AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

New Tata Harrier Petrol : लवकरच येत आहे टाटा हॅरियर पेट्रोल, अलिशान कारविषयी जाणून घ्या…

हॅरियरच्या पेट्रोल व्हेरिएंटची लोक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. आता बातमी येत आहे की या वर्षी हॅरियर पेट्रोलला लाँच केलं जाईल.

New Tata Harrier Petrol : लवकरच येत आहे टाटा हॅरियर पेट्रोल, अलिशान कारविषयी जाणून घ्या...
टाटा हॅरियर पेट्रोलImage Credit source: social
| Updated on: May 05, 2022 | 5:19 PM
Share

मुंबई : भारतात टाटा मोटर्सच्या (TATA Motor) एसयूव्हीचा (SUV) सध्या चांगलीच चर्चा आहे. मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये टाटा हॅरियर (Tata Harrier) लाखो लोकांची आवडती आहे. आता चांगली बातमी अशी आहे की टाटा हॅरियर लवकरच फेसलिफ्ट लूकमध्ये येणार आहे.  पेट्रोल इंजिन तसेच अनेक नवीन वैशिष्ट्यांसह ही सुसज्ज असणार आहे. हॅरियरच्या पेट्रोल व्हेरिएंटची लोक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. आता बातमी येत आहे की या वर्षी हॅरियर पेट्रोलला लाँच केलं जाईल. त्यामुळे कार घेणाऱ्यांसाठी ही बातमी फायदेशीर ठरू शकते. कोणतीही वस्तू घ्यायची असल्यास आपण त्याविषयी अधिक माहिती घेतो. त्याच प्रमाणे कार ही तर महत्वाची आणि मोठा वस्तू आहे. ती घेण्यापूर्वी तिच्यातील वैशिष्ट्यांविषयी जाणून घ्यायला हावं. आम्ही तुम्हाला टाटा हॅरियर सर्वकाही सांगणार आहोत.

बरेच कॉस्मेटिक बदल

टाटा हॅरियर फेसलिफ्ट पुढील वर्षाच्या सुरुवातीला लाँच केली जाऊ शकते. SUV मध्ये नवीन ग्रिल आणि हेडलॅम्प तसेच नवीन बंपरसह बरेच कॉस्मेटिक बदल दिसू शकतात. आगामी हॅरियर फेसलिफ्टमध्ये नवीन अलॉय व्हील्ससह बरेच काही पाहण्याची अपेक्षा आहे.

वैशिष्ट्ये आणि इंजिन-पॉवर

भारतातील टाटा हॅरियर फेसलिफ्ट अनेक नवीन वैशिष्ट्यांसह ऑफर केली जाऊ शकते, ज्यात प्रगत ड्रायव्हिंग असिस्टंट सिस्टम (ADAS) सोबत 360-डिग्री कॅमेरे, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, सभोवतालची प्रकाश व्यवस्था, सुधारित इन्फोटेनमेंट सिस्टम पूर्ण आहे. यासारख्या डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह इतर अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्याच वेळी टाटा हॅरियर फेसलिफ्टच्या संभाव्य इंजिन आणि पॉवरबद्दल बोलल्यास त्यात एक नवीन पेट्रोल इंजिन पाहिले जाऊ शकते. जे 1.5 लीटर टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन असेल आणि ते 150bhp पर्यंत पॉवर जनरेट करण्यास सक्षम असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Tata Harrier पेट्रोल ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह दिले जाऊ शकते. टाटा हॅरियर पेट्रोल लॉन्च संदर्भात अधिक तपशील येत्या काही दिवसांत उघड केले जातील.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.