Hyundai Alcazar आणि Mercedes-Benz S-Class, दोन ढासू गाड्या बाजारात, उरले फक्त काही तास

Mercedes-Benz आणि Hyundai सारख्या कंपन्या या आठवड्यात त्यांच्या नवीन कार भारतात लाँच करण्यासाठी सज्ज आहेत. Mercedes-Benz कंपनी S-Class ही सेडान लाँच करणार आहे.

Hyundai Alcazar आणि Mercedes-Benz S-Class, दोन ढासू गाड्या बाजारात, उरले फक्त काही तास
Mercedes Benz S Class And Hyundai Alcazar
Follow us
| Updated on: Jun 17, 2021 | 3:42 PM

मुंबई : कोरोना साथीच्या रोगामुळे आणि लॉकडाऊनमुळे कार विक्रीच्या बाबतीत एप्रिल आणि मे महिना चांगला ठरला नाही. परंतु लॉकडाऊनचे नियम शिथील होत असताना कार निर्मात्या कंपन्यांनी नवीन गाड्या लाँच करण्यास सुरूवात केली आहे. गेल्या आठवड्यात काही दमदार गाड्या लाँच करण्यात आल्यानंतर या आठवड्यात Mercedes-Benz आणि Hyundai सारख्या कंपन्या त्यांच्या नवीन कार भारतात लाँच करण्यासाठी सज्ज आहेत. (Hyundai Alcazar and Mercedes Benz S Class is going to launch in India on 17 and 18th june)

Mercedes-Benz कंपनी लक्झरी सेडान S-Class लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही कार गेल्या वर्षी जागतिक बाजारात लाँच करण्यात आली होती. आतापर्यंत ज्या-ज्या देशांमध्ये ही कार लाँच करण्यात आली आहे. तिथे या कारला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच कारला चांगले रिव्ह्यूदेखील मिळाले आहेत. ही लक्झरी सेडान भारतात 400d आणि S 450 अशा दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच केली जाणार आहे. या कारमध्ये दमदार परफॉरमन्स आणि सुविधा मिळतील. तर दुसऱ्या बाजूला ह्युंदाय इंडिया (Hyundai India) आपली आगामी SUV Alcazar लाँच करण्यासाठी सज्ज आहे. दरम्यान, लाँचिंगपूर्वीच कंपनीने या कारसाठी बुकिंग घेण्यास सुरुवात केली आहे.

Alcazar लॉन्चिंगसाठी सज्ज

Alcazar भारतात लॉन्च होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. मागील काही वर्षांपासून कंपनी क्रेटाच्या यशावर अवलंबून आहे. परंतु Alcazar च्या लाँचिंगनंतर ह्युंदाय भारतीय मार्केटमध्ये अधिक दमदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. क्रेटा प्रमाणे Alcazar मध्ये दोन इंजिन पर्याय मिळतील ज्यात 3rd जनरेशन Nu 2 लीटर पेट्रोल आणि U2 1.5 लीटर डिझेल इंजिनाचा समावेश असेल. पेट्रोल इंजिन 159 PS पॉवर आणि 191 Nm टॉर्क देईल तर डिझेल युनिट 115 PS पॉवर आणि 250 Nm टॉर्क देईल. ही कार भारतात 18 जूनला लाँच केली जाईल.

शानदार डिझाईन

दरम्यान, आतापर्यंत लीक झालेल्या फोटोंमधून या कारच्या डिझाइन आणि स्टायलिंगबद्दल बर्‍याच गोष्टी उघडकीस आल्या आहेत. हे वाहन थोडे वेगळे असल्याचे सिद्ध करण्यासाठी कंपनी प्रयत्न करीत आहे, जेणेकरून ही कार इतर वाहनांपेक्षा भिन्न दिसावी. Alcazar चं एक्सटिरियर ग्राहकांना आकर्षित करेल. यामध्ये एलईडी हेडलाइट्स आणि टेललॅम्प्स, एक मोठा फ्रंट ग्रिल, 17 इंचाचे अ‍ॅलोय व्हील्स, बाजूला कॅरेक्टर लाईन्स आणि प्लॅस्टिक क्लॅडींग मिळतील.

फीचर्स

कारमधील सीट्सच्या मधल्या रांगेत, कंपनी कप होल्डरसह आर्मरेस्ट प्रदान करू शकते. यामध्ये तुम्हाला वायरलेस चार्जिंग व स्टोरेज स्पेसही देण्यात येईल. एसयूव्हीच्या इंटीरियरमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम मिळेल. ही 10.25 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम असेल. नवीन मॉडेलमध्ये ऑटो-डिमिंग IRVM, 360 डिग्री कॅमेरा, लेदर अपहोल्स्ट्री आणि फ्रंट पार्किंग सेन्सर देखील मिळतील.

दमदार इंजिन

या कारसोबत दोन इंजिन पर्यायांची ऑफर केली जाऊ शकते, म्हणजेच 1.4 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि 1.5 लिटर टर्बो-डिझेल इंजिन यात दिलं जाऊ शकतं. क्रेटाला 1.5 लीटरचे 4 सिलेंडर नॅचरली एस्पीरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 113bhp आणि 145Nm टॉर्क उत्पन्न करतं.

Mercedes-Benz S-Class लाँचिंगसाठी सज्ज

Mercedes-Benz कंपनी लक्झरी सेडान S-Class लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही कार गेल्या वर्षी जागतिक बाजारात लाँच करण्यात आली होती. आतापर्यंत ज्या-ज्या देशांमध्ये ही कार लाँच करण्यात आली आहे. तिथे या कारला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच कारला चांगले रिव्ह्यूदेखील मिळाले आहेत. ही लक्झरी सेडान भारतात 400d आणि S 450 अशा दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच केली जाणार आहे. या कारमध्ये दमदार परफॉरमन्स आणि सुविधा मिळतील.

S-class मध्ये 12.8 इंचांची टॅबलेट स्टाईल OLED इन्फोटेन्मेंट स्क्रीन आणि चालकासाठी 12.3 इंचांचा डिजिटल इंस्ट्रूमेंट डिस्प्ले मिळेल, जो अॅक्टिव एम्बिएंट लायटिंग सिस्टममध्ये अधिक आकर्षित दिसेल. यामध्ये 263 LED देण्यात आले आहेत. यामध्ये ऑग्यूमेंटेड रिएलिटीसह हेड-अप डिस्प्ले आणि इंटीरियर असिस्ट फंक्शनदेखील उपलब्ध आहे.

या कारच्या डायमेंशनबाबत बोलायचे झाल्यास भारतात ही कार लाँग व्हीलबेससह लाँच केली जाईल. याची लांबी 34mm आणि रुंदी 22mm इतकी असेल. दरम्यान, अशी माहिती मिळाली आहे की, कंपनी ही कार आज (17 जून) संध्याकाळी लाँच करणार आहे.

इतर बातम्या

‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार्स, मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट पर्याय

सिंगल चार्जवर 220km रेंज, होंडाची Two-Door इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या फीचर्स

Maruti Swift ला मागे टाकत ‘ही’ कार ठरली देशात नंबर वन, लॉकडाऊन असूनही रेकॉर्डब्रेक विक्री

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.