AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाद करा पण आमचा कुठं! Mahindra Thar ची चक्क शोरुममध्येच टेस्ट ड्राईव्ह, अखेर मदतीसाठी JCB मागवला

महिंद्रा थार (Mahindra Thar) ही एसयूव्ही अनेकांची ड्रीम कार आहे. तुम्ही ही ऑफ-रोडर एसयूव्ही खरेदी केल्यास तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. शोरूममध्ये जाऊन महिंद्रा थारची डिलिव्हरी घेणे हा खूप आनंददायी अनुभव आहे, पण कधी कधी अतिउत्साहामुळे तो खराब होतो.

नाद करा पण आमचा कुठं! Mahindra Thar ची चक्क शोरुममध्येच टेस्ट ड्राईव्ह, अखेर मदतीसाठी JCB मागवला
Mahindra Thar (Photo : Twitter @dpkBopanna)
Follow us
| Updated on: Jan 21, 2022 | 3:13 PM

नवी दिल्ली : महिंद्रा थार (Mahindra Thar) ही एसयूव्ही अनेकांची ड्रीम कार आहे. तुम्ही ही ऑफ-रोडर एसयूव्ही खरेदी केल्यास तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. शोरूममध्ये जाऊन महिंद्रा थारची डिलिव्हरी घेणे हा खूप आनंददायी अनुभव आहे, पण कधी कधी अतिउत्साहामुळे तो खराब होतो. असाच काहीसा प्रकार एका ग्राहकासोबत घडला, ज्याने महिंद्र थारची डिलिव्हरी घेतली आणि शोरूममध्येच त्याची ऑफ-रोडिंग टेस्ट (Mahindra Thar Test drive) घेतली. खरं तर, बंगळुरूमधला हा ग्राहक बहुधा कारच्या ड्रायव्हर सीटवर बसून शोरूममधून कार बाहेर काढत होता, तेव्हा ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले आणि कार शोरूमच्या ग्रीलला धडकली.

या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. ही चूक ड्रायव्हरची होती की शोरूमची, त्याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही, मात्र ड्रायव्हर सीटवर बसल्याचे फोटोत स्पष्ट दिसत आहे. गंमत म्हणजे या अपघातात नवीन महिंद्रा थारचे फारसे नुकसान झाले नसून या रेलिंगमुळे ग्राहकाचे मोठे नुकसान होण्यापासून वाचले आहे. शोरूमची काच फोडून ही एसयूव्ही रेलिंगला धडकली आणि तिची पुढची चाके हवेत होती, मात्र कारचा मागचा भाग तिथेच अडकला आणि थार पुढे सरकली नाही.

ब्रेक आणि अॅक्सलरेटमध्ये चालक गोंधळला?

अपघाताबाबत नेमकी माहिती नसल्यामुळे, वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत, त्यापैकी सर्वात खात्रीशीर माहिती म्हणजे हे महिंद्रा थारचे AMT व्हेरिएंट होते आणि चालकाने त्याच्या ब्रेक आणि अॅक्सलरेटरमध्ये गोंधळ केला असावा. या दुर्घटनेनंतर अडकलेली थार जेसीबीच्या मदतीने योग्य स्थितीत आणण्यात आली. काही वेळाने ही ऑफ रोडर पुन्हा शोरूममध्ये पाहायला मिळाली.

व्हिडीओ पाहा

दरम्यान, तुम्ही ही बाब लक्षात ठेवा की जेव्हा कधी तुम्ही नवीन कार खरेदी कराल आणि तिची डिलिव्हरी घेण्यासाठी शोरुममध्ये जाल तेव्हा तुम्हाला ड्रायव्हिंगचा कमी अनुभव असल्यास तिथेच टेस्ट ड्राईव्ह घेऊ नका, त्याऐवजी एखाद्या अनुभवी ड्रायव्हरला सोबत न्या.

इतर बातम्या

शानदार ऑफर! 4.30 लाखांची Datsun कार 2.75 लाखात खरेदीची संधी

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहक त्रस्त, Tata Motors उद्या दोन नवीन CNG कार लाँच करणार

धमाकेदार ऑफर! Maruti Alto अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, कार आवडली नाही तर पैसे परत

(Mahindra Thar Test drive gone wrong, Customer drives it through showroom’s glass wall)

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.