KTM आणि Husqvarna ने मोटारसायकल्सच्या किंमती वाढवल्या, जाणून घ्या कोणत्या बाईक महागल्या?

केटीएम (KTM) आणि हुस्कवार्नाने (Husqvarna) त्यांच्या बाईक्सच्या किंमती वाढवल्या आहेत.

KTM आणि Husqvarna ने मोटारसायकल्सच्या किंमती वाढवल्या, जाणून घ्या कोणत्या बाईक महागल्या?
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 1:26 PM

मुंबई : केटीएम (KTM) आणि हुस्कवार्नाने (Husqvarna) त्यांच्या बाईक्सच्या किंमती वाढवल्या आहेत. नव्या किंमती 4 जानेवारी 2021 पासून लागू करण्यात आल्या आहेत. बाईक्सच्या किंमतीत 1,466 रुपये ते 4,485 रुपयांपर्यंतची वाढ करण्यात आली आहे. KTM 390 अॅडव्हेंचरच्या किंमतीत सर्वाधिक 4,485 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या बाईकची किंमत आता 3.10 लाख रुपये झाली आहे. (KTM Husqvarna increase prices of motorcycles know how expensive vehicles)

KTM 390 च्या किंमतीत एक महिन्यापूर्वी 1,447 रुपयांची वाढ करण्यात आली होती. तसेच केटीएमची सर्वात छोटी मोटारसायकल केटीएम 125 आरसीच्या किंमतीत करण्यात आलेली वाढ सर्वात कमी आहे. या बाईकच्या किंमतीत 1 हजार 466 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या बाईकची किंमत आता 1.63 लाख रुपये इतकी आहे. केटीएम 125 ड्युक आणि 200 ड्यूक या बाईक्सच्या किंमतीत क्रमशः 1,497 आणि 2,576 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर 250 ड्युकच्या किंमतीत 3,192 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

केटीएम 390 ड्युकच्या किंमतीत कंपनीने 3,934 रुपयांची वाढ केली आहे. तर आरसी 200 आणि आरसी 390 च्या किंमतींमध्ये क्रमशः 3,021 रुपये आणि 3,803 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर केटीएम 250 अॅडवेंचरच्या किंमतीत 3,667 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

सोबतच हुस्कवार्ना स्वार्टपिलन 250 आणि विटपिलन 250 च्या किंमतीत क्रमशः 2,816 आणि 2,818 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सर्व केटीएम आणि हुस्कवार्ना मॉडल्सच्या किंमतींमध्ये वृद्धी करण्यात आली आहे, त्याबाबत कंपन्यांच्या वेबसाईट्सवर माहिती देण्यात आली आहे. त्यावरुन ग्राहकांना माहिती घेता येईल. दरम्यान, वर देण्यात आलेल्या सर्व किंमती एक्स शोरुम दिल्लीतल्या आहेत.

देशातील सर्वच वाहन कंपन्यांनी कच्च्या मालाच्या आणि अन्य साहित्याच्या किंमती वाढल्याने वाहनांच्या किंमतींमध्ये वृद्धी केली आहे. अनेक कंपन्यांनी या जानेवारी महिन्यापासून वाहनांच्या किंमतींमध्ये वाढ केली आहे.

हेही वाचा 

प्रतीक्षा संपली! भारतात बनलेली KTM 490 लाँच होणार, जाणून घ्या काय आहे खास?

Royal Enfield Meteor 350 चा जलवा, एका महिन्यात बंपर विक्री, बुलेटलाही मागे टाकले

लाडकी Tata Safari परत येतेय, लवकरच प्री-बुकिंगला सुरुवात होणार

लाखो दिल की धडकन! 2021 मध्ये Royal Enfield च्या चार नव्या बुलेट, वाचा सविस्तर

(KTM Husqvarna increase prices of motorcycles know how expensive vehicles)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.