Hero: बाइक खरेदी करण्याच्या विचारात आहात? 1 जुलैपासून हिरो करणार दुचाकींच्या किंमतीत वाढ
दरवाढीचे कारण वाढती महागाई आणि कमोडिटीमध्ये झालेली वाढ आहे. या आधी टीव्हीएसने देखील आपल्या दुचाकींच्या किमतींमध्ये वाढ केली होती. दुचाकी निर्मिती करण्यासाठी लागत असलेल्या कच्च्या मालाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने त्याचा परिणाम स्वरुप दुचाकींच्या किंमतीदेखील वाढवण्यात येत आहेत.

दुचारी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्वाचे आहे. कारण हिरो मोटोकॉर्पने 1 जुलैपासून आपल्या दुचाकी वाहनांच्या किंमती वाढविण्याची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितले आहे, की पुढील महिन्यापासून आपल्या मोटरसायकल आणि स्कूटर्सच्या किंमतींमध्ये 3 हजार रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. कंपनी ही दरवाढ वाढती महागाई (Inflation), कच्च्या मालाच्या (Raw material) किंमतीत होणारी वाढ आदींमुळे करीत असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, कोणत्या दुचाकीची किंमत (Price) किती वाढवावी, हे मॉडेलवर आधारीत राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे जर तुम्हीही येत्या काही दिवसांमध्ये दुचाकी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर, याबाबतची अधिकची माहिती या लेखातून जाणून घ्या.
पीटीआयच्या एका रिपोर्टनुसार, कंपनीने सांगितलेय, की या दरवाढीचे कारण वाढती महागाई आणि कमोडिटीमध्ये झालेली वाढ आहे. या आधी टीव्हीएसने देखील आपल्या दुचाकींच्या किमतींमध्ये वाढ केली होती. दुचाकी निर्मिती करण्यासाठी लागत असलेल्या कच्च्या मालाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने त्याचा परिणाम स्वरुप दुचाकींच्या किंमतीदेखील वाढवण्यात येत आहेत.
एंट्री लेव्हल बाइक सेगमेंट
दरम्यान, देशात दुचाकी सेगमेंटमधील वाहनांमध्ये हिरो मोटोकॉर्प लोकप्रिय कंपनी आहे. याचे या सेगमेंटमध्ये मार्केट शेअर्सदेखील चांगले आहेत. कंपनीने एंट्री लेव्हल बाइक सेगमेंटमध्ये चांगली पकड मजबूत केली असून हिरोची एंट्री लेव्हलमधील सर्वाधिक स्वस्त बाइक HF100 ची सुरुवातीची किंमत 51450 रुपयांपासून सुरु होते. तर दुसरीकडे Xpulse 200 4V ची किंमत 1.32 रुपयांपर्यंत जाते.




स्प्लेंडर सर्वाधिक विक्री होणारी बाइक
हिरोची सर्वाधिक विक्री होणारी बाइक स्प्लेंडर आहे. मे 2022 मध्ये कंपनीने या बाइकची एकूण 262249 युनिटची विक्री केली आहे. यात स्प्लेंडर प्लसच्या 228495 युनिटच्या शिवाय स्प्लेंडर आईस्मार्ट आणि सुपर स्प्लेंडरच्या एकूण 33754 युनिटची विक्रीची नोंद आहे. स्प्लेंडरची सुरुवातीची एक्सशोरुम किंमत 69380 ते 79600 रुपये इतकी आहे.