AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जबरदस्त फीचर्स आणि 1.6 लाख किमी वॉरंटीसह Electric Jaguar I-Pace भारतात लाँच होण्यास सज्ज

जॅग्वार लँड रोवर इंडियाने (Jaguar Land Rover India) सोमवारी घोषणा केली आहे की, कंपनी 9 मार्च 2021 रोजी भारतात त्यांची इलेक्ट्रिक एसयूव्ही आय-पेस (Electric Jaguar I-Pace) सादर करणार आहे.

जबरदस्त फीचर्स आणि 1.6 लाख किमी वॉरंटीसह Electric Jaguar I-Pace भारतात लाँच होण्यास सज्ज
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 5:09 PM

मुंबई : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज कार कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स लाँच करत आहेत. तसेच यापूर्वीदेखील देशात काही इलेक्ट्रिक कार्स लाँच झाल्या आहेत. दरम्यान, प्रसिद्ध कार निर्माती कंपनी जॅग्वार लँड रोवर इंडिया (Jaguar Land Rover India) कंपनी भारतात त्यांची नवी इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच करणार आहे. (Jaguar Land Rover India to launch Electric Jaguar I-Pace in India next month)

जॅग्वार लँड रोवर इंडियाने (Jaguar Land Rover India) सोमवारी घोषणा केली आहे की, कंपनी 9 मार्च 2021 रोजी भारतात त्यांची इलेक्ट्रिक एसयूव्ही आय-पेस (Electric Jaguar I-Pace) सादर करणार आहे. जॅग्वार लँड रोवरने (जेएलआर) आधीच या मॉडेलसाठी बुकिंग सुरु करण्यात आली आहे.

जेएलआर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रोहित सूरी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘‘लँड रोवर डिफेंडरचे डिजिटल वेरिएंट सादर केल्यानंतर त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता आम्ही भातात Jaguar I-Pace च्या लाँचिंगसाठी उत्सूक आहोत. Jaguar I-Pace मध्ये 90kWh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे जी 100kW रॅपिड चार्जरद्वारे 80 टक्के चार्ज करण्यासाठी केवळ 45 मिनिटं लागतील. या गाडीमध्ये असलेली लिथियम आयन बॅटरी इलेक्ट्रिक मोटर्सद्वारे 400 पीएस पॉवर देते. कंपनीने आय-पेसच्या ग्राहकांना चार्जिंगची बेस्ट सुविधा देण्यासाठी टाटा पॉवरशी भागीदारी केली आहे.

बॅटरीवर 8 वर्षांची वॉरंटी

आय-पेस च्या 90 केडब्ल्यूएच लिथियम आयन बॅटरीवर 8 वर्षांची किंवा 1.6 लाख किलोमीटरची वॉरंटी दिली आहे. सोबतच आय-पेसचं पाच वर्षांसाठी सर्विस पॅकेज दिलं जाईल. ही कार तीन वेरिएंट्समध्ये सादर केली जाईल. त्यामध्ये एस, एसई आणि एचएसई अशी या तीन वेरिएंट्सची नावं आहेत. ही कार 4.8 सेकंदात शून्य ते 100 किमी प्रति तास इतका वेग पकडू शकते. जॅग्वारच्या आय-पेसच्या फ्रंट साईडला दोन सिंक्रोन्स मॅग्नेटिक इलेक्ट्रिक मोटर्ससह रियर एक्सलही मिळेल, जे 696 एनएम पीक टॉर्कसह 395 बीएचपी पॉवर आउटपुट जनरेट करेल. यामध्ये AWD (All-wheel drive) सिस्टिमही दिली जाईल. ही 480 हून अधिक किलोमीटपर्यंतची रेंज देईल.

हेही वाचा

Special Story : ‘या’ आहेत सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या देशातील टॉप 5 इलेक्ट्रिक कार्स

दिल्ली सरकारचा मास्टर प्लॅन, ईलेक्ट्रिक टू-व्हिलर वापरल्यास 22 हजारांची बचत होणार

2024 पर्यंत दिल्लीत विकली जाणारी दर 4 पैकी 1 गाडी इलेक्ट्रिक असणार, केजरीवाल सरकारची जोरदार तयारी

बहुप्रतीक्षित MG ZS EV 2021 फेसलिफ्ट भारतात लाँच, एकदा चार्ज केल्यावर 400 किमी धावणार

(Jaguar Land Rover India to launch Electric Jaguar I-Pace in India next month)

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.