Mahindra Scorpio N : एकवेळ देव पावेल पण, स्कॉर्पिओ एनची डिलिव्हरी मिळणं कठीण
महिंद्रा स्कॉर्पिओ एनची डिलिव्हरी आता सप्टेंबर 2024 पर्यंत लांबणीवर गेली आहे. त्यामुळे ग्राहकांना अजून तब्बल दोन वर्ष कारची वाट बघावी लागणार आहे. परंतु आता असे बरेच ग्राहक असतील जे डिलिव्हरीसाठी इतका वेळ थांबू शकणार नाहीत. त्यामुळे आता असे ग्राहक 2,100 रुपये भरून त्यांचे बुकिंग रद्द करू शकतील.

एसयुव्ही (SUV) कार निर्मितीमध्ये महिंद्राचा हातखंडा आहे. कंपनी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून स्कॉर्पिओ एनची (Scorpio N) डिलिव्हरी सुरू करणार आहे. नवीन एसयूव्ही 6 आणि 7 सीटर पर्यायांसह उपलब्ध आहे. स्कॉर्पिओ एनची एक्सशोरूम किंमत बेस व्हेरियंटसाठी 11.99 लाख रुपयांपर्यंत असून टॉप व्हेरिएंटसाठी 23.90 लाख मोजावे लागणार आहेत. महिंद्राने 31 जुलै 2022 पासून स्कॉर्पिओ एनची अधिकृत बुकिंग (Booking) सुरू केली त्या वेळी सुरुवातीच्या 25,000 युनिट्स अवघ्या पाच मिनिटांत विकल्या गेल्या होत्या.
स्कॉर्पिओ एनच्या बंपर बुकिंगमुळे, त्याची डिलिव्हरीची तारीख सप्टेंबर 2024 पर्यंत पोहोचली आहे. तुम्ही बुकिंग केली असेल आणि आता तुम्ही इतका वेळ थांबू शकत नसल्यास, केवळ 2100 रुपये देऊन तुमचे बुकिंग रद्द करू शकता.
स्कॉर्पिओ एनचे फीचर्स
महिंद्र स्कॉर्पिओ एनचे बुकिंग ओपन झाल्यानंतर दीड तासात एक लाख एसयुव्हीचे बुकिंग झाले. स्कॉर्पिओ एन अनेक प्रकारांमध्ये उपलब्ध असून 2.0 लीटर mStallion पेट्रोल आणि 2.2 लीटर mHaw डिझेल इंजिन पर्यायांसह ऑफर केली जाते.
नवीन एसयुव्ही मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह उपलब्ध आहे. स्कॉर्पिओ एन Z2, Z4, Z6, Z8 आणि Z8L या एकूण पाच व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
डिलिव्हरी 2024 पर्यंत पोहचली
महिंद्रा स्कॉर्पिओ एनच्या बुकिंगने अनेक विक्रम मोडले आहेत. ऑटो वेबसाइट ‘गाडीवाडी’नुसार, एसयुव्हीची डिलिव्हरी तारीख सप्टेंबर 2024 पर्यंत पोहोचली आहे.
डीलर्सनीही वाहन बुक केलेल्या ग्राहकांना ई-मेल पाठवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये, Z4 आणि Z6 प्रकारांच्या वेटिंग ऑर्डरच्या डिलिव्हरीचे वेळापत्रक पाठवले जात आहे.
2,100 रुपयांचे बुकिंग रद्द
असे बरेच ग्राहक असू शकतात ज्यांना सप्टेंबर 2024 ची डिलिव्हरी तारीख मिळाली असेल. स्कॉर्पिओ एनच्या डिलिव्हरीसाठी दोन वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. परंतु काही ग्राहकांसाठी हे सोपे असणार नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी एक सुविधा आणली गेली आहे.
2,100 रुपये भरून त्यांचे बुकिंग रद्द करू शकतात. नवीन स्कॉर्पिओ एनमध्ये 8 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट आणि वायरलेस चार्जिंग सारखी फीचर्स मिळणार आहे.