या देशाने तयार केली होती पहिली इलेक्ट्रीक स्कूटर, आपला भारत आहे 25 वर्षे मागे

भारतात सध्या इलेक्ट्रीक चारचाकी वाहने आणि दुचाकीची क्रेझ आहे. परंतू स्वत:ची इलेक्ट्रीक स्कूटर बनविण्याच्या बाबतीत मात्र भारत जगाच्या 25 वर्षे मागे आहे. आता जगात पहिली इलेक्ट्रीक स्कूटर तयार करणारी कंपनी भारतातील लोकप्रिय दुचाकीचे इलेक्ट्रीक व्हर्जन आणत आहे.

या देशाने तयार केली होती पहिली इलेक्ट्रीक स्कूटर, आपला भारत आहे 25 वर्षे मागे
Follow us
| Updated on: Nov 16, 2024 | 9:51 PM

जगातील पहिली इलेक्ट्रीक स्कूटर ( टु- व्हीलर ) तशी 130 वर्षांपूर्वीच तयार झाली होती. परंतू सर्वसामान्य जनतेच्या व्यावसायिक वापरासाठी इलेक्ट्रीक स्कूटर साल 1994 मध्ये तयार करण्यात आलेली होती. भारतात आता कुठे इलेक्ट्रीक स्कूटर आणि वाहनांची क्रेज सुरु झालेली आहे. भारताची स्वत:ची इलेक्ट्रीक स्कूटर तयार करण्यात भारत जगाच्या 25 वर्षे मागे आहे. जपानच्या होंडा कंपनीने जगातील पहिली इलेक्ट्रीक बाईक विकसित केली होती. त्यावेळी तिचे नाव Honda CUV: ES असे ठेवले होते. याचा फूल फॉर्म Clean Urban Vehicle Electric Scooter असा होता. आता याच कॉन्सेप्टवर होंडा कंपनी आपली नवीन इलेक्ट्रीक एक्टीवा स्कूटर बाजारात आणत आहे.

होंडा कंपनीची ही इलेक्ट्रीक स्कूटर त्या काळी प्रसिद्ध मॉडेल Honda Dio स्कूटरवर आधारित होते. या इलेक्ट्रीक स्कूटरची अत्यंत मर्यादित संख्येत निर्मिती करीत केवळ जपानमध्ये विक्री झाली होती. त्यावेळी बॅटरी तंत्रज्ञान आणि बॅटरी चार्जिंग सुविधेचा एवढा प्रसार नव्हता. परंतू होंडा कंपनीने या स्कूटरवर काम करणे सुरुच ठेवले.त्याकाळी ही इलेक्ट्रीक स्कूटर 38 मैल म्हणजे सुमारे 60 किमीची रेंज देत होती. आणि या स्कूटरचा सरासरी वेग सुमारे 25 किमी प्रती तास इतका होता.

याच मॉडेलवर कंपनीने साल 2009 रोजी EV-Neo, आणि 2018 मध्ये PCX Electric स्कूटर विकसित केली. आता याच कंपनीने साल 2024 मध्ये CUV e आणि ICON e हे मॉडेल लॉन्च करण्याची घोषणा केली होती. होंडाने एवढ्यावर न थांबता भारतातील त्यांच्या सर्वात प्रसिद्ध झालेल्या एक्टीवा स्कूटरचे इलेक्ट्रीक व्हर्जन उतरविण्याची घोषणा केलेली आहे. या नोव्हेंबर किंवा नववर्षांच्या सुरुवातीला ऑटो एक्स्पोमध्ये ही स्कूटर सादर केली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

भारताने तयार केली इलेक्ट्रीक स्कूटर

भारताने आपली पहिली स्मार्ट इलेक्ट्रीक स्कूटर साल 2018 मध्ये लॉंच केली. एथर एनर्जीने ही स्कूटर लॉंच केली असून तिला आयआयटी मद्रासच्या दोन इंजिनियर्सनी पाच वर्षांच्या मेहनतीनंतर तयार केले आहे. एथर 450 ला भारताची पहिली स्वदेशी इलेक्ट्रीक स्कूटर म्हटले जाते. असे असेल तरी साल 2006 मध्ये भारतात YoBikesने आपले लिमिटेड रेंजवाले इलेक्ट्रीक स्कूटर दाखल केलेल्या होत्या.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.