दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या ‘या’ तीन 300cc बाईक्सपैकी कोणती बाईक आहे तुमच्यासाठी बेस्ट?

प्रत्येकाला परवडण्याजोग्या किंमतीत पॉवरपुल परफॉर्मन्स देणारी बाईक हवी असते, ज्यामध्ये बेस्ट रायडिंग एक्सपिरियन्स मिळेल.

दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या 'या' तीन 300cc बाईक्सपैकी कोणती बाईक आहे तुमच्यासाठी बेस्ट?
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 5:54 PM

मुंबई : प्रत्येकाला परवडण्याजोग्या किंमतीत पॉवरपुल परफॉर्मन्स देणारी बाईक हवी असते, ज्यामध्ये बेस्ट रायडिंग एक्सपिरियन्स मिळेल. आज आम्ही तुम्हाला अशाच काही दमदार इंजिन असणाऱ्या आणि किफायतशीर किंमतींमध्ये बाजारत उपलब्ध असलेल्या बाईक्सबद्दल माहिती देणार आहोत. (buy 350 cc bike Royal enfield meteor 350, jawa forty two, and honda CB350 RS and get better mileage)

बाजारात बर्‍याच बाईक्स आहेत ज्या उत्तम इंजिनसह सुसज्ज आहेत. परंतु आज आम्ही ज्या बाइक्सबद्दल बोलत आहोत त्यामध्ये 300cc पर्यंतचे इंजिन आहे आणि लुक्सच्या बाबतीत या बाईक सर्वोत्तम आहेत. चला तर मग जाणून घ्या या बाईक्सची खासियत काय आहे आणि आपण त्यासाठी तुम्हाला किती पैसे मोजावे लागतील.

Honda CB350 RS

होंडाने त्यांची नवीन स्क्रॅम्बलर बाईक CB350 RS ही 1.96 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतक्या किंमतीत सादर केली आहे. होंडाच्या बिगविंग शोरुमद्वारे या बाईकची देशभरात विक्री केली जाईल. नवीन स्क्रॅम्बलर CB350 RS या बाईकमधील इंजिनबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये कंपनीने 348.6cc क्षमतेचं सिंगल सिलिंडर युक्त एयर कूल्ड इंजन दिलं आहे, हे 5 स्पीड गियरबॉक्ससह सादर करण्यात आलं आहे. तसेच हे इंजिन 20.78bhp दमदार पॉवर आणि 30Nm टॉर्क जेनरेट करु शकतं.

सोबतच या बाईकमध्ये स्लिपर क्लचही देण्यात आलं आहे जे गियर शिफ्टिंग अजूनच स्मूथ बनवेल. फ्रंटला 310mm डिस्क आणि मागच्या बाजूला 240mm डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. CB350 RS मध्ये डुअल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिमचा (ABS) वापर करण्यात आला आहे. तसेच डुप्लेक्स क्रॅडल चेसिसवर तयार करण्यात आलं आहे. या बाईकच्या फ्रंटला तुम्हाला टेलेस्कोपिक फॉर्क सस्पेंशन आणि बॅक साईडला हायड्रॉलिक सस्पेंशन मिळेल.

नवीन Honda CB350 RS मध्ये कंपनीने रुंद टायर वापरले आहेत, जे रायडिंग अजूनच कम्फर्टेबल आणि बॅलेन्स्ड बनवतात. सोबतच या बाईकमध्ये राऊंड शेप हेडलँप, ब्लॅक ऑऊट शॉक अॅब्जॉर्बर (Shock Absorber) क्रोम मफलर, डुअल टोन फ्यूल टँक आणि सिंगल पीस सीटसह नवे ग्राफिक्स मिळतील. या बाईकमध्ये तुम्हाला सिंगल पॉड इंस्ट्रूमेंट कंसोलसह अॅनालॉग आणि छोटा डिजिटल डिस्प्लेदेखील मिळेल. या कंसोलमध्ये तुम्हाला ABS, साईड स्टँड इंडिकेटर, इको इंडिकेटर, रियल टाईम मायलेज, अॅवरेज मायलेज, स्मार्टफोन वॉईस कंट्रोल सिस्टिम (HSVCS) आणि गियर पोजिशनची माहिती मिळेल.

कंपनीने या बाईकमध्ये स्मार्टफोन वॉईस कंट्रोल सिस्टिमही दिली आहे. याद्वारे तुम्ही ही बाईक तुमच्या स्मार्टफोनशी कनेक्ट करु शकता. बाईक फोनशी कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये HSVCS मोबाईल अॅप डाऊनलोड करावं लागेल. त्यानंतर तुम्ही तुमच्या फोनद्वारे या बाईकमधील अनेक फीचर्स हाताळू शकता.

Royal Enfield Meteor 350

रॉयल एनफिल्डची मीटिओर 350 (Royal Enfield Meteor 350) ही बाईक ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. या बाईकमध्ये नवीन डिव्हाइस कन्सोल सेट-अप आणि स्प्लिट सीट डिजाइन देण्यात आली आहे. हेडलाईट आणि टेललाईटमध्येही बदल करण्यात आले आहेत. डिझाईनच्या बाबतीत या बाईकमध्ये टियर-ड्रॉप शेप्ड इंधन टॅन्क, ब्राईट कलर ऑप्शन, एलईडी लाईट आणि एका स्प्लिट-सीटचा समावेश करण्यात आला आहे.

नव्या मीटिओर 350 मध्ये एक नवीन फ्रेम आणि नवीन इंजिन देण्यात आलं आहे. मीटिओर 350 मध्ये डबल-क्रॅडल चेसिसचा वापर करण्यात आला आहे. असं सांगितलं जातंय की, नवीन 350 सीसी इंजिन पूर्वीपेक्षा जास्त पॉवर आणि टॉर्क निर्माण करेल. या बाईकचं इंजिन 20.2 बीएचपी आणि 27 एनएम पीक टॉर्क निर्माण करु शकतं.

मीटिओरला एक मीडियम टीएफटी कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबत मेन यूनिट जे ट्रिप मीटर आणि इतर डिटेल्ससाठी अॅनालॉग स्पीडोमीटर एलईडी पॅनलसह आहे. Meteor 350 मध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह डिजिटल अॅनालॉग इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि नवीन टीएफटी डिस्प्लेमध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सुविधा आहे. RE Meteor 350 ची किंमत 1.5 लाख ते 2 लाख रुपये इतकी आहे. Benelli Imperiale 400, Jawa 300 आणि नुकतीच लाँच झालेल्या Honda H’Ness CB350 या गाड्यांना RE Meteor 350 टक्कर देईल.

Jawa forty two

Classic Legends Private Limited कंपनीने नुकतीच अपडेटेड 2021 जावा 42 बाईक लाँच केली आहे. या बाईकची किंमत 1,83,942 रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. या बाईकच्या लाँचिंगवेळी कंपनीच्या सीईओंनी सांगितलं होतं की, Jawa forty two ही बाईक बनवताताना आम्ही एक्झॉस्ट नोट थ्रेशर अधिक आकर्षक बनवलं आहे. या बाईकची सीट थोडी वाढवली आहे आणि पंचसाठी क्रॉस-पोर्ट इंजिन निश्चित केलं आहे. आम्ही ‘क्लासिक स्पोर्ट्स’ स्ट्राइप्स, अलॉय व्हील्स आणि ट्युबलेस टायर्ससह स्टँडर्ड फिटमेंट तसेच फ्लाय-स्क्रीन, हेडलैंप ग्रिलमध्ये एक्सेसरीजमध्ये अपडेट्स केले आहेत.

कंपनीने या बाईकच्या सीट पॅनला पुन्हा एकदा रिडिझाईन केलं आहे. अधिक आराम आणि अधिक रूम प्रदान करण्यासाठी सीट कुशनिंग केलं आहे. सस्पेंशन सेट-अपला पुन्हा एकदा अपडेट केलं आहे. जेणेकरुन अवघड रस्त्यांवर किंवा खराब रस्त्यांवरही या बाईकवरुन अधिक आरामदायक प्रवास करता येईल. तसेच ही बाईक अधिक आकर्षक बनवण्यावर कंपनीने भर दिला आहे. बाईकच्या हँडलिंगमध्येही सुधारणा करण्यात आल्या आहेत.

अनेक बदलांमुळे ही बाईक अधिक दमदार बनली आहे. या बाईकमधील 293 सीसी, सिंगल-सिलिंडर, लिक्विड-कूल्ड, फ्युल-इंजेक्टेड इंजिन 27 बीएचपी पॉवर जनरेट करु शकतं. तसेच 6,800 आरपीएमवर 27.03 एनएम टॉर्क जनरेट करु शकतं. 2021 च्या जावा फोर्टी-टू या बाईकचं वजन 172 किलोग्रॅम इतकं आहे. यामध्ये अॅर्गोनॉमिक्स आणि कॉर्नरिंग क्लियरन्स सुधारण्यावर कंपनीने भर दिला आहे. ही बाईक आता जावा डीलरशीपकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे.

इतर बातम्या

लाँचिंगपूर्वीच Kawasaki Ninja 300 साठी बुकिंग सुरु, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

कमी किंमत, नवे दमदार फीचर्स, 2021 TVS Star City Plus चा टीझर लाँच

केवळ 2,499 रुपयात घरी न्या होंडाची शानदार बाईक आणि स्कूटर, मिळवा 5000 रुपयांचा कॅशबॅक

(buy 350 cc bike Royal enfield meteor 350, jawa forty two, and honda CB350 RS and get better mileage)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.