एकदा चार्ज केल्यावर 452KM धावणार, 1.5 लाखांच्या डिस्काऊंटसह ‘ही’ इलेक्ट्रिक कार विक्रीस उपलब्ध

ह्युंदाय इंडिया फेब्रुवारी महिन्यात काही निवडक वाहनांवर आकर्षक सूट देत आहे. (Hyundai Offers Discounts 1.5 Lakh rs)

एकदा चार्ज केल्यावर 452KM धावणार, 1.5 लाखांच्या डिस्काऊंटसह 'ही' इलेक्ट्रिक कार विक्रीस उपलब्ध
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 10:18 AM

नवी दिल्ली : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला ज्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, त्या कंपन्यादेखील त्यांच्या कार्सवर अधिकाधिक डिस्काऊंट देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात ह्युंदाय इंडिया कंपनी आघाडीवर आहे. (Hyundai Offers Discounts Up To 1.5 Lakh rupees On Kona EV)

ह्युंदाय इंडिया (Hyundai India) फेब्रुवारी महिन्यात काही निवडक वाहनांवर आकर्षक सूट देत आहे. ही दक्षिण कोरियाई वाहन निर्माती कंपनी त्यांच्या बीएस 6 कंप्लायंट वाहनांवर बंपर डिस्काऊंट देऊन जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. इच्छूक ग्राहक निवडक Hyundai कार्सवर 1.5 लाख रुपयांचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये सँट्रो (Santro), ऑरा (Aura), ग्रँड i10 Nios (Grand i10 Nios), एलेंट्रा (Elantra) आणि कोना (Hyundai Kona Electric SUV) या कार्सचा समावेश आहे. ह्युंदायने कोना इलेक्ट्रिक एसयूव्हीवर तब्बल 1.5 लाख रुपयांची सूट दिली आहे. विशेष म्हणजे यात कोणत्याही एक्सचेंज बोनस अथवा कॉर्पोरेट डिस्काऊंटचा समावेश करण्यात आलेला नाही. सोबत कंपनी सरकारी कर्मचाऱ्यांना 8000 रुपयांची अतिरिक्त सूट देत आहे.

ऑफर 28 फेब्रुवारीपर्यंत लागू

कंपनीने सादर केलेली नवीन ऑफर केवळ 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत लागू असेल. ह्युंदायच्या या वाहनांवर दिली जाणारी ऑफर डीलर टू डीलर वेगळी असू शकते. तुम्ही सध्या नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर ह्युंदायने तुमच्यासाठी बेस्ट ऑफर सादर केली आहे. दरम्यान कंपनीने ह्युंदाय सँट्रो ही कार त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर 50 हजार रुपयांपर्यंतच्या लाभांसह लिस्ट केली आहे. या हॅचबॅक कारवर 30,000 रुपयांचा रोख डिस्काऊंट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5000 रुपयांपर्यंतचा कॉर्पोरेट डिस्काऊंट दिला जाणार आहे.

ह्युंदाय कंपनी ग्रँड i10 नियॉसवरही (Grand i10 Nios) डिस्काऊंट देत आहे. या कारच्या पेट्रोल आणि डिझेल वेरियंटमध्ये 60,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. यामध्ये 45000 रुपयांचा कॅश डिस्काऊंट आणि 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. तसेच या गाडीवर 5000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंटही दिला जात आहे.

एलेन्ट्रावर 1 लाखांचा डिस्काऊंट

ह्युंदाय Aura या कारवर कंपनीने 70,000 (पेट्रोल आणि डिझेल वेरियंट) रुपयांपर्यंतची सूट दिली आहे. इच्छुक ग्राहक 50,000 रुपयांपर्यंतच्या रोख डिस्काऊंटचा लाभ घेऊ शकतात. सोबत 15000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट दिला जात आहे. एलेन्ट्रा या कारच्या पेट्रोल आणि डिझेल वेरिएंट्सवर कंपनीने 1 लाख रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट दिला आहे. ज्यामध्ये 70000 रुपयांचा रोख डिस्काऊंट तर 30000 रुपयांपर्यंतची बोनस ऑफर समाविष्ट करण्यात आली आहे.

हेही वाचा

आता बाईक आणि सोबत ड्रायव्हरही मिळणार भाड्याने, कमी पैशात हव्या तितक्या ठिकाणी फिरा

प्रतीक्षा संपली, नवी 7 सीटर Tata Safari 2021 लाँच, किंमत…

केवळ 51000 रुपयात घरी न्या 83KM मायलेज देणारी मोटारसायकल

ह्युंदायचा इलेक्ट्रिक SUVs चा धडाका, भारतात 3200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

(Hyundai Offers Discounts Up To 1.5 Lakh rupees On Kona EV)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.