महिंद्रा कडून Bolero Neo N10 (O) ची किंमत जाहीर, जाणून घ्या टॉप मॉडेलमध्ये काय आहे खास

कंपनीने अखेर Bolero Neo च्या टॉप मॉडेल N10 (O) ग्रेडची किंमत जाहीर केली आहे. या मॉडेलची किंमत 10.69 लाख (एक्स-शोरूम) इतकी असेल.

महिंद्रा कडून Bolero Neo N10 (O) ची किंमत जाहीर, जाणून घ्या टॉप मॉडेलमध्ये काय आहे खास
Mahindra Bolero Neo N10 (o)
Follow us
| Updated on: Aug 22, 2021 | 7:33 AM

मुंबई : महिंद्राने (Mahindra) काही आठवड्यांपूर्वी बोलेरो निओ (Mahindra Bolero Neo) लाँच केली. ही कार काही नवीन डिझाईन्ससह सुधारित TUV300 कारच आहे, ज्यामुळे ही कार रिफ्रेश दिसते, परंतु ही कार अधिक शक्तिशाली ड्राइव्हट्रेनसह येते. MTT (मल्टी-टेरेन टेक्नॉलॉजी) च्या समावेशामुळे ही कार वेगळी दिसते. लॉन्चदरम्यान महिंद्रा बोलेरो निओच्या किंमती जाहीर करण्यात आल्या. तथापि, ब्रँडने MTT सह सुसज्ज टॉप-स्पेक N10 (O) ट्रिमची किंमत आतापर्यंत जाहीर केली नव्हती. (Mahindra finally revealed price of Bolero Neo N10 O, check details)

कंपनीने अखेर Bolero Neo च्या टॉप मॉडेल N10 (O) ग्रेडची किंमत जाहीर केली आहे. या मॉडेलची किंमत 10.69 लाख (एक्स-शोरूम) इतकी असेल. N10 (O) ट्रिम N10 व्हेरिएंटवर आधारित आहे. हे मॉडेल मशीनरीव्हाईज लॉकिंग रियर डिफरेंशियलसह येते, जे एमटीटी किंवा मल्टी-टेरेन टेक्नॉलॉजी म्हणून मार्केटमध्ये ओळखले जाते. N10 आणि N10 (O) ट्रिममध्ये 70,000 रुपयांचा फरक आहे. लॉकिंग रियर डिफरेंशियलसाठी हे खूप जास्त आहे की नाही हे आपण ठरवू शकता. तथापि, हे स्पष्ट आहे की, बोलेरो निओ काही विशेष फीचर पॅकसह येते.

Mahindra Bolero Neo मध्ये काय आहे खास?

Mahindra Bolero Neo ही सब 4 मीटर कार आहे आणि फक्त 2WD (Two-wheel drive) मॉडेल आहे. या कारच्या रंग पर्यायांमध्ये नेपोली ब्लॅक, मॅजेस्टिक सिल्व्हर, हायवे रेड, पर्ल व्हाइट, डायमंड व्हाइट आणि रॉकी बेज यांचा समावेश आहे. बोलेरो निओला सुरुवातीला फक्त एकच ड्राइव्ह्रेन देण्यात येत आहे. टीयूव्ही 300 मध्ये देण्यात आलेली mHawk 3-सिलेंडर मोटर अद्ययावत करून बोलेरो निओमध्ये देण्यात आली आहे. मोटर इंजिन 100 बीएचपी पॉवर आणि 260 एनएम टॉर्क जनरेट करतं. महिंद्रा बोलेरो निओ सध्या 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते, कंपनी आगामी काळात ही कार ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह सादर करु शकते.

बोलेरो ही महिंद्राच्या सर्वात यशस्वी उत्पादनांपैकी एक आहे आणि सर्वात जास्त काळ ही कार त्यांचं ब्रेड अँड बटर उत्पादन राहिली आहे. खरं तर, ही भारतातली आतापर्यंतची सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही आहे. बोलेरो निओसाठी ही नक्कीच एक चांगली सुरुवात आहे, परंतु महिंद्राची प्रमुख चिंता गेल्या काही महिन्यांपासून वाहन क्षेत्रात पुरवठा साखळी समस्येबाबतची आहे. विशेषतः जागतिक बाजारातील सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे उद्योगाच्या संकटात भर पडली आहे.

इतर बातम्या

देशातील 400 शहरांमध्ये OLA 1 लाख इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट सुरु करणार

Simple One इलेक्ट्रिक स्कूटरला अवघ्या 4 दिवसात 30,000 बुकिंग्स, 1947 रुपये देऊन तुम्हीही करु शकता बुक

महाराष्ट्रातल्या रस्त्यांवर Tesla Model 3 चं टेस्टिंग, भारतात लाँचिंग कधी?

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.