वाहन चालक लक्ष द्या! ‘ही’ गोष्ट विसरलात तर टोल नाक्यावर नाही मिळणार एन्ट्री

वाहनधारकाला 15 फेब्रुवारीनंतरही फास्टॅग न मिळाल्यास त्याला प्रवासाचा त्रास सहन करावा लागणार आहे.

वाहन चालक लक्ष द्या! 'ही' गोष्ट विसरलात तर टोल नाक्यावर नाही मिळणार एन्ट्री
उद्यापासून फास्ट टॅग अनिवार्य
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 8:25 AM

मुंबई : सर्व गाड्यांना 1 जानेवारी 2021 पासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आलं आहे. पण यानंतर सरकारने याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारीपर्यंत वाढवली होती. जी आता जवळ आली आहे. अशा परिस्थितीत वाहनधारकाला 15 फेब्रुवारीनंतरही फास्टॅग न मिळाल्यास त्याला प्रवासाचा त्रास सहन करावा लागणार आहे. (from 15th february 2021 no vehicle will get permission on toll plaza without fastag)

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) दिलेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या सुरूवातीला त्यांनी जाहीर केलं होतं की 1 जानेवारी, 2021 पासून टोल बूथवर रोख भरणा किंवा इतर कोणत्याही देय पद्धती स्वीकारल्या जाणार नाहीत. एनएचएआयच्या म्हणण्यानुसार, सध्याचा टोल पेमेंटमध्ये फास्टॅगचा हिस्सा सुमारे 75 ते 80 टक्के आहे जो सरकारला 100 टक्के करायचा आहे. यामुळे सरकार 15 फेब्रुवारीनंतर याची मुदत वाढवणार नाहीत.

फास्टॅग म्हणजे काय?

वाहनाच्या विंडो स्क्रीनला लावलेल्या स्टिकरला फास्टॅग म्हणतात. याचे डिव्हाईस रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजीद्वारा वापर करते. ते थेट टोल नाक्यावरील स्कॅनरला कनेक्ट असंत. त्यामुळे तुमच्या अकाऊंटमधील पैसे कापले जातात. अशा वेळी तुमच्या गाडीला फास्टॅग लावलेला असेल तर कोणत्याही विलंबाशिवाय तुम्ही टोलनाक्यावरून निघून जाऊ शकता. हे फास्टॅग तुम्ही तुमच्या वॉलेट, डेबिट किंवा क्रेडिट कार्डशी जोडू शकता. त्यामुळे जिथे टोल भरण्याची गरज आहे, त्या टोल नाक्यावर तुमच्या अकाऊंटमधून आपोआप पैसे कट होतात.

फास्टॅग कुठे खरेदी कराल? कसे रिचार्ज कराल?

NHAI आणि 22 वेगवेगळ्या बँकेतून तुम्ही फास्टॅग खरेदी करू शकता. पेटीएम, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफार्मवरही ते उपलब्ध आहे. त्याशिवाय Fino Payments Bank आणि Paytm Payments Bank कडूनही फास्टॅग दिलं जातं. जर फास्टॅग NHAI प्रीपेड वॉलेटशी कनेक्ट असेल तर चेकच्या माध्यमातून यूपीआय/ डेबिट कार्ड/ क्रेडिट कार्ड/ NEFT/नेट बँकिंग आदींच्या माध्यमातून रिचार्ज केलं जातं. जर बँक खात्याशी फास्टॅग लिंक असेल तर तुमच्या खात्यातून थेट पैसे कट होतील. जर Paytm वॉलेटला फास्टॅग कनेक्ट असेल तर त्यातून थेट रक्कम कापली जाते (FASTag To Be Mandatory For All Vehicles).

किती रिचार्ज करणार? वैधता किती?

तुमच्या फास्टॅग अकाऊंटमध्ये तुम्हाला किमान 100 रुपये ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक बँक त्यांच्या हिशोबाने रक्कम कट करेल. जर तुम्ही 200 रुपयांत एखाद्या बँकेतून फास्टॅग खरेदी केला तर तुम्हाला करही भरावा लागणार आहे. फास्टॅगची वैधता नसते.

फास्टटॅगशिवाय मार्गिकेत घुसल्यास?

तुमच्याकडे फास्टॅग नसेल तर तुम्हाला कोणीच मार्शल लाईनमध्ये घुसू देणार नाही. जर तुम्ही चुकून फास्टॅगच्या मार्गिकेत घुसल्यास तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागणार आहे. (from 15th february 2021 no vehicle will get permission on toll plaza without fastag)

संबंधित बातम्या – 

Petrol Diesel Price Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल स्वस्त की महाग? वाचा आजचे दर

FASTag | आता व्हॉट्सॲपसह ‘या’ पाच पर्यायद्वारे बनवू शकता FASTag, वाचा सोपे पर्याय

FasTag | फास्टॅगमधून चुकून दोनवेळा पैसे गेले? घाबरू नका ‘असे’ मिळतील परत!

(from 15th february 2021 no vehicle will get permission on toll plaza without fastag)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.