महिंद्रा अँड महिंद्रा इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात 3,000 कोटींची गुंतवणूक करणार, 2025 पर्यंत 5 लाख इलेक्ट्रिक वाहनांची करणार विक्री

कंपनीने 2025 पर्यंत भारतीय रस्त्यावर 5 लाख इलेक्ट्रिक वाहने सुरु करण्याचे लक्ष्य ठेवले आहे आणि भारतात ईव्ही व्यवसायात 1,700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. (Mahindra & Mahindra to invest Rs 3,000 crore in electric vehicle business, sell 5 lakh electric vehicles by 2025)

महिंद्रा अँड महिंद्रा इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात 3,000 कोटींची गुंतवणूक करणार, 2025 पर्यंत 5 लाख इलेक्ट्रिक वाहनांची करणार विक्री
महिंद्रा अँड महिंद्रा इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात 3,000 कोटींची गुंतवणूक करणार
Follow us
| Updated on: Apr 11, 2021 | 10:00 PM

नवी दिल्ली : येणारा काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा असून सर्व वाहन निर्माता कंपन्या आता इलेक्ट्रिक वाहन निर्मितीवर भर देत आहेत. देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा येत्या तीन वर्षांत इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात 3000 कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक करणार आहे. तसेच या क्षेत्रात अधिकाधिक सहभाग घेण्याबाबत कंपनी विचार करत असल्याचे कंपनीच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले. महिंद्रा अँड महिंद्रा जागतिक स्तरावर आपल्या क्षमतेचा वापर करुन ईव्ही प्लॅटफॉर्मच्या विकासावर जोमाने काम करीत आहेत. महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिष शहा म्हणाले, आम्ही इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहोत. आम्ही पूर्वी जे बोललो होतो त्याव्यतिरिक्त ही गुंतवणूक असेल. (Mahindra & Mahindra to invest Rs 3,000 crore in electric vehicle business, sell 5 lakh electric vehicles by 2025)

येत्या पाच वर्षात वाहन आणि कृषी क्षेत्रात 9000 कोटी गुंतवणार

येत्या पाच वर्षांत वाहन आणि कृषी क्षेत्रात 9,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे महिंद्रा अँड महिंद्रा यांनी आधी सांगितले होते. कंपनीने 2025 पर्यंत भारतीय रस्त्यावर 5 लाख इलेक्ट्रिक वाहने सुरु करण्याचे लक्ष्य ठेवले आहे आणि भारतात ईव्ही व्यवसायात 1,700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याशिवाय नवीन संशोधन आणि विकास केंद्रात (आर अँड डी) 500 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. महिंद्रा अँड महिंद्राने यापूर्वीच बेंगळुरूमध्ये इलेक्ट्रिक तंत्रज्ञानाचा प्रकल्प सुरू केला आहे. हे बॅटरी पॅक, उर्जा इलेक्ट्रॉनिक्स आणि मोटर्स तयार करते. याशिवाय महाराष्ट्रात पुण्याजवळील चाकण प्लांटमध्ये नवीन मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करण्यासाठीही कंपनीने गुंतवणूक केली आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा आणि इस्रायली कंपनी आरईई यांच्यात करार

अलीकडेच व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जबाबदारी संभाळणारे शाह म्हणाले की गुंतवणूकीची रक्कम नव्या प्लॅटफॉर्म व इतर संबंधित कामांच्या विकासासाठी वापरली जाईल. प्लॅटफॉर्मद्वारे समूहाच्या वेगवेगळ्या क्षमतांचा वापर करून विविध मॉडेल्स तयार केले जातील. याशिवाय ते म्हणाले की कंपनी इलेक्ट्रिक वाहनांच्या भागीदारीवरही विचार करेल. येणारा काळ हा ईलेक्ट्रीक वाहनांचा आहे. शाह म्हणाले, आम्ही इस्रायली कंपनी आरईई (ऑटोमोटिव्ह) सह सामंजस्य करार केल्याची घोषणा केली आहे. हे लहान ट्रक आणि व्यावसायिक वाहनांसाठी आहे. आणि आमच्याही ईव्ही क्षेत्रात इतर भागीदारी असतील. म्हणजे आम्ही युतीसाठी तयार आहोत. (Mahindra & Mahindra to invest Rs 3,000 crore in electric vehicle business, sell 5 lakh electric vehicles by 2025)

इतर बातम्या

दमदार पावरसह सुझुकी हयाबुसा पुन्हा एकदा बाजारात, लॉन्च होण्यापूर्वी कंपनीच्या वेबसाइटवर लिस्टेड

शानदार लुक, 5 स्टार सेफ्टी रेटिंग, Tata च्या ‘या’ कारला भारतीय ग्राहकांची पसंती

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.