमत 3.79 लाखांपासून सुरू होते आणि 6.55 लाखांमध्ये ही कार खरेदी करता येते. परंतु आपण ही कार सेकंड हँड कार मार्केटमधून (Second Hand Car Market) खूपच कमी किंमतीत खरेदी करू शकता. ही कार ओएलएक्स (OLX) या वेबसाइटवर सूचीबद्ध आहे. एकंदरीत, ही एक शानदार डील आहे.
अवघ्या 1,69,000 रुपयांत खरेदी करा Hyundai i10
ही थर्ड ऑनरशिप कार असून दिल्लीच्या क्रमांकावर नोंदवलेली आहे. कारचे मेकिंग ईयर 2010 आहे आणि ती फक्त 1,69,000 रुपयांमध्ये सूचीबद्ध करण्यात आलेली आहे. अधिक माहिती मिळविण्यासाठी आपण विक्रेत्याशी संपर्क साधू शकता. वेबसाईटवर ही कार दर्शन विहार परिसरात उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं आहे.
कशी आहे कार?
वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही कार केवळ 90,000 किलोमीटरपर्यंत धावली आहे. या कारमध्ये CNG आणि पेट्रोल फ्यूल ऑप्शन उपलब्ध आहे. त्यामुळे या कारवर फार खर्च होणार नाही. कारच्या फीचर्सविषयी बोलायचे झाल्यास सेंटर लॉकिंग, पार्किंग सेन्सर, पॉवर विंडो, सोनीची म्युझिक सिस्टम, मोबाइल कॉलिंग सिस्टम, फ्लोर मॅट, सीट कव्हर, फॉग लाईट, हाय सिक्युरिटी नंबर प्लेट, रिमोट की असे अनेक फीचर्स या कारमध्ये मिळतील. कारमधील AC देखील चांगल्या स्थितीत आहे. तसेच सर्व कागदपत्रे तयार आहेत.
सध्या विक्रेत्याने या कारची किंमत केवळ 1.69 लाख रुपये ठेवली आहे, परंतु आपण विक्रेत्याशी बोलू शकता आणि ही कार अजून कमी किंमतीत खरेदी करु शकता.
महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड कार घेणार असाल तर सर्व बाजूंनी कार तपासून पाहा. कारचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. कार मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, कार आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच ही कार खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही ओएलएक्सवरुन घेतली आहे.
इतर बातम्या
टाटा समूह 60 क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर्स एअरलिफ्ट करणार, देशभर 400 ऑक्सिजन प्लांट उभारणार
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात Mahindra कंपनी मैदानात, राज्यात Oxygen on Wheels सेवा सुरु
कोरोनाविरुद्धच्या लढाईत Force Motors चा मदतीचा हात, 50 Trax Ambulance महाराष्ट्र सरकारकडे सुपूर्द
(bumper offer buy Hyundai i10in just rs 169000, know more about it)