तब्बल 800cc इंजिन, कावासाकीची नवी बाईक भारतात लाँच
कावासाकीने (Kawasaki) भारतात आपली नवी बाईक W800 लाँच केली आहे. या बाईकची भारतात एक्स-शोरूम किंमत 7.99 लाख रुपये आहे. यावर्षी ऑगस्टपासूनच या बाईकच्या डिलिव्हरीला सुरुवात होणार आहे.
मुंबई : कावासाकीने (Kawasaki) भारतात आपली नवी बाईक W800 लाँच केली आहे. या बाईकची भारतात एक्स-शोरूम किंमत 7.99 लाख रुपये आहे. यावर्षी ऑगस्टपासूनच या बाईकच्या डिलिव्हरीला सुरुवात होणार आहे. नवी कावासाकी W800 ची स्पर्धा थेट रॉयल एनफील्ड Interceptor आणि Triumph Street Twin सोबत होणार आहे.
कावासाकी W800 मध्ये 773cc, एअरकूल्ड, फ्यूअल-इंजेक्टेड इंजिन लावण्यात आले आहे. यामुळे बाईकला 47.5hp ची पॉवर आणि 62.9Nm टॉर्क मिळतो. या गाडीचे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सचे आहे. बाईकच्या समोरच्या बाजूला 320mm डिस्क आणि रिअरमध्ये 270mm डिस्क आहे. सुरक्षेसाठी या गाडीत एलईडी हेडलाईट, स्लिपर क्लच आणि ड्यूअल चॅनल ABS फिचर देखील देण्यात आले आहेत. रेट्रो स्टाईलच्या बाईकमध्ये येणारे सर्व फिचर या बाईकमध्ये आहेत. या बाईकला 18 इंचाचे टायर्स देण्यात आले आहेत.
कंपनीने या बाईकचा केवळ स्ट्रीट व्हेरिअंट लाँच केला आहे. लवकरच याचा कॅफे व्हेरिअंट देखील लाँच होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कावासाकी W800 स्ट्रीट आणि कॅफे रेसर व्हिरिअंटमध्ये उपलब्ध आहे. या दोन्ही बाईक्समध्ये प्रीमिअम क्वालिटी पाहायला मिळत आहे. कावासाकीने ही बाईक ग्लोबल युरो 4 इमिशनचे नियम पालत नसल्याने 2016 मध्ये या बाईकची निर्मिती बंद केली होती. त्यानंतर 2018 मध्ये ही बाईक रिलाँच करण्यात आली होती.