अवघ्या 1.5 युनिट वीजेवर चार्ज होणाऱ्या ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरवर 20000 रुपयांचा डिस्काऊंट
कोमकी टीएन-95 (Komaki TN-95) या इलेक्ट्रिक स्कूटरच्या (Electric Scooter) किंमतीत 20,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे.
मुंबई : कोमाकी (Komaki) कंपनीने नुकतीच दिल्लीत आपली नवीन डीलरशिप सुरू करण्याची घोषणा केली आहे. या व्यतिरिक्त, या इलेक्ट्रिक वाहन कंपनीने 2021 मध्ये आतापर्यंत 14,500 वाहने विकली आहेत. कंपनीच्या नव्या शोरूमबद्दल बोलायचे झाल्यास हे आउटलेट 1,500 स्क्वेअर फूट क्षेत्रामध्ये पसरलेले आहे आणि ते झंडेवालानमध्ये आहे. (Komaki reduced price of Komaki TN 95 and SE electric scooter due to Delhi EV policy)
कंपनीचे म्हणणे आहे की, नव्या शोरुमच्या उद्घाटनापासून या डीलरशिपने आतापर्यंत 120 हून अधिक वाहने विकली आहेत. दरम्यान, आता एक चांगली बातमी समोर आली आहे की, कोमकी टीएन -95 (Komaki TN-95) या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीत 20,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे ही स्कूटर दिल्लीत 20 हजार रुपये कमी किंमतीत विकली जात आहे. तसेच दिल्लीत कोमाकी एसई इलेक्ट्रिक स्कूटरची (Komaki SE Electric Scooter) किंमत 15,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.
इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी होऊ लागल्या आहेत. कुठेतरी याचे श्रेय दिल्ली सरकारच्या ईव्ही धोरणाचा एक भाग म्हणून दिल्या जाणाऱ्या अनुदानाला द्यावे लागेल. ईव्ही निर्माता कंपनीचे म्हणणे आहे की, सर्व टेस्ट व्हीकल आणि आफ्टर-सेल्स सर्व्हिस केवळ डीलरशिपवर उपलब्ध असेल. इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत, येणार्या काळात ग्राहकांना अधिक मॉडेल्स पाहायला मिळतील.
कशी आहे Komaki SE?
Komaki SE मध्ये तुम्हाला 3 kW BLDC इलेक्ट्रिक मोटर मिळेल. जी डिटॅचेबल लिथियम आयन बॅटरी पॅकसह येते. Komaki SE या स्कूटरचं टॉप स्पीड 85 किमी प्रति तास इतकं आहे, तर ही स्कूटर एकदा फुल चार्ज केल्यानंतर 95-125 किमीपर्यंतची रेंज देते. Komaki SE मध्ये फ्रंट Glove बॉक्स मिळेल जो यूएसबी चार्जिंग पोर्टसह मिळतो. यामध्ये तुम्हाला दोन रायडिंग मोड्स देण्यात आले आहेत. तसेच तुम्हाला ऑनबोर्ड सेल्फ डायग्नॉसिस सिस्टिमही दिली आहे. या स्कूटरमध्ये तुम्हाला सर्विस रिमायंडरदेखील देण्यात आला आहे.
या स्कूटरमध्ये तुम्हाला LED डिस्प्ले, मल्टीमीडिया कंट्रोल स्विच आणि इनबिल्ट ब्लुटूथ स्पीकर्स देण्यात आले आहेत. स्कूटर रिमोट लॉकिंग आणि अँटी थेफ्ट सिस्टिमसह सादर करण्यात आली आहे. सस्पेंशन ड्युटीबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये तुम्हाला टेलिस्कोपिक फोर्क्स अपफ्रंट आणि रियरमध्ये ट्विन शॉक्स देण्यात आले आहेत. ब्रेकिंगसाठी दोन्ही बाजूला डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत. कोमाकीने म्हटलं आहे की, SE फुल चार्ज होण्यासाठी केवळ 1.5 यूनिट्स विजेचा वापर करते.
इतर बातम्या
सिंगल चार्जवर 116 किलोमीटर रेंज, नव्या सब्सिडीमुळे ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर 14,500 रुपयांनी स्वस्त
(Komaki reduced price of Komaki TN 95 and SE electric scooter due to Delhi EV policy)