AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ढासू डिझाईन आणि पॉवरफुल इंजिन, 2022 Jawa Cruiser बाईक लाँचिंगसाठी सज्ज

Classic Legends त्यांच्या BSA आणि Yezdi या दोन आयकॉनिक ब्रँडच्या रिव्ह्यूवर काम करत आहे. त्याच बरोबर, बाईक निर्माती कंपनी जावा ब्रँड अंतर्गत आपली लाइनअप वाढवण्यावर देखील लक्ष केंद्रित करत आहे.

ढासू डिझाईन आणि पॉवरफुल इंजिन, 2022 Jawa Cruiser बाईक लाँचिंगसाठी सज्ज
2022 Jawa Cruiser
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 8:24 PM

2022 Jawa Cruiser 350 : Classic Legends त्यांच्या BSA आणि Yezdi या दोन आयकॉनिक ब्रँडच्या रिव्ह्यूवर काम करत आहे. त्याच बरोबर, बाईक निर्माती कंपनी जावा ब्रँड अंतर्गत आपली लाइनअप वाढवण्यावर देखील लक्ष केंद्रित करत आहे. जावा पोर्टफोलिओमधील आगामी मोठं लाँचिंग म्हणजे क्रूझर बाजारात दाखल होईल अशी अपेक्षा आहे. लॉन्च होण्यापूर्वी ही बाइक अनेक ठिकाणी स्पॉट झाली आहे. तसेच आगामी बाईकच्या स्पेसिफिकेशन्सबाबतही अनेक अंदाज बांधले जात आहेत. यासोबतच बाइकच्या डिझाइन आणि फीचर्सची माहितीही लीक झाली आहे. आगामी बाईक कन्व्हेन्शनल क्रूझरला रिप्रेझेंट करते. (Classic Legends ready to launch 2022 Jawa Cruiser 350 with powerfull engine)

2022 जावा क्रूझर 350 – रेंडर्ड डिजाइन

नेहमीप्रमाणेच, क्लासिक लिजेंड्सने क्रूझरसाठी गोल हेडलॅम्प, टीयरड्रॉप आकाराचा फ्यूल टँक आणि गोलाकार रीअरव्ह्यू मिरर यांसारख्या हायलाइट्ससह रेट्रो स्टाइल स्वीकारली आहे.

राउंड टेल लॅम्प्स आणि टर्न इंडिकेटर्स, फोर्क गेटर्स आणि स्प्लिट-स्टाईल सीट्स यांसारखे इतर स्टायलिंग हायलाइट्स मोटरसायकलला आधुनिक क्लासिक अपील देतात. क्रूझरला एक वेगळी ओळख देण्यासाठी डिझाइन आर्टिस्टने काही खास टच दिले आहेत. यासाठी, फ्यूल टँक 3D टचसह जावा सिग्नेचर साइन दर्शवते. साइड टूलबॉक्स पॅनेलमध्ये तीन लाईन्स आहेत आणि एक न्युमरीक (\u2018350\u2019) क्रमांक आहे जो इंजिनचा आकार दर्शवतो.

फ्यूल टँक आणि बाजूचे पॅनेल डार्क रेड कलरमध्ये आहेत. तर मेकॅनिकल कम्पोनंट्स, रनिंग गियर आणि एक्झॉस्टसह उर्वरित भाग ब्लॅक कलरमध्ये रंगवला आहे. जो स्पोर्टी ड्युअल-टोन थीम लूक आहे. सध्याच्या जावा मॉडेलच्या विपरीत, आगामी क्रूझरला फक्त एक एक्झॉस्ट पाईप मिळेल.

आरामदायक फीचर्ससह नवीन बाईक सादर होणार

या बाईकची सीट खाली ठेवली गेली आहे, तर फुट पेग्स पुढे सेट केले गेले आहेत. रुंद हँडलबार थोडा वर ठेवला आहे, ज्यामुळे ड्रायव्हरला ड्रायव्हिंग करताना आरामदायी स्थितीसह उत्तम ड्रायव्हिंगचा अनुभव मिळतो. या बाइकमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सारखे फीचर्स दिले जाऊ शकतात.

सस्पेन्शनबद्दल बोलायचे झाले तर, यात पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस ड्युअल शॉक ऑब्झर्व्हर सस्पेंशन आहे. दोन्ही चाकांमध्ये अलॉय व्हीलसह ड्युअल चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) मिळेल. सिंगल पीस सीट युनिटसह येणाऱ्या या बाइकमध्ये पिलन राइडला थोडी कमी जागा मिळू शकते.

संभाव्य पॉवरट्रेन स्पेक्स

आगामी जावा क्रूझर 334cc लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर, DOHC इंजिनद्वारे सुसज्ज असेल अशी अपेक्षा आहे. जे 30 Bhp पॉवर आणि 32.74 Nm पीक टॉर्क जनरेट करते. स्लीपर आणि असिस्ट क्लचद्वारे मोटरला 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडले जाईल.

इतर बातम्या

Suzuki ते Hero, भारतात 2022 मध्ये 4 नव्या इलेक्ट्रिक स्कूटर दाखल होणार

अमिताभ बच्चन आणि युवराज सिंहनंतर MG Motor कडून NFT ची घोषणा, ठरली पहिलीच कारउत्पादक कंपनी

सिंगल चार्जमध्ये 120KM रेंज, EeVe Soul हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, किंमत…

(Classic Legends ready to launch 2022 Jawa Cruiser 350 with powerfull engine)

भारतीय सुरक्षा संस्थांकडून अ‍ॅक्टिव्ह दहशतवादी समोर, मुख्य लीडर कोण?
भारतीय सुरक्षा संस्थांकडून अ‍ॅक्टिव्ह दहशतवादी समोर, मुख्य लीडर कोण?.
आज बारावीचा निकाल; निकालापूर्वी वडिलांच्या आठवणीने वैभवी भावुक
आज बारावीचा निकाल; निकालापूर्वी वडिलांच्या आठवणीने वैभवी भावुक.
यंदाही कोकणचे विद्यार्थी अव्वल; सर्वाधिक 96.74 टक्के निकाल
यंदाही कोकणचे विद्यार्थी अव्वल; सर्वाधिक 96.74 टक्के निकाल.
बारावीचा रिझल्ट लागला, राज्याचा निकाल किती टक्के? यंदा बाजी कोणाची?
बारावीचा रिझल्ट लागला, राज्याचा निकाल किती टक्के? यंदा बाजी कोणाची?.
भारताची पाऊलं अफगाणिस्ताननं ओळखली? माजी राष्ट्रपती म्हणाले, असं वाटतंय
भारताची पाऊलं अफगाणिस्ताननं ओळखली? माजी राष्ट्रपती म्हणाले, असं वाटतंय.
फडणवीस शिंदेंपासून सावध रहा, कारण... संजय राऊतांनी काय दिला सल्ला?
फडणवीस शिंदेंपासून सावध रहा, कारण... संजय राऊतांनी काय दिला सल्ला?.
पाकचा लष्कर प्रमुख भेदरला, कारवाईच्या भितीची धास्ती अन् लपून बसला...
पाकचा लष्कर प्रमुख भेदरला, कारवाईच्या भितीची धास्ती अन् लपून बसला....
पहलगाम हल्ल्यानंतरचा CCTV समोर, जीव मुठीत घेऊन पर्यटकांची धावाधाव अन्
पहलगाम हल्ल्यानंतरचा CCTV समोर, जीव मुठीत घेऊन पर्यटकांची धावाधाव अन्.
भाजप माजी नगरसेवकाच्या आजी-माजी समर्थकांमध्ये राडा, तलवारी, रॉड अन्...
भाजप माजी नगरसेवकाच्या आजी-माजी समर्थकांमध्ये राडा, तलवारी, रॉड अन्....
9 तारखेच्या आतच काम होणार तमाम? पाकिस्तानला PM मोदींचा मोठा इशारा काय?
9 तारखेच्या आतच काम होणार तमाम? पाकिस्तानला PM मोदींचा मोठा इशारा काय?.