जुन्या कारमध्ये CNG किट बसवताय? या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर मोठं नुकसान होईल

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. जी देशभरात एक मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे आता बहुतांश लोक सीएनजी (CNG) आणि एलपीजी किट (LPG Kit) वापरत आहेत. हे पाहता सीएनजी कारच्या मागणीतही लक्षणीय वाढ झाली आहे.

जुन्या कारमध्ये CNG किट बसवताय? या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर मोठं नुकसान होईल
Cng Car Installation Kit Image Credit source: File
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 1:13 PM

मुंबई : देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. जी देशभरात एक मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे आता बहुतांश लोक सीएनजी (CNG) आणि एलपीजी किट (LPG Kit) वापरत आहेत. हे पाहता सीएनजी कारच्या मागणीतही लक्षणीय वाढ झाली आहे. हे दोन्ही पेट्रोल आणि डिझेलला स्वस्त पर्याय तर आहेतच, तसेच हे इंधन पेट्रोल-डिझेलप्रमाणे पर्यावरणाला हानिकारक नाही. अनेक कंपन्या त्यांच्या वाहनांमध्ये फॅक्टरी फिटेड सीएनजी किटचा पर्याय देत असताना, बहुतेक लोक आता त्यांच्या जुन्या कारमध्ये सीएनजी आणि एलपीजी किट बसवण्याचा पर्याय निवडत आहेत. तुम्हीही तुमच्या जुन्या कारमध्ये सीएनजी किट (CNG FIt Car)बसवण्याचा विचार करत असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. त्याकडे दुर्लक्ष केल्यास तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.

तुम्ही तुमच्या कोणत्याही नॉन-सीएनजी कारमध्ये सीएनजी किट बसवण्याचा विचार करत असाल, तर लक्षात ठेवा की तुम्ही कारचे इंधन तंत्रज्ञान (फ्यूल टेक्नोलॉजी) देखील बदलले पाहिजे. यामुळे कारच्या इन्श्योरन्स पॉलिसीमध्ये मोठा फरक पडतो. याकडे दुर्लक्ष केल्यास तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत, सीएनजी किट किंवा एलपीजी किट इन्स्टॉल करण्यापूर्वी, राज्य परिवहन विभागाने जारी केलेल्या नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला पाहिजे. ज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलऐवजी सीएनजी किंवा एलपीजीचा पर्याय निवडावा लागेल.

सीएनजी बसवण्यापूर्वी हे काम करुन घ्या

यासह, तुम्हाला आरसी बुक, इन्श्योरन्स पॉलिसीची प्रत, एलपीजी-सीएनजी किट चालान आणि कारचे केवायसी यांसारखी कागदपत्रे आरटीओ कार्यालयात जमा करावी लागतील. फॉर्म भरल्यानंतर, आरटीओद्वारे कागदपत्रांची तपासणी केली जाते आणि रेट्रो फिटिंगला मान्यता दिली जाते. वाहन नोंदणी प्रमाणपत्रासोबत (व्हीकल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इंडॉर्समेंट) वाहन विम्याची पुष्टी करावी लागते. हे काम विमा कंपनी करते. एलपीजी-सीएनजी किट इनव्हॉइस, आरसी बुक आणि सर्व कागदपत्रे विमा कंपनी तपासते. यानंतर विमा पॉलिसी कारच्या मालकाकडे पाठवली जाते.

जर तुम्ही तुमच्या फ्यूल टेकनिकबद्दल विमा कंपनीला माहिती दिली नाही, तर तुमच्या कारचा अपघात झाल्यास कंपनी तुम्हाला क्लेम देण्यास नकार देऊ शकते. याचे कारण म्हणजे, पेट्रोल आणि डिझेल कारच्या तुलनेत सीएनजी कारमध्ये एक्सपोजरचा धोका जास्त असतो.

इतर बातम्या

अवघ्या 30 हजारात घरी न्या Bajaj Discover 150, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

5.5 लाखांची Hyundai कार 2.5 लाखात खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

अवघ्या 38 हजारात खरेदी करा Honda Activa, जाणून घ्या कुठे मिळतेय शानदार डील

भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.