Hyundai ची नवी कार लाँचिंगसाठी सज्ज, i20 Active ला पर्याय?
ह्युंदाय मोटर्सने (Hyundai Motors) आय -20 (i20) वर आधारित नवीन एसयूव्हीची पहिली झलक सादर केली आहे.
मुंबई : ह्युंदाय मोटर्सने (Hyundai Motors) आय -20 (i20) वर आधारित नवीन एसयूव्हीची पहिली झलक सादर केली आहे. ही कार जगभरात कंपनीच्या आय 20 अॅक्टिव्ह (i20 Active) मॉडेलची जागा घेईल. तथापि, ही कार भारतीय बाजारात लाँच होईल की नाही, की केवळ आंतरराष्ट्रीय बाजारातच ही कार उपलब्ध असेल, ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही. दरम्यान, या कारच्या फीचर्सबाबतची काही माहिती समोर आली आहे. (Hyundai takes covers off New SUV Bayon, wil be most affordable car)
‘Bayon’ की ‘Bye-Onn’
कंपनीने त्यांच्या नवीन क्रॉसओवर एसयूव्हीचे नाव Bayon असे ठेवले आहे. पण त्याचा उच्चार ‘Bye-Onn’ असा केला जातो. हा शब्द फ्रेंच भाषेतील एका शब्दापासून प्रेरित आहे. त्यामुळे असा अंदाज वर्तवला जात आहे की, ही कार कदाचित सर्वात आधी युरोपियन बाजारात सादर केली जाईल. परंतु अलीकडेच कंपनीने स्पॅनिश भाषेपासून प्रेरणा घेऊन आपली 7-सीटर एसयूव्ही Alcazar आणण्याची घोषणा केली आहे. याबाबत कंपनीने सांगितले आहे की, ही त्यांची पहिली ‘मेड फर्स्ट फॉर इंडिया’ कार आहे आणि या कारचं ग्लोबल लाँचिंग भारतातूनच केलं जाणार आहे. त्यामुळे आता Bayon भारतात लाँच केली जातेय का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
शानदार लुक
Bayon चा ग्राउंड क्लीयरन्स आय 20 पेक्षा जास्त आहे. तथापि, या कारचा व्हीलबेस 2,580 मिलीमीटर इतका आहे. या कारचा एक्सटीरियर लुक दमदार आहे. या कारचा एक्सटीरियर लुक ह्युंदायच्याच अपडेटेड कोना या कारप्रमाणे आहे. यामध्ये अॅरो-शेप्ड हेडलॅम्प्स देण्यात आले आहेत मागच्या बाजूच्या लाईट्सही अशाच पद्धतीने डिझाईन करण्यात आल्या आहेत. या कारला क्रॉसओव्हर लुक देण्यासाठी कारच्या छताला टेपरिंग करण्यात आलं आहे.
कशी आहे ह्युंदाय i20?
Hyundai all new i20 ही कार पेट्रोल, डिझेल, टर्बो पेट्रोल बीएस-6 इंजिन आणि ट्रान्समिशनसह सज्ज आहे. ज्यामध्ये फर्स्ट इन-सेगमेंट इंटेलिजंट मॅन्युअल ट्रान्समिशन (आईएमटी), इंटेलिजंट व्हेरिएबल ट्रान्समिशन (आईवीटी), 7-स्पीड ड्यूल क्लच ट्रान्समिशन (डीसीटी) आणि मॅन्युअल व्हेरिएंटचा समावेश आहे.
all new i20 कारच्या पेट्रोल व्हेरिएंटची किंमत 6.79 लाख रुपये ते 11.17 लाख रुपयांमध्ये आहे. तर डिझेल व्हेरिएंटची किंमत 8.19 लाख रुपयांपासून ते 10.59 लाख रुपयांपर्यंत आहे. या या किंमती 31 डिसेंबर 2020 पर्यंत लागू असणार आहे.
नवीन i20 मध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आहे. ज्यामध्ये 83hp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. या इंजिनसह 5 स्पीड मॅन्युअल किंवा CVT गियरबॉक्सचा पर्याय आहे. डिझेल इंजिन 1.5 लीटर टर्बो यूनिट आहे जे 100hp पॉवर आणि 240Nm टॉर्क निर्माण करु शकतं. डिझेल इंजिनासह 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसुद्धा आहे. या कारचे इंजिन Venue, Creta, 2020 Verna आणि Seltos या कारमध्ये यापूर्वी वापरण्यात आले आहे.
संबंधित बातम्या
वाहन उत्पादक कंपन्यांचे ‘अच्छे दिन’ सुरु? फेब्रुवारीत रेकॉर्डब्रेक विक्री
Toyota Sales Report | टोयोटा किर्लोस्करचा धडाका, वाहनांच्या विक्रीत 36 टक्क्यांची वाढ
Maruti, Hyundai, Bajaj Auto ची फेब्रुवारीत रेकॉर्डब्रेक विक्री, वाहन कंपन्यांचा Sales Report जारी
भारतीय बाजारात MG Motor चा धुमाकूळ, विक्रीत 215 टक्क्यांची वाढ
(Hyundai takes covers off New SUV Bayon, wil be most affordable car)