झिरो डाऊन पेमेंटवर शानदार फीचर्सवाली मारुती स्विफ्ट खरेदी करा, जाणून घ्या कुठे मिळतेय डील

तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत.

झिरो डाऊन पेमेंटवर शानदार फीचर्सवाली मारुती स्विफ्ट खरेदी करा, जाणून घ्या कुठे मिळतेय डील
Maruti Swift
Follow us
| Updated on: Nov 06, 2021 | 3:05 PM

मुंबई : तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल. (Bumper offer buy Maruti Suzuki Swift in just rs 356000, know more about it)

भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये अनेक सेगमेंट आहेत आणि प्रत्येक सेगमेंटमध्ये वाहनांची भरपूर संख्या आहे. पण अशी काही वाहने आहेत जी लोकांना खूप आवडतात. असाच एक कारचा पर्याय म्हणजे मारुती स्विफ्ट. अगदी नवीन कंडिशनची ही कार मार्केटमध्ये 5.85 लाख रुपये (एक्स-शोरूम) या किंमतीपासून सुरू होत असली तरी आज आम्ही तुम्हाला अशा डीलबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही ही कार फक्त 3.56 लाख रुपयांमध्ये घरी आणू शकता. यासोबतच त्यावर झिरो डाउन पेमेंटचा पर्यायही देण्यात आला आहे.

स्पोर्टी डिझाईन व्यतिरिक्त, मारुती स्विफ्ट फीचर्स आणि मायलेजसाठी देखील पसंत केली जाते. कंपनीने या कारचे चार व्हेरिएंट बाजारात सादर केले आहेत. या डीलबद्दल जाणून घेण्यापूर्वी, तुम्हाला या कारच्या फीचर्स आणि मायलेजबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

मारुती स्विफ्ट एक स्पोर्टी हॅचबॅक म्हणून ओळखली जाते. कंपनीने हे वाहन एकूण चार व्हेरिएंटमध्ये लॉन्च केले आहे. येथे तुम्हाला 1197cc चे इंजिन मिळते. हे इंजिन 1.2 लीटर क्षमतेचे ड्युअल जेट पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन तुम्हाला 90PS पॉवर आणि 113Nm टॉर्क देते. इंजिन सोबतच कंपनी तुम्हाला इथे 5 स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्स सुद्धा देते. जर आपण कारच्या मायलेजबद्दल बोललो तर तुम्हाला त्यात 23.76 kmpl चे मायलेज मिळेल.

या कारच्या इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 7.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे, सोबत क्रूझ कंट्रोल, हाय-अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, हिल होल्ड कंट्रोल, पुढच्या सीटसाठी ड्युअल एअरबॅग्ज, EBD, ABS आणि रियर पार्किंग सेन्सर्स यांचा समावेश आहे.

मारुती स्विफ्ट कार Cars24 नावाच्या वेबसाइटवर सूचीबद्ध आहे, जी सेकंड हँड सेगमेंट कार आहे. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या कारची किंमत 3,56,599 रुपये आहे. ही कार 2015 चे मॉडेल आहे. ही फर्स्ट ओनर कार आहे. या कारने आतापर्यंत 82,559 किमी अंतर कापले आहे आणि तिची नोंदणी दिल्लीतील DL-9C RTO मध्ये झालेली आहे. या कारच्या खरेदीवर, कंपनी सहा महिन्यांची वॉरंटी आणि सात दिवसांची मनी बॅक गॅरंटी देत ​​आहे, त्यासोबत कंपनी झिरो डाउन पेमेंटसह लोनची सुविधा देखील देत आहे.

इतर बातम्या

कावासकीने भारतात लॉन्च केली मोटरसायकल, जाणून घ्या किती आहे या बाईकची किंमत

ऑलिम्पियन सुमित अंतिलला महिंद्राचं शानदार गिफ्ट, XUV700 ची पहिली Javelin Gold Edition भेट

PHOTO | ही आहे जगातील पहिली इलेक्ट्रिक टू-सीटर फॉर्म्युला रेस कार, जाणून घ्या काय आहे खास

(Bumper offer buy Maruti Suzuki Swift in just rs 356000, know more about it)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.