Tata च्या गाड्यांवर 65000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट, Tiago, Harrier, Nexon चाही समावेश
विक्री वाढवण्यासाठी टाटा मोटर्स मे महिन्यात वेगवेगळ्या कार्सवर 65 हजार रुपयांपर्यंतची सवलत देत आहे. (Discount up to Rs 65000 on Tata cars)
मुंबई : देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. त्यामुळे देशातील अनेक ठिकाणी संचारबंधी किंवा लॉकडाऊन लावण्यासारखे निर्णय प्रशासनाने घेतले आहेत. याचा सर्वच व्यवसायांवर परिणाम होऊ लागला आहे. वाहन उद्योगावरही (Automobile Industry) त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. देशातील सर्वच वाहन कंपन्यांच्या विक्रीत घट झाली आहे. दरम्यान, विक्री कमी होत असतानाही टाटा मोटर्सने (Tata Motors) यावेळी आपल्या ब्रँडच्या मोटारींवर अनेक ऑफर सादर केल्या आहेत. रोख सवलतींव्यतिरिक्त एक्सचेंज बोनस ऑफर्स सादर करण्यात आल्या आहेत. विक्री वाढवण्यासाठी टाटा मोटर्स मे महिन्यात वेगवेगळ्या कार्सवर 65 हजार रुपयांपर्यंतची सवलत देत आहे. (Discount up to Rs 65000 on Tata cars, including Tiago, Harrier, Nexon)
टाटा मोटर्सने मे 2021 मध्ये Harrier, Tigor, Tiago , Nexon आणि Nexon EV या गाड्यांवर डिस्काउंट देऊ केला आहे. ऑटोकाराच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार टाटा हॅरियरवर 65 हजार रुपयांपर्यंतची सवलत मिळत आहे. Nexon इलेक्ट्रिक कारवर 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस ऑफर करण्यात आला आहे. Tata Tigor वर 30 हजार रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. दरम्यान, कंपनीने या महिन्यात त्यांच्या लोकप्रिय आणि सध्या बाजारात धुमाकूळ घालत असलेल्या Altroz आणि Safari या कार्सवर कोणतीही सवलत दिलेली नाही.
Tata Harrier चे फीचर्स
आपण Tata Harrier ही कार एकूण 9 व्हेरिएंटमध्ये खरेदी करू शकतो. ही कार सुरुवातीला फक्त डिझेल व्हेरिएंटमध्ये लाँच केली होती. या कारच्या बेस व्हेरिएंट हॅरियर XE डिझेल MT ची एक्स-शोरूम किंमत 13.84 लाख रुपये इतकी आहे. त्याच वेळी, टॉप व्हेरिएंट हॅरियर XZA+ डार्क एडिशन डीझेल AT ची एक्स-शोरूम किंमत 20.30 लाख रुपये आहे. या कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास यात 1956 सीसी 2.0-लीटर डिझेल इंजिन आहे, जे 170hp ची पॉवर आणि 350Nm ची टॉर्क जनरेट करते.
Nexon मध्ये खास बदल
टाटा कंपनीकडून नेक्सॉन आणि अल्ट्रॉजमधील काही फीचर्स कमी करण्यात आले आहेत. कंपनीने 7 इंचाच्या टचस्क्रीन सिस्टम व त्यावरील व्हेरिएंटमधून फिजिटल कंट्रोल बटणे काढली आहेत. दोन्ही मॉडेल्समध्ये त्याऐवजी दोन्ही वाहनांची नावं टाकली आहेत. ही बटणे काढल्यानंतर, डॅशबोर्डची रचना अगदी क्लीन झाली आहे परंतु काही युजर्सना ही बाब रुचणार नाही. तथापि, कंपनीने म्हटले आहे की, या बटणांचा वापर करताना ड्रायवर रस्त्यावर फोक्स करु शकत नाहीत.
संबंधित बातम्या
Coronavirus News Updates: देशात 15 दिवसांच्या लॉकडाऊनची शक्यता, कॅटची केंद्र सरकारकडे आग्रही मागणी
तिसऱ्या लाटेचा सामना करावाच लागणार, वीकेंड लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू बिनकामाचे; डॉ. गुलेरिया यांचा इशारा
(Discount up to Rs 65000 on Tata cars, including Tiago, Harrier, Nexon)