G20 च्या पाहुण्यांसाठी खास जर्मनीहून मागवली कार, किंमत ऐकून व्हाल अवाक
G20 Summit : 'या' कारच खास वैशिष्ट्य काय आहे? भारताची राजधानी दिल्लीत G20 परिषद होत आहे. त्यासाठी ही कार मागवण्यात आली आहे. अनेक महागड्या कारसची मागणी वाढली आहे. या कारच एकदिवसाच भाडच प्रचंड आहे.

नवी दिल्ली : भारतात G20 शिखर परिषद होत आहे. जगातील 20 वेगवेगळ्या शक्तीशाली देशांचे प्रतिनिधी आणि प्रमुख या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीला येत आहेत. राजधानी दिल्लीत ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला येणाऱ्या पाहुण्यांच्या प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात लग्जरी कार हायर करण्यात आल्या आहेत. दिल्लीमध्ये अचानक लग्जरी कारची मागणी वाढली आहे. जर्मनीहून एक स्पेशल कार मागवण्यात आली आहे. या कारची किंमत 3.50 कोटी रुपये आहे. जर्मनीहून मागवण्यात आलेली ही कार अनेक Advance फिचर्सनी सुसज्ज आहे.
पुनिया ट्रॅव्हल्सचे मालक हरमनजीत सिंह पुनिया यांनी जर्मनीहून ही कार मागवली आहे. हरमनजीत यांच्या ट्रॅव्हल एजन्सीकडे 300 पेक्षा अधिक लक्जरी कारस आहेत. G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर हरमनने जर्मनीहून खास साडेतीन कोटी रुपयांची मेबॅक कार मागवली आहे. या कारसाठी दीड वर्षापासून वेटिंग आहे. पण G20 परिषदेसाठी म्हणून ही कार लवकर मागवण्यात आली. परदेशी पाहुण्यांना आरामदायी कम्फर्ट फिल झाला पाहिजे. म्हणून ही कार मागवण्यात आली आहे, असं हरमनने सांगितलं. G20 साठी मागवलेल्या या कारच प्रतिदिवसाच भाडं 1 लाख रुपये आहे.
या कारची खासियत काय?
जर्मनीहून मागवण्यात आलेली हा कार भारतातील महागड्या कारसपैकी एक आहे. यात अनेक हायटेक फिचर्स आहेत. या कारच वैशिष्ट्य म्हणजे या कारच दरवाजे हाताच्या इशाऱ्याने उघडतात. कारमध्ये 20 वेगवेगळ्या प्रकारचे सुगंध आहेत. त्यामुळे गाडीत सतत सुगंध दरवळत राहतो. कारच्या मागच्या सीटवर मसाज होते. या कारच सनरुफ सेंसर हाताच्या इशाऱ्याने उघडतं. फक्त एका बटनने मागची सीट रिक्लायनरमध्ये बदलते.
या गाडीत एक टॅब आहे, त्याने काय होतं?
कारमध्ये बसणाऱ्या पाहुण्यांसाठी महागडं मिनरल वॉटर कारमध्ये ठेवण्यात आलं आहे. कारमध्ये हायटेक स्पीकर आहेत. त्याशिवाय कारमध्ये एक टॅब आहे, त्याआधारे मागे बसणारा व्यक्ती गाडीचा कंट्रोल आपल्या हातामध्ये ठेवू शकतो. ही कार सहा दिवसांसाठी सरकारने एका खासगी ट्रॅव्हल एजन्सीकडून भाड्यावर घेतली आहे. कुठल्या कार्सची मागणी वाढली
दिल्लीमध्ये G20 मुळे महागडया कार्सची मागणी वाढली आहे. 20 पेक्षा जास्त सदस्य देश आणि नऊ विशेष आमंत्रित देश बैठकीत सहभागी होणार आहेत. आयोजनाच्यावेळी 1`हजारपेक्षा अधिक लग्नरी कारची गरज भासू शकते. G20 मुळे ज्या लग्जरी कार्सची मागणी वाढलीय, त्यात मर्सिडीज एस क्लास, बीएमडब्ल्यू 7 सीरीज, मिर्सिडीज ई क्लास, बीएमडब्ल्यू 5 सीरीज या कारस आहेत.