compact suv: भारतातील ‘टॉप 5’ कॉम्पॅक्ट एसयुव्ही विक्रीत आहे सुसाट, यातील तुमची आवडती कोणती?

देशात कॉम्पॅक्ट एसयुव्हीची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वच कार निर्माता कंपन्यांनी आपले एक-एक व्हेरिएंट कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमध्ये बाजारात आणण्याची रणनीती आखली आहे. परंतु या सेगमेंटमध्ये काहीच प्रोडक्ट चांगली गुणवत्ता सिध्द करु शकले आहेत.

compact suv: भारतातील ‘टॉप 5’ कॉम्पॅक्ट एसयुव्ही विक्रीत आहे सुसाट, यातील तुमची आवडती कोणती?
compact suvImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 11:52 AM

सब 4 मीटर कॉम्पॅक्ट एसयुव्ही (compact suv) स्पेस भारतीय ऑटोमोबाईल (Automobile) क्षेत्रामध्ये सर्वात आवडता सेगमेंट आहे. त्यामुळे आता जवळपास सर्वच कार निर्माता कंपन्यांनी याकडे आपला मोर्चा वळवत या सेगमेंटमधील कारवर फोकस केल आहे. देशात कॉम्पॅक्ट एसयुव्हीची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वच कार निर्माता कंपन्यांनी आपले एक-एक व्हेरिएंट कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमध्ये बाजारात आणण्याची रणनीती आखली आहे. परंतु या सेगमेंटमध्ये काहीच प्रोडक्ट चांगली गुणवत्ता सिध्द करु शकले आहेत. या वर्षी एप्रिलमध्ये भारतीय बाजारात हॅचबॅकनंतर (Hatchback) दुसरी आवडती बॉडी स्टाईल एसयुव्ही राहिली आहे. या लेखात आपण भारतात सर्वाधिक विक्री होणार्या ‘टॉप 5’ कॉम्पॅक्ट एसयुव्हीबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

टाटा नेक्सॉन

या वर्षी एप्रिलमध्ये 13471 युनिट्‌सची विक्री झाली. ही भारतातील सर्वाधिक विक्री होणारी एसयुव्ही कार ठरली आहे. नेक्सॉन ही कार भारतातील टॉप 3 सर्वाधिक विक्री होणार्या कारपेकी एक ठरली आहे. विक्रीच्या बाबतीत नेक्सॉनने अनेक हॅचबॅक कार्सलाही मागे टाकले आहे. ग्राहकांच्या पसंतीला पडलेली नेक्सॉन भारतातील सर्वाधिक लोकप्रिय एसयुव्ही ठरली आहे.

मारुती सुझुकी विटारा ब्रेझा

मारुती सुझुकीची विटारा ब्रेझा गेल्या महिन्यात 11764 युनिट्‌सची विक्री झाली होती. या कारने दर वर्षी किमान 5 टक़्के पॉझिटीव्ह ग्रोथ मिळवली आहे. पॉवरट्रेनबाबत बोलायचे झाल्यास मारुती विटारा ब्रेझाला आतासाठी केवळ एक डिझेल इंजिन मॉडेलसह सादर करण्यात येत आहे. 1.3 लीटर, चार सिलेंडर DDis 200 ला 4000 rpm वर 89 bhp ची पावर सोबत 1750 rpm वर 200 Nm चा टॉर्क जनरेट करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. या कारमध्ये 5 स्पीड मॅन्यूअल गिअरबॉक्ससोबत जोडण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

ह्युंडाई व्हेन्यू

या वर्षी एप्रिलमध्ये 8392 युनिट्‌सची विक्रीसह भारतातील तिसरी सर्वाधिक विक्री होणारी एसयुव्ही सेगमेंटमधील का ठरली आहे. वेन्यू तीन इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. 1 लीटर टर्बो आणि 1.2 लीटर पेट्रोल पॉवरट्रेनसह 1.4 लीटर डिझेल इंजिन पर्यायासह व्हेन्यू उपलब्ध आहे. किंमतीचा विचार केल्यास ही कार क्रेटापेक्षा स्वस्त आहे. पेट्रोल व्हेरिएंटची किंमत 6.5 ते 11.1 लाखा दरम्यान आहे. डिझेलमध्ये किंमत 7.75 ते 10.84 लाख रुपये आहे.

किआ सोनेट

किआने मागील महिन्यात भारतात किआ सोनेटचे 5404 युनिट्‌ची विक्री केली होती. किआ सानेट एसयुव्ही हाईटेक डिजिटल डिसप्ले आणि इंस्ट्रूमेंट क्लस्टरसह उपलब्ध आहे. सोनेट ड्राईव्हर्सना स्टीयरिंग व्हील-माउंटेड कंट्रोल आणि विविध ड्रायव्हिंग आणि ट्रॅक्शन मोडचा पर्याय निवडण्यास मदत करते.

महिंद्रा एक्सयुव्ही 300

महिंद्रा एक्सयुव्ही 300 ने मागील महिन्यात एकूण 3909 युनिट्‌सची विक्रीसह भारतात पाचव्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी एसयुव्ही कार ठरली आहे. नवीन एक्सयुव्ही 300 सेगमेंटची सर्वात नवीन सब कॉम्पॅक्ट एसयुव्ही ठरली आहे. एक्सयुव्ही 300 पेट्रोल आणि डिझेलसाठी चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.