कार्सपाठोपाठ बाईक-स्कूटरदेखील महागणार, हिरो मोटोकॉर्पकडून Price Hike ची घोषणा

पुढील महिन्यापासून केवळ कार कंपन्याच नाहीत तर दुचाकी वाहन उत्पादक कंपन्यांनीदेखील दुचाकींच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे.

कार्सपाठोपाठ बाईक-स्कूटरदेखील महागणार, हिरो मोटोकॉर्पकडून Price Hike ची घोषणा
Hero MotoCorp
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 11:18 AM

मुंबई : चारचाकींसह आता दुचाकी वाहनंदेखील महाग होणार आहेत. कारण, पुढील महिन्यापासून केवळ कार निर्मात्या कंपन्याच नव्हे तर दुचाकी वाहन उत्पादक कंपन्यांनीदेखील दुचाकींच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी यावर्षीच्या जानेवारी महिन्यात दुचाकी आणि चारचाकी वाहन उत्पादक कंपन्यांनी वाहनांच्या किंमती वाढवल्या होत्या. आता पुन्हा एकदा वाहनांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे. (Hero MotoCorp Announces price hike for motorcycles and scooters from april)

दुचाकी वाहन उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) म्हटले आहे की, 1 एप्रिल 2021 पासून त्यांच्या मोटारसायकली आणि स्कूटरच्या किंमती वाढवल्या जाणार आहेत. बीएसईला माहिती देताना हिरो मोटोकॉर्पने म्हटले की, “कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे कंपनीवरी आर्थिक भार कमी करण्यासाठी वाहनांच्या किंमती वाढवणे आवश्यक झाले आहे.” कंपनीच्या म्हणण्यानुसार विविध श्रेणीतील दुचाकींच्या किंमती वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे हिरोच्या दुचाकींच्या किंमतीत 2500 रुपयांची वाढ केली जाऊ शकते.

हिरो मोटोकॉर्पने सांगितले की, ग्राहकांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी कंपनी खर्च-बचत कार्यक्रम वेगाने पुढे नेत आहे. हिरो मोटोकॉर्पच्या आधी निसान इंडिया आणि मारुती सुझुकी या कंपन्यांनी एप्रिलपासून त्यांच्या वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. याव्यतिरिक्त, जपानी वाहन उत्पादक कंपनी इसुझू मोटर्स इंडियाने जाहीर केले आहे की ते, भारतात त्यांच्या डी-मॅक्स रेग्युलर कॅब (D MAX Regular Cab) आणि डी-मॅक्स एस-कॅबच्या (D MAX S CAB) किंमती वाढवणार आहेत. सध्याची एक्स-शोरूम किंमत 1 लाख रुपयांनी वाढविण्यात येणार असून नवीन किंमती 1 एप्रिल 2021 पासून लागू होतील.

निसान आणि मारुती सुझुकीची वाहनं महागणार

निसान इंडियाने (Nissan India) जाहीर केले आहे की, ते एप्रिल 2021 पासून आपल्या वाहनांच्या किंमती वाढवणार आहेत. वाढत्या इनपुट कॉस्टचा प्रभाव कमी करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचललं आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाने (एमएसआय) यांनी कच्च्या मालाच्या किंमतीतील वाढीची भरपाई करण्यासाठी पुढील महिन्यापासून आपल्या सर्व मॉडेल्सच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनीने म्हटले आहे की, देशातील सर्व मॉडेल्सवर ही दरवाढ लागू होईल.

देशातील सर्वात मोठी कार उत्पादन कंपनी मारुती सुझुकी इंडियाने (MSI) पुढच्या महिन्यापासून मारुती सुझुकीच्या कार महागणार असल्याचं सांगितलंय. कच्च्या मालाच्या किमतीतील वाढीची भरपाई करण्यासाठी ते आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमतीत (Cars Price Hike From 1st April) वाढ करणार असल्याचं कंपनीनं सोमवारी सांगितलं. शेअर बाजाराला दिलेल्या अहवालात मारुती सुझुकीनं यासंदर्भात स्पष्टीकरणही दिलंय.

महिंद्रा, आयशर, अशोक लेलँडच्या किंमतीही वाढणार

कच्च्या मालाच्या किंमतीत झालेली वाढ ही वाहन उद्योगातील किंमती वाढण्यामागचं प्रमुख कारण आहे. या वर्षात अशी वाढ दुसऱ्यांदा होत आहे. वाहन उत्पादक कंपन्या पुढील महिन्यापासून त्यांच्या वाहनांच्या किंमती 1 ते 3 टक्क्यांनी वाढवू शकतात. महिंद्रा अँड महिंद्रा, आयशर मोटर्स आणि अशोक लेलँड या कंपन्या एप्रिल-मेमध्ये दर वाढवू शकतात.

इतर बातम्या

1 एप्रिलपासून महामार्गांवरुन प्रवास करणं महागणार, जाणून घ्या काय आहेत कारणं

Vehicle Scrappage Policy: कार घेणे आता आणखी स्वस्त होणार, जुन्या कार मालकांना मोठे फायदे, जाणून घ्या सर्वकाही

(Hero MotoCorp Announces price hike for motorcycles and scooters from april)

'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.