सिंगल चार्जमध्ये 120KM रेंज, EeVe Soul हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, किंमत…

भारतीय ग्राहकांमध्ये दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढत आहे, विशेषतः दुचाकी सेगमेंटमध्ये ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. देशात इलेक्ट्रिक दुचाकींना मागणी वाढली आहे, त्यामुळे विविध वाहन कंपन्या या सेगमेंटमध्ये आपापली वाहनं लाँच करत आहेत.

सिंगल चार्जमध्ये 120KM रेंज, EeVe Soul हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, किंमत...
EeVe Soul electric scooter
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 4:51 PM

EeVe Soul Electric Scooter India : भारतीय ग्राहकांमध्ये दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढत आहे, विशेषतः दुचाकी सेगमेंटमध्ये ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. देशात इलेक्ट्रिक दुचाकींना मागणी वाढली आहे, त्यामुळे विविध वाहन कंपन्या या सेगमेंटमध्ये आपापली वाहनं लाँच करत आहेत. देशातील वाढती मागणी लक्षात घेऊन प्रत्येक ऑटो कंपनी नवनवीन इलेक्ट्रिक वाहनं सादर करत आहे. दरम्यान, आता, EeVe India ने सोल (Soul) नावाची आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्याची घोषणा केली आहे. (EeVe Soul high-speed electric scooter launched with 120-km range in single charge)

नवीन सोल ई-स्कूटरची किंमत 1.39 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे आणि कंपनीचा दावा आहे की, ही किंमत ‘युरोपियन तंत्रज्ञान’ स्टँडर्ड्सवर आधारित आहे. EeVe India ही भारतातील उत्तम इलेक्ट्रिक स्कूटर/टू व्हीलर कंपनी आहे जी कोलकाता आणि मुंबई येथे आहे. तसेच, ही कंपनी उत्सर्जन मुक्त (एमिशन फ्री) इलेक्ट्रिक स्कूटर आणि दुचाकींचे उत्पादन करते.

EeVe India कंपनीने अलीकडेच जाहीर केले आहे की, नवीन उत्पादने सादर करण्यासाठी, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी आणि सेल्स नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी पुढील दोन वर्षांमध्ये 1,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची त्यांची योजना आहे.

EeVe Soul ची रेंज आणि चार्जिंग

ईव्ही सोलमध्ये (Eeve Soul) IoT इनेबल्ड, अँटी-थेफ्ट लॉक सिस्टम, GPS नेव्हिगेशन, यूएसबी पोर्ट, कीलेस एक्सपीरियन्स, रिव्हर्स मोड, सेंट्रल ब्रेकिंग सिस्टम, जिओटॅगिंग आणि जिओ-फेन्सिंग यांसारखे स्मार्ट फिचर्स देण्यात आले आहेत. ही स्कूटर तीन वर्षांच्या वॉरंटीसह देशात लॉन्च करण्यात आली आहे. स्कूटर इलेक्ट्रिक मोटरसह येते जी अॅडव्हान्स्ड लिथियम फेरस फॉस्फेट (LFP) स्वॅपेबल/डिटेचेबल बॅटरीद्वारे चालविली जाते.

ही स्कूटर 0-100% पर्यंत चार्ज होण्यासाठी जवळपास 3-4 तास लागतात असे म्हटले आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड 60 किमी प्रतितास इतका आहे आणि ही स्कूटर एकदा संपूर्ण चार्ज केल्यानंतर 120 किमीपर्यंतची रेंज देते.

या स्कूटरच्या लाँचिंगवेळी कंपनीचे सह-संस्थापक आणि ईव्ही इंडियाचे संचालक हर्षवर्धन डिडवानिया म्हणाले की, “इव्ही इंडिया भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटी अनुभवामध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी काम करत आहे. ज्याद्वारे भविष्यातील पर्यावरणीय चिंता दूर करता येतील आणि स्वच्छ, सुरक्षित वातावरण तयार होईल. आमची लेटेस्ट EeVe इलेक्ट्रिक स्कूटर कार्बन फूटप्रिंट आणि सतत वाढणाऱ्या इंधनाच्या किमती कमी करण्यात मदत करण्यासाठी हायस्पीड, स्टायलिश आणि त्रासमुक्त आहे.

इतर बातम्या

TVS Ntorq 125 चं स्पेशल Marvel Spider-Man एडिशन भारतात लाँच, जाणून घ्या नव्या स्कूटरमध्ये काय आहे खास?

Zoomcar : तुमच्याकडे कार आहे का? महिन्याला कमवा 20 ते 30 हजार; कसे ते वाचा…

टाटा मोटर्सची ईयर-एंड ऑफर, Tiago ते Safari पर्यंतच्या गाड्यांवर 65,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट

(EeVe Soul high-speed electric scooter launched with 120-km range in single charge)

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....