2024 पर्यंत दिल्लीत विकली जाणारी दर 4 पैकी 1 गाडी इलेक्ट्रिक असणार, केजरीवाल सरकारची जोरदार तयारी

दिल्ली सरकारने थेट लोकांशी संपर्क साधण्यासाठी 'स्विच दिल्ली अभियान' सुरु केलं आहे. (Delhi govt launches social media handles of Switch Delhi campaign for EVs)

2024 पर्यंत दिल्लीत विकली जाणारी दर 4 पैकी 1 गाडी इलेक्ट्रिक असणार, केजरीवाल सरकारची जोरदार तयारी
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 3:30 PM

दिल्ली : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज कार कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स आणि इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच करत आहेत. तसेच यापूर्वीदेखील देशात काही इलेक्ट्रिक वाहनं लाँच झाली आहेत. दरम्यान, जास्तीत जास्त नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहनं, प्रामुख्याने ईलेक्ट्रिक टू-व्हिलर वापराव्यात, यासाठी दिल्ली सरकारने पुढाकार घेतला आहे. (Delhi govt launches social media handles of Switch Delhi campaign for EVs)

दिल्लीचे परिवहन मंत्री कैशाल गहलोत यांनी रविवारी ‘स्विच दिल्ली अभियाना’च्या पहिल्या सप्ताहाची सुरुवात केली. यावेळी त्यांनी काही ट्विट्स केले. त्यात त्यांनी म्हटलं की, तुमची स्कूटर इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये स्विच केलीत तर पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत तुम्ही दरवर्षी 22,000 रुपयांची बचत करु शकता. तर पेट्रोल बाईकच्या तुलनेत दरवर्षी 20,000 हजार रुपयांची बचत करु शकता. इलेक्ट्रिक वाहन प्रत्येक बाबतीत तुमची बचत करेल.

स्विच दिल्ली अभियानाची सुरुवात

दिल्लीचे परिवहन मंत्री कैशाल गहलोत यांनी रविवारी ‘स्विच दिल्ली अभियाना’च्या पहिल्या सप्ताहाची सुरुवात केली. यावेळी त्यांनी काही ट्विट्स केले. त्यात त्यांनी म्हटलं की, तुमची स्कूटर इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये स्विच केलीत तर पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत तुम्ही दरवर्षी 22,000 रुपयांची बचत करु शकता. तर पेट्रोल बाईकच्या तुलनेत दरवर्षी 20,000 हजार रुपयांची बचत करु शकता. इलेक्ट्रिक वाहन प्रत्येक बाबतीत तुमची बचत करेल.

जनआंदोलन उभारण्याचा प्रयत्न : केजरीवाल

दरम्यान, दिल्ली सरकारने थेट लोकांशी संपर्क साधण्यासाठी ‘स्विच दिल्ली अभियान’ सुरु केलं आहे. याच नावाने दिल्ली सरकारने सोशल मीडिया हँडलही सुरु केलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहन जागरुकता अभियान एका जनआंदोलनात बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. एका अधिकृत निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचे संवाद व विकास आयोग (डीडीसी) ट्विटर, फेसबुक, लिंक्डइन आणि इंस्टाग्रामवर या मोहिमेसाठी सोशल मीडियाचे नेतृत्व करणार आहे.

कमल हसनकडून अभियानाचे कौतुक

निवेदनात म्हटले आहे की, सोशल मीडिया हँडलचा उपयोग इलेक्ट्रिक वाहनांविषयीच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी, त्याविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी तसेच ईव्हीच्या फायद्यांविषयी लोकांना जाणीव करुन देण्यासाठी केला जाईल. दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी ट्विटरवर ‘स्विच दिल्ली’ अभियानाचे कौतुक केले आहे. हसन म्हणाले की, प्रदूषण नियंत्रित करण्याच्या दृष्टीने हे एक उत्तम पाऊल आहे.

कमल हसन यांना उत्तर देताना केजरीवाल यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, “आम्ही दिल्लीला जागतिक दर्जाचे आणि प्रदूषणमुक्त ईव्ही शहर म्हणून विकसित करण्यास वचनबद्ध आहोत”. आमचे सरकार जनतेला या ईव्ही मोहिमेचे जनआंदोलनात रूपांतर करण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा पुरवित आहे.

दर 4 वाहनांपैकी 1 वाहन इलेक्ट्रिक असणार

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दिल्ली सरकारकडून ईव्ही धोरण सुरू करण्यात आले होते, त्यात असे म्हटले आहे की, 2024 पर्यंत दिल्लीत विकल्या जाणाऱ्या प्रत्येक 4 वाहनांपैकी 1 वाहन इलेक्ट्रिक असेल.

हेही वाचा

Special Story : ‘या’ आहेत सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या देशातील टॉप 5 इलेक्ट्रिक कार्स

दिल्ली सरकारचा मास्टर प्लॅन, ईलेक्ट्रिक टू-व्हिलर वापरल्यास 22 हजारांची बचत होणार

(Delhi govt launches social media handles of Switch Delhi campaign for EVs)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.