Hero Xpulse 200 4V : हिरो मोटोकॉर्पची नवी बाईक, फीचर्स आणि किंमत जाणून घ्या….

1,52,100 किंमत असलेली हिरो एक्‍सपल्‍स 200 4 व्‍ही रॅली ए‍डिशन 22 जुलै 2022 दुपारी 12 वाजल्‍यापासून 29 जुलै 2022 दुपारी 12 वाजेपर्यंत कंपनीचे ऑनलाइन विक्री व्‍यासपीठ eSHOP वर बुक करता येऊ शकते. जाणून घ्या यविषयी अधिक.

Hero Xpulse 200 4V : हिरो मोटोकॉर्पची नवी बाईक, फीचर्स आणि किंमत जाणून घ्या....
Hero Xpulse 200 4VImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 1:04 PM

मुंबई :  ग्राहकांना उत्‍साहपूर्ण, तंत्रज्ञानदृष्‍ट्या प्रगत आणि आकर्षकदृष्‍ट्या लक्षवेधक मोटरसायकल्‍स देण्‍याची आपली कटिबद्धता कायम राखत हिरो मोटोकॉर्प (Hero Motocorp) या जगातील मोटरसायकल्‍स आणि स्‍कूटर्सच्‍या सर्वात मोठ्या उत्‍पादक कंपनीने आज त्‍यांची व्‍यापक लोकप्रिय मोटरसायकल एक्‍सपल्‍स 200 4व्‍ही (Hero Xpulse 200 4V) ची विशेष रॅली एडिशन (Rally edition) लाँच केली. सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये असलेली हिरो एक्‍सपल्‍स 2004 व्‍ही रॅली एडिशनमध्‍ये फॅक्‍टरीमध्‍ये बसवण्‍यात आलेले रॅली किट आहे, ज्‍यामधून हिरो मोटोस्‍पोर्टसचे अस्‍सल तत्त्व दिसून येतो आणि प्रिमिअम विभागामधील हिरो मोटोकॉर्प मोटरसायकल्‍सचा झपाट्याने विस्‍तारित होत असलेला पोर्टफोलिओ अधिक प्रबळ होतो. सुधारित सस्‍पेंशन सेट-अप आणि अधिक ग्राउण्‍ड क्‍लीअरन्‍समधून विशेष रॅली एडिशनच्‍या ऑफ-रोड क्षमता दिसून येतात. हिरो मोटोस्‍पोर्टस् रॅली बाइकमधून प्रेरित लिमिटेड एडिशन मॉडेलमध्‍ये मोटरसायकलिंग प्रेमींचा (Bike Lovers) साहसी उत्‍साह सामावलेला आहे. विशेष रॅली कोड ग्राफिक्‍स आणि वैशिष्‍ट्यपूर्ण ‘सीएस संतोष’ ऑटोग्राफमधून हिरो मोटोस्‍पोर्टसची खासियत दिसून येते आणि राइडर्सना मालकीहक्‍काचा अभिमान देण्‍यासाठी वैशिष्‍ट्यपूर्ण घटकाला नव्‍या उंचीवर घेऊन जाते.

1,52,100/- रूपये किंमत असलेली हिरो एक्‍सपल्‍स 200 4 व्‍ही रॅली ए‍डिशन 22 जुलै 2022 दुपारी 12 वाजल्‍यापासून 29 जुलै 2022 दुपारी 12 वाजेपर्यंत कंपनीचे ऑनलाइन विक्री व्‍यासपीठ eSHOP वर बुक करता येऊ शकते. हिरो मोटोकॉर्पच्‍या स्‍ट्रॅटेजी व ग्‍लोबल प्रॉडक्‍ट प्‍लानिंगचे प्रमुख मालो ली मेसन म्‍हणाले, ”हिरो एक्‍सपल्‍स 200 ने स्‍वत:चा वारसा निर्माण केला आहे. साहसी राइडर्सना स्‍वत:चा ट्रॅक बनवण्‍यास सक्षम करण्‍यासाठी तंत्रज्ञान व कार्यक्षमतेने युक्‍त एक्‍सपल्‍स 200 4व्‍ही सर्वोत्तम सोबती आहे. रॅली एडिशनमध्‍ये फॅक्‍टरीमध्‍ये बसवण्‍यात आलेल्‍या रॅली किटच्‍या माध्‍यमातून अपवादात्‍मक ऑफ-रोड क्षमतांचा समावेश आहे आणि सर्वोत्तम राइडर्ससाठी आमच्‍या डकार मशिन्‍समधून प्रेरित अद्वितीय डिझाइन आहे. तुम्‍हाला रॅली रेडमधील हिरो मोटोस्‍पोर्टसच्‍या अनेक वर्षांच्‍या अध्‍ययनाचा अनुभव घ्‍यायचा असेल तर एक्‍सपल्‍स 200 4व्‍ही रॅली एडिशन तुमच्‍यासाठीच आहे.”

हिरो मोटोकॉर्पचे चीफ ग्रोथ ऑफिसर (सीजीओ) रणजीवजीत सिंग म्‍हणाले, ”हिरो एक्‍सपल्‍स अनेक वर्षांपासून आयकॉन असण्‍यासोबत साहसी विभागामध्‍ये अग्रस्‍थानी राहिली आहे, जी मागील तीन वर्षांमध्‍ये तिप्‍पट वाढली आहे. हिरो एक्‍सपल्‍स अमर्यादित अॅड्रेनालाइन रशसह ऑफ-रोडिंग उत्‍साहींना आजही प्रेरित करत आहे. अभिमानाने अस्‍सल हिरो मोटोस्‍पोर्टस् डीएनएचा समावेश असलेल्‍या लिमिटेड एडिशन एक्‍सपल्‍स 200 4व्‍ही रॅली एडिशनमध्‍ये अत्‍याधुनिक वैशिष्‍ट्ये आहेत आणि उल्‍लेखनीय कार्यक्षमता देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. आम्‍हाला विश्‍वास आहे की, राइडर्स हिरो मोटोकॉर्पच्‍या या साहस व तंत्रज्ञानाने युक्‍त मोटरसायकलचा आनंद घेतील.”

हे सुद्धा वाचा

इंजिन कार्यक्षमता

एक्‍सपल्‍स २०० ४व्‍ही रॅली एडिशन खडीच्‍या किंवा मातीच्‍या रस्‍त्‍यांवर अशा सर्व प्रदेशांमध्‍ये सर्वोत्तम कार्यक्षमता देते. या मोटरसायकलमध्‍ये २०० सीसी ४-व्‍हॉल्‍व्‍ह-ऑईल-कूल्‍ड इंजिनची शक्‍ती आहे. हे इंजिन 8500 आरपीएममध्‍ये 18.9 बीएचपीची अधिकतम शक्‍ती आणि 6500 आरपीएममध्‍ये १७.३५ चे सर्वोच्‍च टॉर्क देते. इंजिन ५-स्‍पीड गिअरबॉक्‍सशी जोडलेले आहे. प्रचंड ट्रॅफिकमध्ये उष्णतेच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी कूलिंग यंत्रणा आता ७-फिन ऑइल कूलरसह येते. ऑईल-कूल्‍ड इंजिन मध्‍यम व अव्‍वल गतीमध्‍ये उच दर्जाची शक्‍ती देण्‍यासोबत आरामदायी क्रूझिंगसाठी उच्‍च गतीमध्‍ये तणावमुक्‍त इंजिन कार्यक्षमता देखील देते.

रॅली ट्यून्‍ड

अस्‍सल रॅली उत्‍साहासाठी मोटरसायकलमध्‍ये उंच आणि पूर्णत: समायोजित करता येणा-या फ्रण्‍ट सस्‍पेंशनसह 250 मिमी ट्रॅव्‍हल आणि पूर्णत: समायोजित करता येणा-या 10 स्‍टेप रिअर सस्‍पेंशनसह 220 मिमी ट्रॅव्‍हल आहे. यामुळे राइडरला प्रदेश आणि वैयक्तिक राइडिंग स्‍टाइलनुसार सस्‍पेंशन समायोजित करता येते. 885 मिमी आसनाची उंची, 40 मिमी हँडलबार रायजर्स, 270 मिमीचे सुधारित ग्राऊण्‍ड क्‍लीअरन्‍स, 1426 मिमी व्‍हीलबेस आणि 116 मिमीच्‍या सुधारित ट्रेलसह सुधारित राइडिंग गतीशीलता आत्‍मविश्‍वासपूर्ण राइडिंग पवित्रा देते. यामधून प्रखर व आव्‍हानात्‍मक ऑफ-रोड स्थितींमध्‍ये उल्‍लेखनीय हाताळणी, संतुलित चपळतेसह अधिकतम घर्षण मिळते. तसेच वाढवलेले गिअर लेव्‍हर आणि लांब साइड स्‍टॅण्‍ड अशा मशिनमध्‍ये आवश्‍यक असलेल्‍या बारीक-सारीक गोष्‍टींची काळजी घेतात.

ऑन, ऑफ-रोड सज्ज

या मोटरसायकलमध्‍ये प्रबळ 21 इंच फ्रण्‍ट आणि 18 इंच रिअर स्‍पोक व्‍हील्‍ससोबत ऑन- व ऑफ-रोड वापरासाठी दुहेरी उद्देशीय टायर्स बसवण्‍यात आले आहेत. खडकाळ व धोकादायक प्रदेशांमधून अडथळा-मुक्‍त राइडच्‍या खात्रीसाठी मोटरसायकलमध्‍ये अॅल्‍युमिनिअम स्किड प्‍लेट आहे, जी अधिकतम ग्रिप व कंट्रोलसाठी इंजिन, ब्रेक पेडलचे संरक्षण करते आणि वरील बाजूने एक्‍झॉस्‍ट करत सखोल पाण्‍यातून मोटरसायकल पार होण्‍याची खात्री देते. या क्षमतापूर्ण मोटरसायकलचे वजन 160 किग्रॅच्‍या कर्ब वजनासह अत्‍यंत हलके आहे.

हाय-टेक साहस

अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्‍त एक्सपल्स 200 4 व्ही रॅली एडिशन लांबच्‍या प्रवासादरम्‍यान आरामदायी राइडची हमी देते. एलईडी हेडलाइट व एलईडी टेल लाइट रस्‍त्‍यावर एकसमान व कार्यक्षम प्रकाश दिसण्‍याची खात्री देतात. या मोटरसायकलमध्‍ये सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत- जसे स्मार्टफोन कनेक्‍टीव्हिटीसह पूर्णपणे डिजिटल एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर व कॉल अलर्टस्, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, गिअर इंडिकेटर, इको मोड आणि दोन ट्रिप मीटर्स व प्रमाणित ऑफरिंग म्‍हणून सिंगल चॅनल एबीएस.

(हेडलाईन व्यतिरीक्त सदर वृत्तातील मजकूर tv9marathi ने संपादीत केलेला नसून उपरोक्त माहिती ही सिंडीकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आली आहे.)

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.