प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवा; Electric Car रॅलीत आदित्य ठाकरेंचं आवाहन
मुंबईला स्वच्छ आणि ग्रीन पर्यावरणाची आवश्यकता आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण कमी होत असल्याने जनजागृतीच्या उद्देशाने ऑटोकार इंडियाच्या वतीने शनिवारी मुंबईत 'ग्रीन मुंबई ड्राइव्ह 2021' या इलेक्ट्रिक कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई : मुंबईला स्वच्छ आणि ग्रीन पर्यावरणाची आवश्यकता आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण कमी होत असल्याने जनजागृतीच्या उद्देशाने ऑटोकार इंडियाच्या वतीने शनिवारी मुंबईत ‘ग्रीन मुंबई ड्राइव्ह 2021’ या इलेक्ट्रिक कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हिरवा झेंडा दाखवला. तसेच ठाकरे यांनी स्वतः इलेक्ट्रिक कार चालवून या रॅलीत सहभागही घेतला. (Increase use of electric vehicles to reduce pollution; Aditya Thackeray’s appeal in Electric Car Rally)
यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, मागील काही वर्षात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात मोठा विकास होतोय. या वाहनांचा नागरिकांनी अधिकाधिक वापर करावा, यासाठी ईव्ही धोरणाच्या माध्यमातून शासन विविध उपाययोजना करीत आहे. प्रदूषण कमी करण्यावरही भर देण्यात येत आहे. सर्वच शहरांमधून या वाहनांसाठी चांगला प्रतिसाद मिळत असून चार्जिंग स्टेशन्स वाढविण्यासाठीही प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
महालक्ष्मी रेसकोर्स पासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मार्गे विक्रोळी या मार्गावर या रॅलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये टाटा, टेस्ला, व्होल्वो, ऑडी, जॅग्वार, मर्सिडीज, एमजी, ह्युंडई अशा विविध कंपन्यांची सुमारे 30 वाहने सहभागी झाली होती. यावेळी ऑटोकारचे प्रमुख सोराबजी, अदानी इलेक्ट्रिसिटीचे जी. अदानी तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
I had the honour to flag off the #GreenMumbaiDrive organised by @autocarindiamag and @Adani_Elec_Mum today. The all electric vehicle rally is to raise awareness about EVs, bust myths and encourage more citizens to switch to electric at the earliest. pic.twitter.com/hTcVD4ak78
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 2, 2021
कॉसिस ई-मोबिलिटी आणि राज्य सरकारमध्ये 2823 कोटींचा सामंजस्य करार
महाराष्ट्र पर्यावरणपूरक शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. याचाच एक भाग म्हणून राज्याने इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याअंतर्गत ई-मोबिलिटी उत्पादन आणि पायाभूत सुविधा विकास क्षेत्रात कॉसिस कंपनी मार्फत गुंतवणूक केली जात आहे. या कंपनीला राज्य शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केले.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि ‘कॉसिस’ ई मोबिलिटी कंपनीदरम्यान पुणेजवळ तळेगाव येथे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करण्याबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात सामंजस्य करार करण्यात आला. शून्य उत्सर्जन व पर्यावरणपूरक वाहन निर्मिती क्षेत्राला चालना देण्यासाठी उद्योग विभाग व इंग्लंडच्या कॉसिस इ. मोबिलीटी कंपनी यांच्यात 2823 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी देसाई बोलत होते.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग विभागाचे अप्रपर मुख्य सचिव बलदेव सिंग, विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी अन्बलगन, कॉसिस ग्रुपचे संस्थापक आणि संचालक राम तुमुलुरी आदी उपस्थित होते. एमआयडीसीच्या वतीने पी अन्बलगन यांनी तर कॉसिसच्या वतीने संचालक रवीकुमार पंगा यांनी करारावर स्वाक्षरी केली.
प्रदूषण कमी करणे गरजेचे : आदित्य ठाकरे
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या ईव्ही धोरणाबाबत माहिती दिली. प्रदूषण कमी करणे ही आजची गरज असून बदलत्या तंत्रज्ञानानुसार महाराष्ट्र ई मोबिलिटीकडे वाटचाल करीत आहे. वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने अत्यावश्यक बाबींचा स्वीकार करण्याच्या राज्याच्या धोरणानुसार राज्यात गुंतवणूक करीत असल्याबद्दल त्यांनी कॉसिस कंपनीचे स्वागत केले.
इतर बातम्या
Yamaha YZF-R15 V4 चं वितरण सुरु, जाणून घ्या नव्या मोटारसायकलमध्ये काय आहे खास?
महिन्याला 2500 रुपयांच्या EMI वर घरी न्या TVS ची दमदार मायलेजवाली बाईक, जाणून घ्या संपूर्ण ऑफर
1 लीटर पेट्रोलमध्ये 45km रेंज, 80 हजारांची Suzuki Access 125 अवघ्या 17,820 रुपयात
(Increase use of electric vehicles to reduce pollution; Aditya Thackeray’s appeal in Electric Car Rally)