Car Paint : तुम्ही तुमच्या कारचा रंग बदलल्यास दंड भरावा लागतो का? जाणून घ्या ट्रॅफिक नियम
Car Paint : वाहतुकीचे बरेच नियम आहेत. त्यात कारचा रंग बदलल्यास दंड भरावा लागतो का? गाडीचा रंग बदलण्याआधी आरटीओची परवानगी घ्यावी लागते का? जाणून घ्या नियम, कायदा.

गेल्या काही वर्षांपासून ऑटो कंपन्या ड्यूल टोन कलरमध्ये कार्स लॉन्च करत आहेत. पण काही वर्षांपूर्वी सिंगल कलरमध्ये कार लॉन्च होत होत्या. त्यावेळी कार मालक दुसऱ्या रंगामध्ये कार पेन्ट करुन घ्यायचे. ज्यावेळी हे कार ओनर आपली कार घेऊन रस्त्यावर जायचे, त्यावेळी अनेक ठिकाणी पोलीस त्यांना थांबवायचे. ट्रॅफिक कायदा मोडल्यामुळे त्यांच्याकडून दंड वसूल केला जायचा. तुम्ही तुमच्याकडे असलेली सिंगल कलर कार दुसऱ्या रंगात पेन्ट करुन घ्यायचा विचार करत असाल, तर तुम्ही ट्रॅफिक नियम जाणून घ्या.
वाहनाचा रंग बदलण्यासाठी तुम्हाला तुमचं क्षेत्रीय परिवहन कार्यालय (आरटीओ) कडून परवानगी घ्यावी लागते. आरटीओमध्ये पेंट बदलण्यासाठी तुम्हाला अर्ज द्यावा लागतो. नव्या रंगासोबत अपग्रेड करावं लागतं. रंग बदलल्यानंतर तुम्हाला तुमच्या आरटीओ कार्यालयात जाऊन गाडीच्या सर्टिफिकेटमध्ये (आरसी) रंग बदलाच्या अपडेटची माहिती द्यावी लागते.
कायदेशीर प्रोसेस काय?
तुम्ही आरटीओ कार्यालयात रंग बदलाच अपडेट दिलं नाही, तर ट्रॅफिक पोलीस तुम्हाला रोखू शकतात. तुम्हाला दंड भरावा लागेल. असं केलं नाही, तर ते ट्रॅफिक नियमाच उल्लंघन मानलं जातं. भारतात वाहनाचा रंग बदलल्यानंतर आरटीओला कळवलं नाही, तर तुम्हाला दंड भरावा लागेल. वाहन सुद्धा जप्त होऊ शकतं. म्हणून रंग बदलल्यानंतर कायदेशीर प्रक्रियेच पालन करा.