Mahindra Automotive 2022 : महिंद्रा लॉन्च करणार नव्या लोगो आणि डिझाइनसह XUV300

महिंद्रा लवकरच XUV300चे फेसलिफ्ट मॉडेल बाजारात आणू शकते. मारुती सुझुकी व्हिटारा ब्रेझा (Suzuki Vitara Brezza) आणि टाटा नेक्सॉन (Tata Nexon) या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री करणाऱ्या या वाहनांपैकी काही आहेत.

Mahindra Automotive 2022 : महिंद्रा लॉन्च करणार नव्या लोगो आणि डिझाइनसह XUV300
Mahindra XUV 300
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 3:34 PM

मुंबई : भारतीय बाजारपेठेत सब-4 मीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये प्रचंड स्पर्धा सुरू आहे. प्रत्येक नवीन कारला इथल्या स्पर्धेचा सामना करावा लागतो. मारुती सुझुकी व्हिटारा ब्रेझा (Suzuki Vitara Brezza) आणि टाटा नेक्सॉन (Tata Nexon) या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री करणाऱ्या या वाहनांपैकी काही आहेत. या दोन्ही कारच्या 10,000 युनिट्सची दर महिन्याला सरासरी विक्री होते. आज आम्ही तुम्हाला Mahindra XUV300बद्दल सांगणार आहोत. या कारचे 4-5 हजार युनिट्स दर महिन्याला विकले जातात. भारतीय बाजारपेठेत सर्व स्पर्धक कार नवीन वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञानासह सादर केल्या गेल्या असताना, महिंद्रा लवकरच XUV300चे फेसलिफ्ट मॉडेल बाजारात आणू शकते. 2022 महिंद्रा XUV300ला या सेगमेंटमध्ये टक्कर देणार आहे.

डिझाइनमध्ये बदल फेसलिफ्ट म्हणून छोट्या एसयूव्हीमध्ये फारसे बदल अपेक्षित नाहीत. या एसयूव्हीच्या डिझाइनमध्ये काही मोठे बदल केले जाऊ शकतात. या नवीन डिझाइनमुळे ही कार दिसायला आणखीनच आकर्षक होणार आहे आणि लूकबाबत ग्राहक नेहमीच चोखंदळ असतात. महिंद्रा ऑटोमोटिव्ह 2022च्या पहिल्या तिमाहीत नवीन XUV300 फेसलिफ्ट भारतात लॉन्च करू शकते, असा अंदाज वर्तवला जातोय.

नवीन बंपर नवीन XUV300 फेसलिफ्टच्या रेंडरमध्ये वेगळे डिझाइन ग्रील आणि नवीन बंपर दिसले आहेत. अद्ययावत SUV 17 इंच अॅलॉय व्हील, नवीन हेडलॅम्प आणि टेललॅम्प क्लस्टर व्यतिरिक्त नवीन रंगांसह ऑफर केली जाऊ शकते. याचं श्रेय महिंद्राचे नवीन चीफ डिझाइन ऑफिसर प्रताप बोस यांना जातं. काही काळापूर्वी टाटा मोटर्समधून ते महिंद्रात रुजू झालेत. सध्याची XUV300ची एक्स-शोरूम किंमत 7.96 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 13.36 लाख रुपयांपर्यंत जाते.

6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स सुरक्षेसाठी यात 7 एअरबॅग्ज, कॉर्नर ब्रेकिंग कंट्रोल आणि पार्किंग सेन्सर दोन्ही बाजूस मिळू शकतात. नवीन XUV300 पूर्वीपेक्षा अधिक पॉवरफुल असेल आणि 1.2-लिटर 3-सिलेंडर Amstallion टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह ती मिळणार आहे. हे इंजिन 130 Bhp पॉवर आणि 230 Nm पीक टॉर्क बनवतं आणि कंपनी सहसा या इंजिनसह 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देऊ शकते.

Suzuki Access 125 चं नवीन व्हेरिएंट लाँच, जाणून घ्या स्कूटरचे दमदार फीचर्स आणि किंमत

Skoda Slavia सेडान मार्च 2022 मध्ये बाजारात, जाणून घ्या नव्या कारमध्ये काय असेल खास?

Electric Cycle : Heroनं लॉन्च केली Bluetooth कनेक्टिव्हिटी फिचर असलेली इलेक्ट्रिक सायकल

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.