Hero Motocorp ची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर सादर, कंपनीकडून टीझर VIDEO शेअर
जगातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने (Hero Motocorp) नुकतीच आपली 10 वी अॅनिव्हर्सरी साजरी केली. कंपनी भारतात पहिले इलेक्ट्रिक मॉडेल लवकरच लॉन्च करु शकते, हे यावेळी सांगण्यात आले.
मुंबई : जगातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने (Hero Motocorp) नुकतीच आपली 10 वी अॅनिव्हर्सरी साजरी केली. कंपनी भारतात पहिले इलेक्ट्रिक मॉडेल लवकरच लॉन्च करु शकते, हे यावेळी सांगण्यात आले. यासोबतच कंपनीने आपल्या आगामी इलेक्ट्रिक स्कूटरची पहिली झलकही सादर केली आहे. (Hero motocorp presented glimpses of new electric scooter)
अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनच्या लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यान, हिरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष पवन मुंजल यांनी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली. टीझरमध्ये शेअर केलेल्या माहितीनुसार, ही इलेक्ट्रिक स्कूटर बरीच स्लीक दिसतेय. यात एक कर्व्ड डिझाईन आहे जे व्हाईट अँड ब्लॅक कलर कॉम्बिनेशनसह येतं. यासह, यात फ्लायस्क्रीन आणि लांब सीट देण्यात आली आहे, ज्यामुळे या स्कूटरवर बसण्यासाठी खूप जागा आहे असे दिसते आणि त्यावर दोन जण सहज बसू शकतात. यासह, या स्कूटरच्या पुढच्या बाजूला 12 इंचांचे चाक आणि मागील बाजूस 10 इंचाचे चाक देण्यात आले आहे.
हीरो मोटोकॉर्प किंवा पवन मुंजल यांनी या इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल फारशी माहिती शेअर केलेली नाही. तथापि, या कार्यक्रमादरम्यान, मुंजल यांनी निश्चितपणे सांगितले की, ही इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच सादर केली जाऊ शकते.
यावर्षी एप्रिलमध्ये, हिरो मोटोकॉर्पने तैवानची कंपनी गोगोरोसोबत एक करार केला आहे, ज्यामध्ये दोन्ही कंपन्या बॅटरी स्वॅप आणि टेक्नोलॉजी फीचर्स शेअर करतील. या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरचे डिझाईन गोगोरो जे ऑफर करते तसे दिसत नाही. त्याऐवजी, काही गोष्टी आहेत ज्या बजाज चेतक सारख्या आहेत, जसे की, सिंगल-साइडेड स्विनग्राम इत्यादी.
“This historic day has finally arrived! Hero completes 10 years! Join us virtually for the celebrations LIVE.#Hero #HeroAt10” https://t.co/fRyxwE9tLL
— Hero MotoCorp (@HeroMotoCorp) August 9, 2021
हिरो मोटोकॉर्पच्या या इलेक्ट्रिक स्कूटरचा टीझर समोर आला आहे, तर दुसऱ्या बाजूला ओला आपली बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याच्या मार्गावार आहे. लॉन्च झाल्यानंतर, ओला इलेक्ट्रिक स्कूटर व्यतिरिक्त, हिरोची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बजाज चेतक इलेक्ट्रिक, अॅथर 450 एक्स आणि TVS iQube शी स्पर्धा करेल. असे म्हटले जात आहे की, हिरो मोटोकॉर्प आपली इलेक्ट्रिक स्कूटर या वर्षाच्या शेवटी किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला विक्रीसाठी उपलब्ध करेल.
इतर बातम्या
आतापर्यंत केवळ कारमध्ये मिळणारं ‘हे’ फीचर Ola च्या Electric Scooter मध्येही मिळणार
सिंगल चार्जवर 130 किमी रेंज, होंडाची किफायतशीर इलेक्ट्रिक स्कूटर U-GO लाँच
सिंगल चार्जमध्ये 100KM रेंज, ‘या’ इलेक्ट्रिक सायकलसाठी ग्राहकांच्या रांगा
(Hero motocorp presented glimpses of new electric scooter)