गाडीचा AC डोंगरावर किंवा घाटातून जाताना बंद करावा की नाही? उत्तर जाणून घ्या
डोंगरात गाडी चालवताना AC वापरावा की नाही याची योग्य माहिती आहे का? त्यामुळे डोंगराळ भागात वाहन चालविणे तुमच्यासाठी खूप आव्हानात्मक ठरू शकते. AC चालवायचा की नाही हा प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहतो, आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत.

उन्हाळा सुरू झाला की अनेक लोक आपल्या घरातील कार काढता आणि फिरायला निघता. मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने हा प्लॅन आखला जातो. पण, याचवेळी लोक डोंगराळ भाग आणि घाटातून जात असल्याने याठिकाणी AC सुरू ठेवावा की बंद? हा प्रश्न अनेकांना पडतो. आज आम्ही तुम्हाला याचविषयीची माहिती संगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
उन्हाळा आला की लोक कुल्लू-मनाली, नैनीताल आणि शिमला सारख्या लोकप्रिय हिल स्टेशनवर जाण्याचा बेत आखू लागतात. काही लोक सार्वजनिक वाहतुकीऐवजी कारने प्रवास करणे पसंत करतात, परंतु डोंगराळ भागात कार चालविणे सामान्य भागात वाहन चालविण्यापेक्षा बरेच वेगळे आहे. जर तुम्ही कारने हिल स्टेशनला जाण्याचा प्लॅन करत असाल तर आधी तुम्हाला हे माहित असायला हवं की डोंगराळ रस्त्यावर कार चालवताना गाडीचा AC चालू ठेवावा की बंद? याचविषयी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
काही लोक डोंगराळ भागात गाडी चालवताना AC बंद करण्याविषयी बोलतात, तर काही लोकांना AC चालू ठेवावा असं वाटतं, पण काय करायला हरकत आहे? याविषयी योग्य माहिती असणेही गरजेचे आहे.
CNG कार असेल तर AC बंद करणे चांगले कारमध्ये कोणते इंजिन बसवले आहे, हे AC चालू ठेवायचे की बंद ठेवायचे यावरही अवलंबून असते. पेट्रोल-डिझेलच्या गाडीने AC चालू ठेवल्यानंतरही चढता येते, पण CNG कार असेल तर AC बंद करणे चांगले. पेट्रोलच्या तुलनेत CNG कारची पिकअप थोडी कमी असते, शिवाय डोंगराळ भागात AC ऑन केल्यास गाडीला चढाई पूर्ण करताना त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे ही गोष्टी देखील लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे.
खडतर डोंगराळ भागात गाडी चालवताना AC बंद करणे योग्य ठरते कारण यामुळे इंजिनवर कमी दाब पडतो, ज्यामुळे चांगली कामगिरी मिळते आणि कार चालविणे सोपे होते. दुसरीकडे AC सुरु असल्यामुळे प्रवास जरी आरामदायी वाटत असला तरी त्यामुळे इंजिनवर जास्त भार पडतो.
आता आम्ही या प्रश्नाचे उत्तर तुम्हा लोकांवर सोडणार आहोत की तुम्हाला आरामदायक प्रवास हवा आहे की चांगली कामगिरी हवी आहे? हे तुमच्या गरजेवर अवलंबून असते, परंतु AC बंद करून डोंगराळ भागात वाहन चालविण्याचा सल्ला दिला जातो.