ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये Renault Triber पास की नापास?
रेनॉल्ट ट्रायबरने ग्लोबल एनसीएपीने (Global NCAP) घेतलेल्या क्रॅश टेस्टमध्ये अॅडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शनमध्ये 4 स्टार रेटिंग मिळवलं आहे.
Renault Triber Crash Test : मेड इन इंडिया रेनॉल्ट ट्रायबरने (Renault Triber) ग्लोबल एनसीएपीने (Global NCAP) घेतलेल्या क्रॅश टेस्टमध्ये अॅडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शनमध्ये 4 स्टार रेटिंग मिळवलं आहे. ग्लोबल एनसीएपी ‘सेफ कार्स फॉर इंडिया’ हा उपक्रम 2014 पासून कार्यरत आहे. या कार्यक्रमांतर्गत सुरक्षा परीक्षकाद्वारे चाळीसहून अधिक भारतीय निर्मिती असलेल्या वाहनांची चाचणी घेण्यात आली आहे. (Global NCAP Crash Test : Renault Triber Pass or Fail?)
रेनॉल्ट ट्रायबर ही 2021 क्रॅश टेस्टसाठी निवडलेली पहिली कार आहे. लहान मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीत (चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शन) रेनॉल्ट ट्रायबरला 3 स्टार रेटिंग मिळालं आहे. किफायतशीर मास-मार्केट प्रोडक्ट असलेल्या या कारचा क्रॅश टेस्टमधील स्कोर चांगला आहे. ही बाब रेनॉल्ट कंपनीसाठीसुद्धा महत्त्वाची आहे. कारण यापूर्वी कंपनीच्या क्विड, डस्टर आणि लॉजी या गाड्यांना क्रॅश टेस्टमध्ये चांगलं रेटिंग मिळालं नव्हतं.
कशी आहे नवी 2021 Renault Triber MPV
नवीन Triber MPV लुक, फीचर्स आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत पूर्वीपेक्षा अधिक दमदार आहे. यामध्ये, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल फीचर्स उपलब्ध असतील, ज्याच्या मदतीने आपण कॉल घेण्यास किंवा ऑडिओ नियंत्रित करण्यास सक्षम असाल. या व्यतिरिक्त चालकाच्या जागेसाठी हाइट अॅडजेस्टमेंट फीचर, ड्युअल टोन एक्सटीरियर, एलईडी टर्न इंडिकेटर्स आणि नवीन Cedar Brown कलर देण्यात आला आहे. 2021 रेनॉ ट्रायबरची (2021 Renault Triber) सुरुवातीची किंमत 5.30 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
2021 Renault Triber चं इंजिन आणि फीचर्स
या कारच्या पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने या कारमध्ये 1.0 लीटरचे थ्री सिलेंडर पेट्रोल इंजिन दिलं आहे. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येतं. हे इंजिन 70 बीएचपीची मॅक्झिमम पॉवर आणि 96 एनएम पीक टॉर्क जनरेट करते.
2021 Renault Triber च्या थर्ड रोमध्ये फोल्डेबल सीट देण्यात आली आहे, ज्याद्वारे लगेजसाठी स्पेस वाढवता येईल. सीट फोल्ड केल्यानंतर या कारमध्ये 625 लीटर बूट स्पेस तयार होईल. तसेच जर एखाद्या ग्राहकाची इच्छा असल्यास तो ही सीट हटवू शकतो, कारण या सीट्स डिटॅचेबल आहेत. तसेच कंपनीने या एमपीव्हीच्या टॉप मॉडलमध्ये 8 इंचांची इन्फोटेन्मेंट सिस्टिम आणि 4 एयरबॅग्ससह क्लायमेट कंट्रोल देण्यात आलं आहे.
चार व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध
रेनॉ ट्रायबर एमपीव्ही (Renault Triber MPV) ही कार चार व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. यामध्ये RXE, RXL, RXT आणि RXZ या व्हेरिएंट्सचा समावेश आहे. या कारचं बेस बेस व्हेरिएंट असलेल्या RXE व्हेरिएंटची किंमत 5.30 लाख रुपये इतकी आहे, तर टॉप मॉडेल असलेल्या RZX AMT व्हेरिएंटसाठी 7.65 लाख रुपये मोजावे लागतील. या कारचं मिड रेंज मॉडल असलेल्या RXL व्हेरिएंटसाठी कंपनीने 5.99 लाख रुपये ही किंमत निश्चित केली आहे. या कारच्या ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत 6.50 लाख रुपये इतकी ठेवण्यात आहे. याशिवाय RXT च्या मॅन्युअल मॉडेलची किंमत 6.50 लाख रुपये आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत 7.05 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. या कारचे बेस मॉडेल केवळ मॅन्युअल ट्रान्समिशन गीयरबॉक्ससह येते.
इतर बातम्या
5 लाखांहून कमी किंमतीत दमदार फीचर्स, Hyundai ची छोटी SUV बाजारात धुमाकूळ घालणार?
कोरोना काळातही Mahindra च्या ‘या’ कारची घोडदौड सुरुच, बुकिंग्सचे रेकॉर्ड मोडीत
Mahindra Thar ला टक्कर, Maruti Suzuki ची 5-डोर SUV सज्ज, जाणून घ्या काय असेल खास?
(Global NCAP Crash Test : Renault Triber Pass or Fail?)