महिंद्राची शानदार ऑफर, ट्रॅक्टरच्या खरेदीसह 1 लाखाचा आरोग्य विमा, जाणून घ्या संपूर्ण ऑफर
महिंद्रा अँड महिंद्राने (Mahindra And Mahindra) नवीन ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक उत्तम ऑफर जाहीर केली आहे.
मुंबई : कोरोना साथीच्या रोगाच्या (Cotona Pandemic) पार्श्वभूमीवर महिंद्रा अँड महिंद्राने (Mahindra And Mahindra) नवीन ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक उत्तम ऑफर जाहीर केली आहे. यात कंपनी नवीन ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपयांचा आरोग्य विमा आणि प्री-अप्रूव्ह्ड आणीबाणी आर्थिक सहाय्य (प्री-अप्रूव्ह्ड इमरजन्सी फायनॅन्शियल) पुरवेल.
कंपनी आपल्या ‘एम-प्रोटेक्ट कोव्हिड’ (M-Protect COVID) योजनेंतर्गत ही ऑफर देत आहे, ज्याचा उद्देश नवीन महिंद्रा ट्रॅक्टरच्या ग्राहकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कोव्हिड – 19 पासून नुकसान होण्यापासून वाचविणे हा आहे. कंपनीने म्हटले आहे की, या योजनेत एक युनिक COVID-19 मेडिक्लेम पॉलिसी देण्यात आली आहे, ज्यामध्ये ग्राहकांना कोरोना झाल्यास 1 लाख रुपयांचा हेल्थ कव्हर आणि होम क्वारंटाईन बेनिफिट्स मिळतील. उपचारांदरम्यान सहाय्य
याव्यतिरिक्त, कंपनी COVID-19 वरील उपचारांदरम्यान झालेल्या वैद्यकीय खर्चात आपलं योगदान देण्यासाठी पूर्व मान्यताप्राप्त कर्ज देऊन आर्थिक सहाय्य करेल. तसेच जीवितहानी झाल्यास ‘महिंद्रा लोन सुरक्षा’ अंतर्गत ग्राहकांच्या कर्जाचा विमा उतरवला जाईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
महिंद्रा शेतकऱ्यांसोबत
महिंद्रा अँड महिंद्राने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, M-Protect COVID योजना महिंद्राच्या मे 2021 मध्ये खरेदी केलेल्या ट्रॅक्टरच्या पूर्ण रेंजवर उपलब्ध होईल. कंपनीचे अध्यक्ष (फार्म इक्विपमेंट सेक्टर) हेमंत सिक्का म्हणाले की, एम-प्रोटेक्ट कोविड स्कीम’ ही शेतकऱ्यांना लक्ष्य करण्यासाठीचा एक नवीन उपक्रम आहे कारण या कठीण काळातही सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत.
सिक्का म्हणाले की, COVID संबंधित घटनांचा प्रभाव कमी करण्यासाठी एम-प्रोटेक्टच्या सहाय्याने आम्हाला लोकांची सेवा करण्याचा आणि त्यांना सपोर्ट करण्याची संधी मिळाली आहे. एम-प्रोटेक्टद्वारे आम्हाला आशा आहे की, आमच्या शेतकर्यांना निरोगी जीवन मिळेल.
मे आणि जून महिना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा
महिंद्रा आणि महिंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी, फार्म डिव्हिजन शुभब्रत साहा म्हणाले की, मे आणि जून हे दोन महिने शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहासाठी महत्त्वाचे आहेत. अशातच COVID-19 च्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आमच्या नवीन एम-प्रोटेक्ट कोविड योजनेचे उद्दीष्ट आहे की, शेतकऱ्यांच्या चिंता कमी करायच्या आहेत. कारण पुढील दोन महिने त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचे आहेत.
इतर बातम्या
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात MG Motor मैदानात, नागपूर आणि विदर्भात 100 Hector अॅम्ब्युलन्स वितरित करणार
अर्ध्या किंमतीत खरेदी करा Hero Maestro EDGE स्कूटर, पाहा खास ऑफर