भारताने नाकारली; जगाने स्वीकारली, एका वर्षात फोर्ड कारच्या 7.26 लाख युनिट्सची विक्री

जगातील विविध देशांची संस्कृती वेगवेगळी आहे. खाण्यापिण्याच्या सवयींपासून ते कपड्यांपर्यंत ही विविधता दिसून येते. वेगवेगळ्या देशांमध्ये कारच्या बाबतीत लोकांची पसंती वेगवेगळी असते. आजकाल भारतात SUV ची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे

भारताने नाकारली; जगाने स्वीकारली, एका वर्षात फोर्ड कारच्या 7.26 लाख युनिट्सची विक्री
Ford F Series (Photo : Ford)
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 6:12 PM

मुंबई : जगातील विविध देशांची संस्कृती वेगवेगळी आहे. खाण्यापिण्याच्या सवयींपासून ते कपड्यांपर्यंत ही विविधता दिसून येते. वेगवेगळ्या देशांमध्ये कारच्या बाबतीत लोकांची पसंती वेगवेगळी असते. आजकाल भारतात SUV ची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे, परंतु भारतीय समाजाची रचना आणि आर्थिक स्थितीमुळे, लहान कार अजूनही भारतात सर्वाधिक विकल्या जाणार्‍या कार (Top Selling Car in India) आहेत. त्याचप्रमाणे, हॅचबॅक (Hatchback) युरोपियन देशांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहेत, तर अमेरिकन नागरिक पिकअप ट्रकला (Pickup Truck) प्राधान्य देतात. जगातील सर्वाधिक विकली जाणारी कार देखील एक पिकअप आहे.

अमेरिकेतील बाजारात अव्वल असणारी फोर्ड कार जगभरात सर्वात जास्त विकली जाणारी कार ठरली आहे. ऑटो क्षेत्रातील डेटा विश्लेषण कंपनी JATO Dynamics ने विविध देशांतील कारच्या विविध निवडीबाबत एक मनोरंजक अहवाल तयार केला आहे. या रिपोर्टनुसार, अमेरिकेतील लोकांची पहिली पसंती पिकअप ट्रकला आहे. गेल्या वर्षी अमेरिकन लोकांनी फोर्ड एफ सीरिजच्या (Ford F Series) 7,26,004 युनिटसची खरेदी केली होती. अशा प्रकारे फोर्ड एफ-सिरीज जगातील सर्वाधिक विकली जाणारी कार बनली आहे.

भारताने नाकारली जगाने स्वीकारली

फोर्ड ही कंपनी भारतात अपयशी ठरली. कंपनीच्या एकाही कारला भारतीयांनी डोक्यावर घेतलं नाही. Ford F Series कंपनीने भारतात लाँच केली नव्हती. मात्र ज्या गाड्या सादर केल्या, त्यांनादेखील भारतीय ग्राहकांनी जेमतेम पसंती दर्शवली. त्यामुळे फोर्डला भारतातून गाशा गुंडाळावा लागला. त्याचबरोबर अद्याप भारतीय बाजारात पिकअप ट्रक किंवा कार्सना भारतीयांनी कधीही पसंती दर्शवलेली नाही. सध्या भारतात टोयोटा आणि इसुझू या कंपनयांचे पिकअप ट्रक उपलब्ध आहेत.

मारुती वॅगनआरला भारतीयांची पसंती

दुसऱ्या स्थानावर भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार मारुती सुझुकी वॅगनआर आहे. 2021 मध्ये भारतात WagonR च्या 1,83,851 युनिट्सची विक्री झाली. भारतात, लोक अजूनही कार खरेदी करताना किमतीच्या घटकामुळे सर्वाधिक प्रभावित होतात. विशेषत: कोरोना महामारीमुळे वैयक्तिक गाड्यांची भूमिका बदलली आहे. आता वैयक्तिक कार ही लक्झरी नसून गरज बनली आहे. या कारणांमुळे भारतीय बाजारपेठेत छोट्या कारचा बोलबाला आहे आणि मारुतीला यामध्ये कोणीही टक्कर देऊ शकत नाही.

रशियात Lada Vesta तर ब्राझीलमध्ये फियाट स्ट्राडाचा बोलबाला

इतर देशांपैकी, रशियामध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार Lada Vesta आहे. 2021 मध्ये रशियन लोकांनी या कारच्या 1,13,698 युनिट्स खरेदी केल्या आहे. ब्राझिलियन लोकांना फियाटची स्ट्राडा कार सर्वात जास्त आवडते आणि त्यांनी गेल्या वर्षी ब्राझीलमध्ये फियाट स्ट्राडाच्या 1,09,107 युनिट्सची विक्री झाली आहे.

इतर बातम्या

Budget 2022 : इलेक्ट्रिक वाहनं कमी व्याजदरासह खरेदी करता येणार? अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी SMEV मागण्या सादर

Budget 2022 : सेकेंड हँड वाहने स्वस्त होणार? Used Cars वरील GST दर कमी करण्याची ऑटोमोबाईल डीलर्सची मागणी

Budget 2022 : दुचाकी स्वस्त होणार? GST कमी करण्याची ऑटोमोबाईल डीलर्सची मागणी

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....