आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नाही द्यावी लागणार टेस्ट, वाचा काय आहे सरकारचा नवा नियम

आता फारसं सोपंही झालं असलं तरी आधी यासाठी खूप धावाधाव करायला लागायची. कार्यालयं फिरा, दलालांना शोधा.

आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नाही द्यावी लागणार टेस्ट, वाचा काय आहे सरकारचा नवा नियम
Follow us
| Updated on: Feb 06, 2021 | 10:01 AM

मुंबई : ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे मोठं कठीण काम कारण यासाठी गाडी चालवून परीक्षा दिली जाते. आता फारसं सोपंही झालं असलं तरी आधी यासाठी खूप धावाधाव करायला लागायची. कार्यालयं फिरा, दलालांना शोधा. पण आता सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देत ही प्रक्रिया ऑनलाईन केल्यामुळे जनतेचा त्रास कमी झाला आहे. यामध्ये आता नागरिकांसाठी आणखी सोयीच्या योजना आखण्यात येत आहेत. सरकार आता यामध्ये आणखी एक मोठा बदल करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी परीक्षा देणं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केलेल्या तरतूदीनुसार, वाहन चालवण्यासाठी आता कोणालाही ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही. (driving license online now no need to give test for driving license here know the govt new proposal)

म्हणजेच काय तर जर तुम्हाला ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरमधून गाडी शिकत असाल तर परवाण्यासाठी तुम्हाला टेस्ट देण्याची काही गरज नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयात या खास योजनेवर काम सुरू असून मंत्रालयाने यासाठी अधिसूचनाही जारी केल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार, ग्राहकांना सल्ला विचारला जाणार आहे.

ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्सला मान्यता

या योजनेंतर्गत मंत्रालय टेस्टसाठी ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्सला मान्यता देणार जेनेकरून ते त्याची अंमलबजावणी करतील. यासाठीदेखील मंत्रालयाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पण खास सेवेसाठी ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्सला सरकारने दिलेल्या नियमांचं पालन करणं महत्त्वाचं आहे. या योजनेबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती देणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

घर बसल्या रिन्यू करा वाहन परवाना (Driving License)

कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गामुळे (Corona epidemic) लोकांची अनेक कामं लांबणीवर पडली. पण आता सगळं काही पुन्हा सुरू झालं आहे. त्यामुळे आता महत्त्वाची ऑफिसं आणि व्यवहारही सुरू करण्यात आले आहेत. अशात जर तुम्हाला वाहन परवाना (Driving License) रिन्यू करायचा असेल तर तोदेखील आता सोप्या पद्धतीने करता येणार आहे. वाहन परवाना काढण्यासाठी आधी आरटीओच्या ऑफिसमध्ये जावं लागायचं. पण आता तुम्ही घर बसल्याही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करू शकता.

कोरोनाचा धोका आणि वाढती लोकांची गर्दी पाहता हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी फॉर्म डाऊनलोड करुन भरावा लागेल आणि मग स्कॅन करून अपलोड कारावा लागेल. इतकंच नाही तर जर तुमचं वय 40 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला डॉक्टरांनी भरलेला फॉर्म 1 ए आवश्यक असणार आहे. यामध्ये जुनं ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि आधार कार्ड फोटोदेखील अपलोड करावा लागणार आहे.

वाहन परवाना रिन्यू करण्यासाठी काय आहे पद्धत ?

– ऑनलाईन ड्रायव्हिंग परवाना रिन्यू करण्यासाठी सगळ्यात आधी भारत सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर https://parivahan.gov.in/parivahan/ जा.

– इथे गेल्यावर डावीकडील ऑनलाईन पर्यायावर क्लिक करा.

– यानंतर ‘सर्विसेस ऑन ड्राइविंग लाइसेंस’ वर क्लिक करा आणि पुढील दिलेली माहिती भरा.

– अर्जामध्ये दिलेली माहिती भरून कागदपत्रंही जोडा.

– अर्ज आणि कागदपत्रं भरल्यानंतल ऑनलाईन प्रोसेस पूर्ण होते.

– यानंतर काही दिवसांत ड्रायव्हिंग परवाना तुम्ही दिलेल्या पत्त्यावर येईल. (driving license online now no need to give test for driving license here know the govt new proposal)

संबंधित बातम्या –

Provident Fund वर कर कशासाठी? आपल्या पैशांचं काय होणार?, जाणून घ्या

Special Story : सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधताय तर ही योजना खास आहे, कमी पैशात मिळेल बक्कळ परतावा

तुमचंही ‘अर्थ’कारण बदलणार; वाचा, आरबीआयचे 8 मोठे निर्णय!

आता घर बसल्या रिन्यू करा ड्रायव्हिंग लायसन्स, खूप सोपी आहे पद्धत

(driving license online now no need to give test for driving license here know the govt new proposal)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.