Hyundai Alcazar SUV ची वाट पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी, कंपनीने लाँचिंगबाबतचा निर्णय बदलला

भारतात आणखी एक मिड-साइज एसयूव्हीची एंट्री होणार आहे. Hyundai Motors कंपनी त्यांची बहुप्रतीक्षित Alcazar ही कार लाँच करणार आहे.

Hyundai Alcazar SUV ची वाट पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी, कंपनीने लाँचिंगबाबतचा निर्णय बदलला
Hyundai Alcazar
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 9:31 PM

मुंबई : ह्युंदाय इंडियाने (Hyundai India) आपली आगामी SUV Alcazar काही महिन्यांपूर्वी सादर केली होती. कंपनीने या कारचे अधिकृत फोटो लीक केले आहेत. कोरियन कंपनी ही कार Tucson, क्रेटा आणि वेन्यू या कार्सच्या पोर्टफोलिओमध्ये लाँच करणार आहे. विशेष बाब म्हणजे Alcazar SUV ह्युंदाय इंडियाची पहिली थ्री रो सेगमेंटमधली कार असेल. दरम्यान, कंपनीने या कारच्या लाँचिंगबाबतचा निर्णय बदलला आहे. (Hyundai Alcazar SUV Launch date Postponed To June 2021 due to Corona Pandemic)

कोरोना साथीच्या रोगामुळे यंदा बऱ्याच गाड्यांचं लाँचिंग रद्द करण्यात आलं आहे. या यादीमध्ये ह्युंदायच्या एका एयसूव्हीचाही समावेश आहे. ही कार आतापर्यंत लाँच होणं अपेक्षित होतं, परंतु कंपनीने या कारचं लाँचिंग पुढे ढकललं आहे. ही एसयूव्ही आता जून 2021 मध्ये लाँच केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, कोरोनाची परिस्थिती सुधारली नाही, तर लाँचिंग डेट आणखी पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. परिस्थिती सुधारली नाही तर ही कार जूलैमध्ये लाँच केली जाऊ शकते.

SUV पुढील महिन्यात लाँच होणार?

मेट्रो शहरांमध्ये या गाडीचे प्री बुकिंग सुरु करण्याच्या तयारीत असलेल्या डीलर्सनीही जाहीर केले आहे की, सात सीटर एसयूव्ही पुढील महिन्यापासून विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते. महिन्याभरात देशातील कोरोनाची परिस्थिती सुधारू शकते. त्यामुळेच पुढील महिन्यात ही कार लाँच केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु याक्षणी याविषयी निश्चितपणे कोणतीही खात्री देता येत नाही.

उत्पादन युनिटमधील काम बंद

कोरोना साथीच्या आजारामुळे बर्‍याच लोकांनी प्राण गमावले आहेत. त्याच वेळी, वाहन कंपन्यांनी त्यांच्या उत्पादन युनिटमधील काम काही दिवसांसाठी थांबवले आहे. सध्या केवळ तेच लोक फॅक्टरीमध्ये जात आहेत ज्यांना खूप गरज आहे आणि ज्यांच्याशिवाय काम करता येत नाही.

Alcazar लॉन्चिंगसाठी सज्ज

Alcazar भारतात लॉन्च होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. मागील काही वर्षांपासून कंपनी क्रेटाच्या यशावर अवलंबून आहे. परंतु Alcazar च्या लाँचिंगनंतर ह्युंदाय भारतीय मार्केटमध्ये अधिक दमदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. क्रेटा प्रमाणे Alcazar मध्ये दोन इंजिन पर्याय मिळतील ज्यात 3rd जनरेशन Nu 2 लीटर पेट्रोल आणि U2 1.5 लीटर डिझेल इंजिनाचा समावेश असेल. पेट्रोल इंजिन 159 PS पॉवर आणि 191 Nm टॉर्क देईल तर डिझेल युनिट 115 PS पॉवर आणि 250 Nm टॉर्क देईल.

शानदार डिझाईन

दरम्यान, आतापर्यंत लीक झालेल्या फोटोंमधून या कारच्या डिझाइन आणि स्टायलिंगबद्दल बर्‍याच गोष्टी उघडकीस आल्या आहेत. हे वाहन थोडे वेगळे असल्याचे सिद्ध करण्यासाठी कंपनी प्रयत्न करीत आहे, जेणेकरून ही कार इतर वाहनांपेक्षा भिन्न दिसावी. Alcazar चं एक्सटिरियर ग्राहकांना आकर्षित करेल. यामध्ये एलईडी हेडलाइट्स आणि टेललॅम्प्स, एक मोठा फ्रंट ग्रिल, 17 इंचाचे अ‍ॅलोय व्हील्स, बाजूला कॅरेक्टर लाईन्स आणि प्लॅस्टिक क्लॅडींग मिळतील.

फीचर्स

कारमधील सीट्सच्या मधल्या रांगेत, कंपनी कप होल्डरसह आर्मरेस्ट प्रदान करू शकते. यामध्ये तुम्हाला वायरलेस चार्जिंग व स्टोरेज स्पेसही देण्यात येईल. एसयूव्हीच्या इंटीरियरमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम मिळेल. ही 10.25 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम असेल. नवीन मॉडेलमध्ये ऑटो-डिमिंग IRVM, 360 डिग्री कॅमेरा, लेदर अपहोल्स्ट्री आणि फ्रंट पार्किंग सेन्सर देखील मिळतील.

दमदार इंजिन

या कारसोबत दोन इंजिन पर्यायांची ऑफर केली जाऊ शकते, म्हणजेच 1.4 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि 1.5 लिटर टर्बो-डिझेल इंजिन यात दिलं जाऊ शकतं. क्रेटाला 1.5 लीटरचे 4 सिलेंडर नॅचरली एस्पीरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 113bhp आणि 145Nm टॉर्क उत्पन्न करतं.

इतर बातम्या

शानदार ऑफर! अवघ्या 1.5 लाखात Maruti Suzuki WagonR खरेदीची संधी

महिंद्राचा दिलदारपणा, कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना पाच वर्षांचा पगार, मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला

टाटाच्या ‘या’ इलेक्ट्रिक कारला देशात सर्वाधिक पसंती, विक्रीच्या बाबतीत अव्वल, सिंगल चार्जमध्ये 312KM रेंज

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.