वायू प्रदूषण टाळण्यासाठी सरकारने कंबर कसली; सुधारित इलेक्ट्रिक वाहन धोरणाचा मसूदा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढून प्रदूषण कमी व्हावे यासाठी सुधारित धोरण निश्चित करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेत.

वायू प्रदूषण टाळण्यासाठी सरकारने कंबर कसली; सुधारित इलेक्ट्रिक वाहन धोरणाचा मसूदा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Uddhav Thackeray
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 7:42 PM

मुंबई : वाहनांमुळे होणारे हवेचे प्रदुषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicles) वापराला गती देणे गरजेचे आहे. यासाठीचे सर्वंकष सुधारित धोरण निश्चित करावे व लवकरात लवकर ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिल्या आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी यासंबंधीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. (make a revised policy to reduce air pollution by increasing the use of electric vehicles, CM Uddhav Thackeray orders transport department)

या आढावा बैठकीस परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोड यांच्यासह परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव तसेच सुधारित धोरण निश्चितीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष आशिषकुमार सिंह, उद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव बलदेव सिंह, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भुषण गगराणी, प्रधान सचिव महेश पाठक, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड,  महाराष्ट्र नियंत्रण मंडळाचे चेअरमन सुधीर श्रीवास्तव आणि इतर मान्यवर उपस्थित होते

बैठकीवेळी मुख्यमंत्री म्हणाले की, सुधारित धोरण निश्चित करतांना शहरी- ग्रामीण भागात या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल, याचा साकल्याने विचार करावा. या वाहनांना लागणारे चार्जिंग स्टेशन्स कुठे आणि कशा पद्धतीने उभारणे आवश्यक आहे, त्यासाठी कोणत्या पायाभूत सुविधा लागणार आहेत, याचा आराखडा तयार करावा.

धोरणात मागणी आणि पुरवठादार यांना द्यावयाची प्रोत्साहने, या क्षेत्रातील गुंतवणूक, शासनात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अधिकाधिक वाढवण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून हे धोरण निश्चित केले जावे. सार्वजनिक वाहतूकीसाठी इलेक्ट्रिक वाहनांना कशा पद्धतीने प्रोत्साहन देता येईल याचाही समितीने विचार करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

मंत्री आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले की, नागरी भागात गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये चार्जिंग स्टेशन्सची उभारणी करण्यासंबधित विचार व्हावा, शासकीय पातळीवर इलेक्ट्रिक वाहन खरेदी करताना सध्या वाहन खरेदीसाठी असलेल्या आर्थिक तरतूदीची मर्यादा लक्षात घेऊन त्यात बदल करणे आवश्यक राहील याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

इलेक्ट्रिक वाहन सुधारित धोरण निश्चित करण्यासाठी पर्यावरण विभागाने अतिरिक्त मुख्य सचिव परिवहन विभाग यांच्या अध्यक्षतेखाली 22 डिसेंबर 2020 ला समितीचे गठन केले आहे. ही समिती सर्व संबंधित विभागांशी चर्चा करून यासंबंधीचा मसूदा तयार करत आहे.

संबंधित बातम्या

Kia च्या इलेक्ट्रिक कारचा बाजारात धुमाकूळ, अवघ्या काही तासांत सर्व युनिट्सची विक्री, 5 मिनिटांच्या चार्जिंगवर 112KM रेंज

एकदा चार्ज केल्यावर 452KM धावणार, 1.5 लाखांच्या डिस्काऊंटसह ‘ही’ इलेक्ट्रिक कार विक्रीस उपलब्ध

अवघ्या 10 हजारात बुक करा किफायतशीर इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जवर 200km धावणार

(make a revised policy to reduce air pollution by increasing the use of electric vehicles, CM Uddhav Thackeray orders transport department)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.