AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या 23 हजारात घरी न्या शानदार स्कूटर, 57 kmpl मायलेजसह एका वर्षाची वॉरंटी

सुझुकी एक्सेस 125 ही कंपनीची सर्वोत्तम मायलेज स्कूटर आहे. जर तुम्ही आज शोरूममध्ये ही स्कूटर खरेदी करायला गेलात तर तुम्हाला 73,400 ते 82,600 रुपये मोजावे लागतील.

अवघ्या 23 हजारात घरी न्या शानदार स्कूटर, 57 kmpl मायलेजसह एका वर्षाची वॉरंटी
Follow us
| Updated on: Sep 25, 2021 | 4:42 PM

मुंबई : पेट्रोलच्या वाढत्या किंमती कमी होण्याचे नाव घेत नसल्यामुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहने किंवा सेकंड हँड मार्केटच्या दिशेने वाटचाल करत आहेत. दरम्यान, अनेक कंपन्या आहेत ज्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटारसायकली लाँच केल्या आहेत. पण अनेक ग्राहक आहेत जे चार्जिंग स्टेशनची समस्या लक्षात घेऊन पेट्रोल स्कूटरची निवड करत आहेत. पण त्यात त्या वाहनांचाही समावेश आहे ज्यांचे मायलेज जास्त आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक स्कूटर घेऊन आलो आहोत. सुझुकी एक्सेस 125 असे या स्कूटरचे नाव आहे. (buy suzuki access 125 in just rs 23000, will get 1 year warranty too)

सुझुकी एक्सेस 125 ही कंपनीची सर्वोत्तम मायलेज स्कूटर आहे. जर तुम्ही आज शोरूममध्ये ही स्कूटर खरेदी करायला गेलात तर तुम्हाला 73,400 ते 82,600 रुपये मोजावे लागतील. पण आज आम्ही तुमच्यासाठी एक शानदार ऑफर आणली आहे. ज्यामध्ये, तुम्ही अगदी कमी किंमतीत ही स्कूटर घरी घेऊन जाऊ शकता. तुम्ही ही स्कूटर अवघ्या 23 हजार रुपयांमध्ये खरेदी करु शकता.

स्कूटरच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात आपल्याला 124cc सिंगल सिलेंडर इंजिन मिळेल. हे इंजिन 8.7ps ची पॉवर आणि 10Nm टॉर्क देते. स्कूटरचे ट्रान्समिशन ऑटोमॅटिक आहे. यामध्ये तुम्हाला पुढच्या चाकात डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेक मिळतात. यामध्ये तुम्हाला ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. जर आपण स्कूटरच्या मायलेजबद्दल बोललो तर इथे तुम्हाला 57.2 kmpl चे मायलेज मिळते.

ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, सेकंड हँड वाहने विकणारी कंपनी म्हणजेच CARS24 वर कंपनीने आपल्या वेबसाइटवर फक्त 23 हजारात ही स्कूटर लिस्ट केली आहे. संकेतस्थळावरील माहितीनुसार, वाहनाचे मॉडेल 2013 चे आहे आणि ही फर्स्ट ओनर बाईक आहे. आतापर्यंत ही स्कूटर 30,638 किलोमीटर धावली आहे. ही स्कूटर दिल्लीच्या DL-9C RTO येथे रजिस्टर्ड आहे.

तुम्ही जर ही स्कूटर खरेदी केली तर तुम्हाला एक वर्षाच्या वॉरंटीसह 7 दिवसांची मनी बॅक गॅरंटीदेखील मिळेल. म्हणजेच, जर तुम्हाला 7 दिवसांच्या आत ही स्कूटर आवडली नाही, तर तुम्ही ती परत करू शकता आणि तुमचे पूर्ण पैसे परत मिळवू शकता.

महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड स्कूटर घेणार असाल तर सर्व बाजूंनी कार तपासून पाहा. स्कूटरचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. वाहन मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, स्कूटर आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच ही स्कूटर खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही CARS24 वरुन घेतली आहे.

इतर बातम्या

मारुतीनंतर आता तुमच्या आवडत्या टाटा कार महागणार, जाणून घ्या किंमत किती वाढणार?

ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी पेपर सोबत बाळगण्याचं आता नो टेन्शन, DigiLocker ला मिळाली मान्यता

Tata चा CNG गाड्यांच्या धडाका, अवघ्या 5 हजारात बूक करा किफायतशीर कार

(buy suzuki access 125 in just rs 23000, will get 1 year warranty too)

गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार
गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार.
तीन दिवस सतर्कतेचे; राज्यात बॉम्बब्लास्टची धमकी
तीन दिवस सतर्कतेचे; राज्यात बॉम्बब्लास्टची धमकी.
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप.
आज दहावी बोर्डाचा निकाल; कुठे बघता येणार निकाल?
आज दहावी बोर्डाचा निकाल; कुठे बघता येणार निकाल?.
भारत-पाकिस्तानमधलं अणूयुद्ध अमेरिकेनं टाळलं, ट्रम्प यांचं मोठं विधान
भारत-पाकिस्तानमधलं अणूयुद्ध अमेरिकेनं टाळलं, ट्रम्प यांचं मोठं विधान.
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान.
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?.
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट.
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज.
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन.