Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिरो मोटोकॉर्पची Xtreme 160R Stealth Edition बाजारात, जाणून घ्या नव्या बाईकमध्ये काय आहे खास?

सणासुदीच्या काळात हिरो मोटोकॉर्पने Xtreme 160R Stealth Edition ही बाईक देशात 1.16 लाख रुपयांमध्ये (एक्स-शोरूम, दिल्ली) लाँच केली आहे.

हिरो मोटोकॉर्पची Xtreme 160R Stealth Edition बाजारात, जाणून घ्या नव्या बाईकमध्ये काय आहे खास?
Hero Xtreme 160R Stealth Edition
Follow us
| Updated on: Oct 15, 2021 | 4:16 PM

मुंबई : सणासुदीच्या काळात हिरो मोटोकॉर्पने Xtreme 160R Stealth Edition देशात 1.16 लाख रुपयांमध्ये (एक्स-शोरूम, दिल्ली) लाँच केली आहे. नवीन मोटारसायकल अनेक नव्या एलिमेंट्ससह येते जे वाहनातील कम्फर्ट आणि कॅरेक्टरच्या शोधात असलेल्या तरुण पिढीला लक्ष्य करेल आणि त्यामुळे ही बाईक अधिक आकर्षक ठरते. (Hero Xtreme 160R Stealth Edition Launched in India; at Price of ₹ 1.17 Lakh)

हिरो मोटोकॉर्पच्या नवीन बाईकला नवीन 3D प्रतीक ब्रँडिंग आणि ‘स्टील्थ’ बॅजिंगसह मॅट ब्लॅक अवतार मिळतो. हे एलईडी विंक आणि साइड स्टँड इंजिन कट ऑफ सारख्या काही सेगमेंट-लीडिंग वैशिष्ट्यांसह देखील येते. मोटारसायकलवरील एलईडी पॅकेजमध्ये Droid LED हेडलॅम्प, स्लीक आणि बळकट LED winkers आणि ‘H’ इन्सिग्नियासह सिग्नेचर LED टेल-लॅम्पचा समावेश आहे, जेणेकरून ही बाईक इतर दुचांकींच्या गर्दीत वेगळी दिसेल.

Hero Xtreme 160R Stealth Edition मध्ये काय आहे खास?

मोटारसायकल इंटिग्रेटेड यूएसबी चार्जर, एलसीडी ब्राइटनेस कॉम्बिनेशन तसेच स्पीडोमीटरवर नवीन गिअर इंडिकेटर सारख्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. एलसीडी ब्राइटनेस अॅडजस्टमेंट फीचर रायडरला ब्राइटनेस पाच वेगवेगळ्या स्तरावर अॅडजस्ट करण्यास अनुमती देते, ज्यामुळे ब्राइट कंडीशन्समध्ये अधिक चांगली रीडेबिलिटी मिळते. यूएसबी चार्जर हँडलबारच्या खाली इंटीग्रेटेड होतो, ज्यामुळे चार्जिंग तसेच कनेक्टिव्हिटीसाठी इझी अॅक्सेस मिळतो.

बाइकमध्ये 139.5 किलो वजनासह हलका आणि भक्कम डायमंड फ्रेम सेटअप आहे. या बाईकचे अलॉय व्हील्स रस्त्यांवर आणि गर्दीच्या ठिकाणी उत्तम हँडलिंग प्रदान करतात. यासाठी बाईकला 37 मिमी टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि 7-स्टेप अॅडजस्टेबल रिअर मोनो-शॉक सस्पेंशन सेटअप मिळते. या बाईकमध्ये 165 मिमी ग्राउंड क्लिअरन्स देण्यात आला आहे.

Hero Xtreme 160R Stealth Edition मध्ये 160cc क्षमतेचं एयर-कूल्ड BS 6 इंजिन देण्यात आलं आहे, जे XSens टेक्नोलॉजी आणि लेटेस्ट प्रोग्राम्ड-फ्यूल-इंजेक्शनवर ऑपरेट होतं. हे इंजिन 8500 rpm वर 15.2 पीएस पॉवर जनरेट करतं. मोटारसायकल 4.7 सेकंदात 0-60 किमी/तास इतका वेग धारण करु शकते.

बाईकच्या लाँचिंगबाबत बोलताना, कंपनीचे स्ट्रॅटेजी आणि ग्लोबल प्रॉडक्ट स्कीम प्रमुख मालो ले मॅसन म्हणाले, “Xtreme Hero MotoCorp हा एक स्पोर्टी आणि शहरी ब्रँड आहे जो त्याच्या प्रीमियम मोटारसायकलच्या एक्स-रेंजमध्ये आहे. नवीन Xtreme 160R स्टील्थ व्हेरिएंट रेंज लीडिंग टेक्नोलॉजी सादर करते. जे ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन प्रवासासाठी अधिक कम्फर्ट प्रदान करते.

इतर बातम्या

डुकाटीची शानदार सुपरस्पोर्ट 950 मोटारसायकल बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

बहुप्रतीक्षित Tata Punch भारतात लाँच, 21000 रुपये देऊन बुक करा शानदार मायक्रो एसयूव्ही

MG Astor लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या कसा असेल कारचा लूक, किंमत आणि फीचर्स

(Hero Xtreme 160R Stealth Edition Launched in India; at Price of ₹ 1.17 Lakh)

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.