Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahindra Bolero Neo ला भारतीयांची पसंती, एका महिन्याहून कमी कालावधीत 5500 बुकिंग्स

महिंद्राने (Mahindra) जुलै महिन्यात बोलेरो निओ (Bolero Neo) ही एसयूव्ही लाँच केली होती. या एसयूव्हीची बुकिंग आधीच सुरु झाली आहे. ही एसयूव्ही लाँच झाल्यापासून तिला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Mahindra Bolero Neo ला भारतीयांची पसंती, एका महिन्याहून कमी कालावधीत 5500 बुकिंग्स
Mahindra Bolero Neo
Follow us
| Updated on: Aug 08, 2021 | 7:05 AM

मुंबई : महिंद्राने (Mahindra) जुलै महिन्यात बोलेरो निओ (Bolero Neo) ही एसयूव्ही लाँच केली होती. या एसयूव्हीची बुकिंग आधीच सुरु झाली आहे. ही एसयूव्ही लाँच झाल्यापासून तिला चांगला प्रतिसाद मिळाला आहे, परिणामी, ग्राहकांनी त्याची जोरदार बुकिंग केली आहे. कंपनीने म्हटले आहे की, एसयूव्ही लाँच झाल्यापासून बोलेरो निओसाठी 5,500 हून अधिक बुकिंग मिळाल्या आहेत. महिंद्रा बोलेरो निओच्या किंमती जाहीर होऊन एक महिन्यापेक्षा कमी कालावधी झाला आहे. (Mahindra get more than 5500 bookings for Bolero Neo in less than month)

बोलेरो निओ चार व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये N4, N8, N10 आणि N10(O) चा समावेश आहे. या कारची किंमत N4 व्हेरिएंटसाठी 8.48 लाख रुपयांपासून सुरू होते, N10 व्हेरिएंटसाठी 9.99 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम इंडिया) जाते. यात एक टॉप स्पेसिफिक N10 (O) ट्रिम पण सादर केलं आहे, परंतु कंपनीने या व्हेरिएंटची किंमत अद्याप सादर केलेली नाही. नवीन मॉडेल प्रभावीपणे महिंद्रा TUV300 ची जागा घेईल

Mahindra Bolero Neo मध्ये काय आहे खास?

Mahindra Bolero Neo ही सब 4 मीटर कार आहे आणि फक्त 2WD (Two-wheel drive) मॉडेल आहे. या कारच्या रंग पर्यायांमध्ये नेपोली ब्लॅक, मॅजेस्टिक सिल्व्हर, हायवे रेड, पर्ल व्हाइट, डायमंड व्हाइट आणि रॉकी बेज यांचा समावेश आहे. बोलेरो निओला सुरुवातीला फक्त एकच ड्राइव्ह्रेन देण्यात येत आहे. टीयूव्ही 300 मध्ये देण्यात आलेली mHawk 3-सिलेंडर मोटर अद्ययावत करून बोलेरो निओमध्ये देण्यात आली आहे. मोटर इंजिन 100 बीएचपी पॉवर आणि 260 एनएम टॉर्क जनरेट करतं. महिंद्रा बोलेरो निओ सध्या 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते, कंपनी आगामी काळात ही कार ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह सादर करु शकते.

बोलेरो ही महिंद्राच्या सर्वात यशस्वी उत्पादनांपैकी एक आहे आणि सर्वात जास्त काळ ही कार त्यांचं ब्रेड अँड बटर उत्पादन राहिली आहे. खरं तर, ही भारतातली आतापर्यंतची सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही आहे. बोलेरो निओसाठी ही नक्कीच एक चांगली सुरुवात आहे, परंतु महिंद्राची प्रमुख चिंता गेल्या काही महिन्यांपासून वाहन क्षेत्रात पुरवठा साखळी समस्येबाबतची आहे. विशेषतः जागतिक बाजारातील सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे उद्योगाच्या संकटात भर पडली आहे.

इतर बातम्या

गडकरींच्या ‘सिक्सर’वर कार कंपन्या काय करणार? एअरबॅगनं तुमची कार, ड्रायव्हिंग किती बदलणार?

पेट्रोलसाठी खिसा होणार नाही रिकामा, तगड्या मायलेजसह ‘या’ बाईकवर भन्नाट ऑफर

ह्युंदाय आतापर्यंतची सर्वात छोटी एसयूव्ही लाँच करणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Mahindra get more than 5500 bookings for Bolero Neo in less than month)

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.