कारप्रेमींच्या आनंदावर विरजण; 1 जानेवारीपासून ‘या’ कारची किंमत वाढणार

काही दिवसांपूर्वीच मारुती सुझुकीने आपल्या गाड्यांची किंमत वाढवणार असल्याचे जाहीर केले होते. | Kia motors

कारप्रेमींच्या आनंदावर विरजण; 1 जानेवारीपासून 'या' कारची किंमत वाढणार
Follow us
| Updated on: Dec 15, 2020 | 12:02 PM

नवी दिल्ली: कोरोनाच्या संकटामुळे यंदाचे वर्ष वाहननिर्मिती क्षेत्रासाठी (Auto Sector) खडतर गेले. त्यामुळे आगामी वर्षात अनेक गाड्यांच्या किंमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच मारुती सुझुकीने आपल्या गाड्यांची किंमत वाढवणार असल्याचे जाहीर केले होते. यामध्ये आता आता आणखी एका कंपनीची भर पडली आहे. (Kia motors car prices will be increased)

येत्या जानेवारी महिन्यापासून किआ या कंपनीच्या गाड्यांच्या किंमतीमध्येही मोठे बदल होणार आहेत. गेल्याचवर्षी वाहननिर्मिती क्षेत्रात पदार्पण केलेल्या किआ (Kia motors) कंपनीची मॉडेल बाजारपेठेत चांगलीच लोकप्रिय ठरली होती. मात्र, आता या गाड्यांच्या किंमतीत वाढ होणार असल्याने वाहनप्रेमींच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे.

‘किआ’च्या कारची किंमत का वाढणार?

इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्याने किआ कंपनीकडून सगळ्या गाड्यांची किंमत वाढवण्यात येणार आहे. मात्र, ही किंमत नेमकी किती वाढणार, याबाबत कंपनीकडून माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, जाणकारांच्या अंदाजानुसार ‘किआ’च्या सेल्टोर आणि सोनेट या मॉडेल्सची किंमत काही हजारांनी वाढू शकते.

कोणत्या मॉडेल्सची किंमत वाढणार?

किआ सोनेट या कारच्या बेसिक मॉडेलची किंमत 6.71 लाख रुपये इतकी आहे. तर सोनेट टर्बो मॉडेलची किंमत 9.49 लाखांपासून सुरु होते. तर किआच्या डिझेल कारची किंमत साधारण 8.05 लाख इतकी आहे.

किआ मोटर्सचा नवा प्लॅन; भारतातील निमशहरी आणि ग्रामीण बाजारपेठ काबीज करण्याची तयारी

गेल्याचवर्षी वाहननिर्मिती क्षेत्रात पदार्पण केलेल्या किआ (Kia motors) कंपनीने आता भारतातील निमशहरी आणि ग्रामीण बाजारपेठेत विस्तार करण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले आहे. ‘किआ’च्या यापूर्वीच्या सोनेट आणि सेल्टोस या एसयुव्ही कारचा भारतीय बाजारपेठेत चांगलाच खप झाला होता. यानंतर आता ‘किआ’ने भारतातील बाजारपेठ आणखी विस्तारण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी कंपनीने डीलर्सना विशेष लाभ द्यायचे ठरवले आहे. आम्ही सध्या आमचे नेटवर्क वाढवण्यावर भर देत आहोत. पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत देशभरात 300 टचपॉईंटस उभारण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. याशिवाय, आम्ही टियर 4 शहरांवरही लक्ष केंद्रित करणार आहोत. जेणेकरून आम्ही बाजारपेठेत आणखी खोलवर शिरकाव करू, असे ‘किआ’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

ऑटो इंडस्ट्रीने दिवाळीत गियर बदलला, नोव्हेंबर महिन्यात वाहनांची रेकॉर्डब्रेक विक्री

Alert! तुमच्या गाडीवर त्वरित हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावून घ्या, अन्यथा ‘ही’ कामे करता येणार नाहीत

Maruti Suzuki चा नवा विक्रम, ऑनलाईन चॅनेलच्या माध्यमातून दोन लाखांहून अधिक गाड्यांची विक्री

(Kia motors car prices will be increased)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.