Honda Sports Bike : स्टायलिश लूक, 10 वर्षांची वॉरंटी, किंमत म्हणाल तर..

Honda Sports Bike : Honda SP125 ची नवीन स्पोर्ट्स एडिशनने बाजारात ग्राहकांचे लक्ष वेधले आहे. बाईकच्या स्पोर्टी लूकची सध्या चर्चा आहे. केवळ स्पोर्टी लूक देऊनच ग्राहकांना खूश करण्यात आलेले नाही तर या बाईकवर ग्राहकांना 10 वर्षांची वॉरंटी मिळाली आहे. स्पोर्ट एडिशनची किंमत तर तुम्हाला धक्का दिल्याशिवाय राहणार नाही.

Honda Sports Bike : स्टायलिश लूक, 10 वर्षांची वॉरंटी, किंमत म्हणाल तर..
Follow us
| Updated on: Sep 27, 2023 | 6:07 PM

नवी दिल्ली | 27 सप्टेंबर 2023 : होडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने खास सणासुदीत धमाका केला आहे. इतर कंपन्यांना या स्पर्धेत उतरल्याशिवाय तरणोपाय ठेवला नाही. या कंपनीने खास ऑफर तर आणलीच आहे. पण अविश्वसनीय किंमतीमुळे ग्राहकांसह स्पर्धक कंपन्यांना पण धक्का दिला आहे. Honda SP125 ची नवीन स्पोर्ट्स एडिशनने बाजारात ग्राहकांचे लक्ष वेधत आहे. आकर्षक लूक आणि दमदार इंजिन हे या बाईकच्या जमेच्या बाजू आहेत. कंपनीने बाईकच्या लाँचिंगसह त्याचे ऑफिशिअल बुकिंग पण सुरु केले आहे. या खास स्पोर्ट्स एडिशनमध्ये (Sports Edition) ग्राहकांना 10 वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे.

बदलासह बाईक बाजारात

नवीन Honda SP125 ही स्पोर्ट्स एडिशन काही खास कॉस्मेटिक बदलासह बाजारात आली आहे. त्यामुळे ती नियमीत मॉडलपेक्षा वेगळी दिसते. सुरुवातीपासून ग्राहकांना नाविन्यूपूर्ण, स्टायलिश आणि दमदार दुचाकी देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे, असे होडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि सीईओ त्सुत्सुमु ओटानी यांनी सांगितले. ही नवीन खास स्पोर्ट्स एडिशन ग्राहकांच्या पसंतीला उतरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

खास फीचर्स

Honda SP125 मध्ये एलईडी हेडलॅम्प, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. गिअर पोझिशन, स्पीड, फ्युएल गेज यासारखी बेसिक माहिती यामुळे ग्राहकांना मिळेल. इंजिनासह इतर मॅकेनिझममध्ये कोणताच बदल करण्यात आलेला नाही. या बाईकला पूर्वी 123.94 cc क्षमतेचे सिंगल सिलेंडर PGM-FI इंजिन देण्यात आले होते. हे इंजिन 10.7 hp पॉवरचे आणि 10.9 Nm पीक टॉर्क जनरेट करते.

किंमत तरी किती

जपानी कंपनी होडाने त्यांच्या SP160 मध्ये काही बदल केले. त्यात काही मॉडेल बाजारात उतरवले. युनिकॉर्न 160 पेक्षा त्यात काही वेगळे फीचर्स देण्यात आले. नवीन ग्राफिक्स, फ्लोटिंग डिझाईनचा वापर करण्यात आला. अलॉय व्हील्सवर नवीन लाईन्स दिले. Honda SP125 च्या किंमतींची बाजारात चर्चा आहे. ही बाईक किफायतशीर असल्याचा कंपनीचा दावा आहे. या बाईकची सुरुवातीची किंमत 90,567 रुपये (एक्स शोरुम) ठेवण्यात आली आहे. शहरानुसार त्यात तफावत असू शकते.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.