MG Astor लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या कसा असेल कारचा लूक, किंमत आणि फीचर्स

एमजी मोटर्सने ऑक्टोबर 2021 मध्ये लॉन्च होण्यापूर्वी MG Astor SUV सादर केली आहे. कंपनीची आगामी फोर-व्हीलर ही भारतातील पहिली आर्टिफिशियली इंटेलिजेंट (AI) कार असण्याची अपेक्षा आहे.

MG Astor लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या कसा असेल कारचा लूक, किंमत आणि फीचर्स
Mg Astor Suv
Follow us
| Updated on: Oct 04, 2021 | 4:17 PM

मुंबई : एमजी मोटर्सने ऑक्टोबर 2021 मध्ये लॉन्च होण्यापूर्वी MG Astor SUV सादर केली आहे. कंपनीची आगामी फोर-व्हीलर ही भारतातील पहिली आर्टिफिशियली इंटेलिजेंट (AI) कार असण्याची अपेक्षा आहे. Astor गेल्यात आठवड्यात एमजी शोरूममध्ये प्रदर्शित झाली आहे. तथापि, ब्रँड लॉन्च होण्यापूर्वी या कारबद्दल अधिक तपशील शेअर करण्याची शक्यता आहे. भारतातील ग्राहक MG Astor SUV लाँच होण्याची वाट पाहत आहेत. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी कारचा प्रत्येक पैलू सादर करणार आहोत. (Know why you should wait for MG Astor, what is the specialty of SUV)

एमजी मोटर इंडियाने (MG Motor India) नुकताच आपल्या MG Astor कारवरून पडदा हटवला आहे. कंपनीच्या सध्याच्या MG ZS EV ची ही पेट्रोल आवृत्ती आहे. पण कंपनीने त्यात अशी अनेक वैशिष्ट्ये दिली आहेत ज्यामुळे ती देशातील पहिली आर्टिफिशियल इंटेलीजन्स (AI) वाली कार ठरते. MG Astor मध्ये, कंपनीने पर्सनल AI असिस्टंट दिलं आहे. या कारच्या पर्सनल AI असिस्टंटला पॅरालिम्पिक खेळाडू आणि खेलरत्न दीपा मलिक यांनी आवाज दिला आहे. एसयूव्ही विभागातील ही देशातील पहिली आर्टिफिशियल इंटेलीजन्स (AI) कार असल्याचा कंपनीचा दावा आहे.

एसयूव्ही लॉन्च करण्यापूर्वी Astor ची ट्रिम रेंज टाइप-अप्रूव्हल सर्टिफिकेटद्वारे ऑनलाइन लीक झाली आहे. MG Astor दोन इंजिन पर्यायांसह उपलब्ध असेल, ज्यात 1.5 लीटर NA पेट्रोल मोटर (110 PS / 144 Nm) आणि 1.3 लीटर टर्बो-पेट्रोल मोटर (140 PS / 220 Nm) यांचा समावेश असेल. पहिल्या इंजिनमध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन किंवा 8 स्टेप सीव्हीटी असू शकते, तर नंतरचे 6 स्पीड टॉर्क-कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. Astor 1.5L MT एकूण 6 ट्रिम लेव्हलमध्ये उपलब्ध होईल, ज्यात स्टाईल, सुपर, स्मार्ट एसटीडी, स्मार्ट, शार्प एसटीडी आणि शार्प ट्रिम लेव्हल्सचा समावेश असेल.

मिड-साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये कांटे की टक्कर

मिड-साइज एसयूव्ही सेगमेंट भारतीय ऑटोमोबाईल उद्योगात सर्वात स्पर्धात्मक आहे. क्रेटा ते सेल्टॉस आणि कुशक पर्यंत, येथे प्रत्येक वाहनाचा स्वतःचा एक यूएसपी आहे. अशा परिस्थितीत, एमजी मोटर इंडिया अॅस्टरला अद्वितीय वैशिष्ट्यांसह पॉवर-पॅक पर्याय म्हणून सादर करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही.

फीचर्स

ग्राहकांना तीन इंटीरियर थीममधून आवडती थीम निवडता येईल. त्यापैकी एक म्हणजे ड्युअल-टोन संगरिया रेड. MG Astor मध्ये 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. यामध्ये अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोचा समावेश आहे. इतर स्टँडर्ड फीचर्समध्ये JioSaavn अॅप, आणि MapMyIndia द्वारे मॅप्स आणि नेव्हिगेशन सेवा समाविष्ट आहेत.

एमजी मोटर इंडिया Astor ला हवेशीर फ्रंट सीट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल सारख्या सुविधांनी सुसज्ज करण्याची अपेक्षा आहे. एमजी मोटर इंडिया त्याच्या कारमध्ये इंडस्ट्रीमधील पहिला पर्सनल असिस्टंट ऑफर करत आहे जे अमेरिकन फर्म स्टार डिझाईनने बनवले आहे. या विभागात पहिली ऑटोनॉमस लेव्हल 2 टेक्नोलॉजी दिली जात आहे.

MG Astor ची किंमत

MG Astor ची किंमत आगामी सणासुदीच्या हंगामात जाहीर होण्याची शक्यता आहे. एसयूव्हीची किंमत 10 लाख ते 16 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) दरम्यान असण्याची शक्यता आहे. ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टॉस किंवा टाटा हॅरियरशी Astor ला स्पर्धा करावी लागेल.

इतर बातम्या

Yamaha YZF-R15 V4 चं वितरण सुरु, जाणून घ्या नव्या मोटारसायकलमध्ये काय आहे खास?

महिन्याला 2500 रुपयांच्या EMI वर घरी न्या TVS ची दमदार मायलेजवाली बाईक, जाणून घ्या संपूर्ण ऑफर

1 लीटर पेट्रोलमध्ये 45km रेंज, 80 हजारांची Suzuki Access 125 अवघ्या 17,820 रुपयात

(Know why you should wait for MG Astor, what is the specialty of SUV)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.