2021 मध्ये ‘या’ शानदार इलेक्ट्रिक कार लाँच होणार, कमी किंमतीत दमदार फिचर्स

2021 मध्ये अनेक दिग्गज कार कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत.

2021 मध्ये 'या' शानदार इलेक्ट्रिक कार लाँच होणार, कमी किंमतीत दमदार फिचर्स
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 5:57 PM

मुंबई : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज कार कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स लाँच करत आहेत. (Electric car will launch in 2021 in India)

बंगळुरूची इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी Pravaig Dynamics ने त्यांच्या आगामी इलेक्ट्रिक कार प्रॅवाइग एक्सटिन्शन एमके 1 (Pravaig Extinction Mk1) लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. नुकतीच कंपनीने या कारबाबतची काही माहिती सादर केली आहे. 2021 च्या सुरूवातीला ही कार लॉन्च होऊ शकते. विशेष म्हणजे ही कार एकदा चार्ज केल्यानंतर 500 किमीपर्यंत धावेल असा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे कारप्रेमींच्या मनात ही कार नक्की बसणार असं बोललं जात आहे.

30 मिनिट चार्ज केल्यानंतर ही कार तब्बल 300 किलोमीटरपर्यंत धावेल. Pravaig Dynamics ने म्हटलं आहे की, या कारचा कमाल वेग 196 किलोमीटर प्रति तास इतका आहे. ही कार अवघ्या 5.4 सेकंदांमध्ये 0 ते 100 किलोमीटर प्रति तास इतका स्पीड पकडते. सोबतच भारतातील आघाडीच्या कार कंपन्याही लवकरच इलेक्ट्रिक कार्स लाँच करणार आहेत. महिंद्रा आणि मारुती सुझुकी या दोन भारतीय कंपन्या इलेक्ट्रिक कार्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत.

Maruti WagonR electric

Maruti WagonR electric या कारमध्ये Lithium-Ion Battery चा वापर केला जाणार आहे. त्यामुळे या बॅटरीवरील खर्च काही प्रमाणात कमी होणार आहे. या कारबाबतचे जे रिपोर्ट्स समोर आले आहेत, त्यानुसार ही कार एकदा चार्ज केल्यानंतर 150 किलोमीटरपर्यंत धावेल. एका तासात या कारमधील बॅटरी 80 टक्के चार्ज करता येईल. WagonR electric ही कार यावर्षी टेस्टिंगदरम्यान पाहायला मिळाली होती. ही कार पुढील वर्षी लाँच केली जाऊ शकते. या कारची किंमत 8 लाख रुपयांच्या आसपास असेल, असं म्हटलं जात आहे.

Mahindra EKUV100

महिंद्रा कंपनी Mahindra EKUV100 ही कार 8.25 लाख रुपये इतक्या किंमतीत लाँच करण्याची शक्यता आहे. असा दावा करण्यात आला आहे की, ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असेल. या कारमध्ये लिक्विड कूल्ड बैटरी पॅक आहे. ही बॅटरी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्यामुळे अवघ्या 55 मिनिटांमध्ये ही कार 80 टक्के चार्ज होईल. यामध्ये 15.9 किलोवॅटची लिक्विड कूल मोटर देण्यात आली आहे, जी 54Ps पॉवर आणि 120NM टॉर्क जेनरेट करते.

Mahindra XUV300 Electric

महिंद्रा कंपनीने त्यांची Mahindra XUV300 Electric कार या वर्षी ऑटो एक्सपो मध्ये सादर केली होती. कंपनी आता ही कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही एसयूव्ही 40kWh (स्टँडर्ड) आणि 60kWh (लाँग रेंज) बॅटरी ऑप्शनसह लाँच केली जाऊ शकते. कंपनीने दावा केला आहे की, एकदा चार्ज केल्यानंतर ही कार 370 ते 450 किलोमीटरपर्यंत धावेल. या कारची किंमत तब्बल 15 ते 29 लाख रुपये असू शकते.

संबंधित बातम्या

देशात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढली, टाटा मोटर्सच्या Nexon EV च्या 2,200 युनिट्सची विक्री

पेट्रोल पंपप्रमाणेच इलेक्ट्रिक गाड्यांसाठी ‘चार्जिंग’ स्टेशन उघडणार, चार्जिंगसाठी येणार ‘इतका’ खर्च!

2021 मध्ये येणार जबरदस्त इलेक्ट्रिक कार, एकदाच चार्ज करून 500 किमी धावणार

(Electric car will launch in 2021 in India)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.