Ducati Streetfighter V2 : अबब… डुकाटीची सर्वात स्वस्त बाईक स्कॉर्पिओपेक्षाही महाग…
Ducati Streetfighter V2 मध्ये Panigale V2 स्पोर्टबाईक प्रमाणेच इंजिन देण्यात आले आहे. त्या इंजिनची कार्यक्षमता Panigale V2 पेक्षा थोडी कमी असून एका रिपोर्टनुसार, अपकमिंग बाइक स्ट्रीटफाइटर या लाइनअपमधील सर्वात स्वस्त बाइक ठरणार आहे.
डुकाटीने (Ducati) स्ट्रीटफाइटर व्ही 2 (Streetfighter V2) ही बाईक भारतात लाँच केली आहे. नवीन स्ट्रीटफायटर बाईकची एक्सशोरूम किंमत 17.25 लाख रुपये आहे. डुकाटीने ही बाईक एका व्हेरिएंटमध्ये तसेच डुकाटी रेड कलर पर्यायासह लाँच केली आहे. भारतात डुकाटी स्ट्र्रीटफायटर व्ही 2 ही ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल, बीएमडब्ल्यू एफ 990 आर (BMW F 990 R) आणि Kawasaki Z900 सारख्या बाइक्सशी स्पर्धा करेल. स्ट्रीट फायटर V4 आणि V4S लाईनअपमध्ये नवीन बाईकचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे स्ट्रीटफायटर व्ही 2 ही त्याच्या लाइनअपमधील सर्वात स्वस्त बाइक ठरणार असल्याचे बोलले जात आहे. डुकाटीच्या नवीन स्ट्रीट फायटर बाईकच्या फीचर्सबाबत या लेखात चर्चा करणार आहोत.
- Streetfighter V2 ची डिझाईन Streetfighter V4 सारखीच आहे. म्हणूनच नवीन बाइकला V आकाराचे एलईडी डीआरएल देखील देण्यात आले आहे. डुकाटीने नवीन स्ट्रीट फायटरमध्ये मस्क्यूलर फ्युएल टँक, सिल्व्हर रेडिएटर कव्हर्ड, अंडरबेली एक्झॉस्ट सिस्टीम, सिंगल-साइड स्विंगआर्म, इंजिन काउल यासारख्या बाबी दिल्या आहेत. त्यामुळे ही बाईक अधिक प्रीमिअम दिसते.
- Ducati Streetfighter V2 बाईक 955 cc, ट्विन-सिलेंडर इंजिनसह येते. हे 90 डिग्री कॉन्फिगरेशनमध्ये बसवलेले असून त्याला डुकाटी सुपरक्वॅड्रो म्हटले जाते. या इंजिनला लिक्विड कूलिंग आणि डुकाटीची डेस्मोड्रोमिक व्हॉल्व्ह सिस्टम मिळते.
- नवीन स्ट्रीट फायटर बाइकला बाई-डायरेक्शन क्विकशिफ्टरसह 6 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. थ्रॉटल बॉडी राइड-बाय-वायर टेक्नीकद्वारे सहजपणे कंट्रोल केले जाते. इंजिनाव्यतिरिक्त, स्ट्रीटफाइटर V2 ची एक्झॉस्ट सिस्टम देखील Panigale V2 सारखीच आहे.
- Streetfighter V2 बाईकच्या सर्विससाठी 12,000 किमी राइडिंग किंवा 12 महिने सेट केले आहे. त्याच वेळी, प्रत्येक 24,000 किमी राइडिंगनंतर, व्हॉल्व्ह क्लिअरन्स तपासावा लागणार आहे. नवीन बाईकमध्ये स्पोर्ट, रोड आणि वेट असे तीन राइड मोड आहेत.
- बाईकची एक्सशोरूम किंमत 17.25 लाख रुपये आहे. त्याच वेळी, Cartrade वेबसाइटनुसार, Mahindra Scorpio Classic आणि Scorpio N च्या बेस व्हेरियंटची एक्सशोरूम किंमत 11.99 लाख रुपये आहे. त्यामुळे आपल्या लाइनअपमध्ये सर्वात स्वस्त असूनही, Streetfighter V2 दोन्ही स्कॉर्पिओ मॉडेल्सपेक्षा महाग आहे.
- Ducati Streetfighter V2 मध्ये 4.3-इंचाचा TFT डॅश आहे. डॅश युजर्सना कॉर्नरिंग एबीएस आणि ट्रॅक्शन कंट्रोल, व्हीली कंट्रोल, इंजिन ब्रेक कंट्रोल तसेच तीनही राइड मोडमध्ये टॉगल सारख्या विविध रायडर एड्स नियंत्रित करण्यास मदत करतो.
Non Stop LIVE Update