AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हुंडईची क्रेटा इलेक्ट्रीक कार लवकरच लॉंच होणार, काय आहेत वैशिष्ट्ये पाहा

भारतात इलेक्ट्रीक कारचे मार्केट वाढत चालले आहे. हुंडई क्रेटा इलेक्ट्रीक कार लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार आहे. या कारची स्पर्धा MG ZS EV, Tata Curvv EV, Mahindra XUV400 सारख्या इलेक्ट्रीक कारशी होणार आहे.काय नवीन क्रेटा इलेक्ट्रीकची वैशिष्ट्ये पाहूयात...

हुंडईची  क्रेटा इलेक्ट्रीक कार लवकरच लॉंच होणार, काय आहेत वैशिष्ट्ये पाहा
creta file photo
| Updated on: Nov 25, 2024 | 9:43 PM
Share

हुंडई क्रेटा इलेक्ट्रीक कार बाबत मोठी अपडेट आलेली आहे. हुंडई कंपनीची मोस्ट अव्हेटेड क्रेटा इलेक्ट्रीक सुव्ह कारचे भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 मध्ये अनावरण होणार आहे. हुंडई मोटर इंडियाचे सीओ तरुण गर्ग यांनी या संदर्भात सांगितले की क्रेटा इलेक्ट्रीक कार जानेवारी 2025 मध्ये भरणाऱ्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपोमध्ये सादर केली जाणार आहे. यावेळी प्रवाशांसाठी बाजारात उतरविण्यात येणाऱ्या या ईलेक्ट्रीक कारची पहिली झलक प्रवाशांना पाहायाला मिळणार आहे.

हुंडई क्रेटा ईलेक्ट्रीक कार अनेकदा टेस्टींग दरम्यान नजरेस पडली आहे. इंटरनेटवर नव्या इलेक्ट्रीक कारची लेटेस्ट स्पाई इमेज पाहायला मिळत आहे. या इमेजनुसार हुंडईने आपल्या क्रेटाच्या इलेक्ट्रीक व्हर्जनला नवीन रुपात सादर करेल असे म्हटले जात आहे. इलेक्ट्रीक कारमुळे याला अधिक सुरक्षिततेसाठी खास क्लोज्ड फ्रंट ग्रिल असणार आहे. आणि एअरो डायनामिक एलॉय व्हील देण्यात आली आहे. इलेक्ट्रीक कार अपडेटेड रिअर बम्पर मिळणार असून यात नवीन क्रेटा ईव्ही बॅज देखील असणार आहे.

क्रेटाचे धमाल फिचर्स

हुंडईने इंधनावर धावणाऱ्या  क्रेटा कारच्या एवजी अल्काझरकडून प्रेरणा घेऊन केबिनला अधिक चांगले केले आहे. नवीन क्रेटा ईलेक्ट्रीक कारमध्ये ड्रायव्हर सिलेक्ट्रर सह एक नवा थ्री- स्पोक स्टीअरिंग व्हील दिले जाणार आहे. सेंट्रल कंसोलमध्ये डबल कपहोल्डर्स, ऑटो होल्ड आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेससाठी कंट्रोल बटण, ३६० डिग्री कॅमेरा आणि फ्रंट वेंटिलेटेड सीटसह परिचित लेआऊट पाहायला मिळेल, या वायरलेस चार्जर, तसेच ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सेट-अप अल्काझर सारखाच असणार आहे. क्रेटात इंफोटेनमेंट सिस्टम आणि ड्राइव्हर कंसोलसाठी डबल १०.२५ इंचा डिस्प्ले असेल. क्रेटा EV मध्ये लेव्हल २ ADAS, सहा एयरबॅग, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, फ्रंट पार्किंग सेंसर सारखे अनेक फीचर असतील.

पाचशे किमीपर्यंत रेंज

क्रेटा इलेक्ट्रीकमध्ये ४५ kWh क्षमतेची बॅटरी असेल. सिंगल चार्ज केल्यानंतर ही कार ५०० किमीपर्यंत रेंज देण्यासाठी सक्षम असेल. टाटा कर्व्हमध्ये एंट्री-लेव्हल वेरिएंटमध्ये समान कॅपिसिटीचा बॅटरी सेटअप असतो. दूसरीकडे MG ZS EV मध्ये ५०.३ kWh कॅपिसिटीची बॅटरी आहे. तसेच आगामी मारुती सुझुकी ई – विटारा देखील दोन बॅटरी पर्याय असलेल्या इलेक्ट्रीक कार बाजारात येणार आहे.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.