Special Story | 2021 हे वर्ष एसयूव्हींचं, अनेक आघाडीच्या कंपन्या SUV लाँचिंगचा धडाका लावणार

देशातील आघाडीच्या कार निर्मिती करणाऱ्या कंपन्या 2021 मध्ये एसयूव्ही कार्स लाँच करण्याचा धडाकाच लावणार आहेत.

Special Story | 2021 हे वर्ष एसयूव्हींचं, अनेक आघाडीच्या कंपन्या SUV लाँचिंगचा धडाका लावणार
Follow us
| Updated on: Jan 03, 2021 | 1:01 PM

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून भारतात एसयूव्हींना जबरदस्त मागणी वाढली आहे. त्यामुळे अनेक कार कंपन्यांनी भारतात 2020 मध्ये बऱ्याच एसयूव्ही आणि कॉम्पॅक्ट एसयूव्ही लाँच केल्या. देशातील आघाडीच्या कार निर्मिती करणाऱ्या कंपन्या 2021 मध्ये एसयूव्ही कार्स लाँच करण्याचा धडाकाच लावणार आहेत. भारतात SUV सेगमेंटमध्ये सध्या ह्युंदाय आणि किआ मोटर्स या दोन कंपन्यांची स्थिती मजबूत आहे. या कंपन्यांना मारुती, महिंद्रा, टाटा या भारतीय कंपन्या टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. तसेच निसान, जीप आणि रेनॉ भारतात नव्या एसयूव्ही लाँच करु शकतात. (Many indian and foreign brands will launc SUV’s in India in 2021)

मारुती आणि महिंद्रा आघाडीवर

सध्या भारतासह जगभरात एसयूव्हीला मागणी वाढत आहे. मजबुती आणि रुबाबदार लुक्समुळे लोक एसयूव्हीकडे आकर्षित होत आहेत. गेल्या वर्षी ज्या नव्या कार लाँच करण्यात आल्या, त्यापैकी अर्ध्याहून अधिक कार या एसयूव्ही होत्या. या कार्सना मोठी मागणी आहे. त्यामुळे सर्व कंपन्या आगामी काळात नवनव्या एसयूव्ही लाँच करण्याचा मार्गावर आहेत. मार्केटची परिस्थिती पाहून मारुती आणि महिंद्रा या कंपन्यांनीनेदेखील नव्या एसयूव्ही कार्सची निर्मिती करण्यासाठी कंबर कसली आहे. या कंपन्या आगामी काळात प्रत्येकी पाच नव्या एसयूव्ही लाँच करणार आहेत.

महिंद्रा लाँच करणार पाच एसयूव्ही कार

भारतीय बाजारपेठेतील महिंद्रा या आघाडीच्या वाहन निर्मिती करणाऱ्या कंपनीने काही महिन्यांपूर्वी महिंद्रा थार 2020 ही SUV लाँच केली होती. महिंद्रा थारला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्यानं कंपनी आणखी SUV लाँच करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये New XUV500, New Scorpio, XUV300 electric, KUV 100 Electric, TUV300 आणि TUV300 Plus या मॉडेल्सचा समावेश असेल. या एसयूव्हीमध्ये मध्यम ते उच्च किमतींच्या रेंजमधील एसयूव्ही उपलब्ध असतील. महिंद्राकडून यासोबत दोन इलेक्ट्रीक बाईक लाँच केल्या जाणार आहेत.

मारुती सुझुकीसुद्धा पाच एसयूव्ही लाँच करण्याची शक्यता

मारुती सुझुकी इंडियाने (Maruti Suzuki India) आगामी काळात नवीन स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल (SUV) मॉडेल लाँच करण्याची तयारी केली आहे. कंपनी त्यांच्या इतर प्रोडक्ट्सपासून एसयूव्ही सेगमेंट वेगळं करणार आहे. मारुती सुझुकी कंपनी कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंट मध्ये 3 नवीन मॉडल लाँच करणार आहे. कंपनी नवीन विटारा ब्रेजा लाँच करणार आहे. तसेच एक मिड साईज एसयूव्हीसुद्धा लाँच केली जाणार आहे. ही नवी कार ह्युंदाई क्रेटा आणि किया सोनेटला टक्कर देईल. टाटा नेक्सॉनला टक्कर देण्यासाठी एक मॉडेल बनवलं जात असून ती कार 2022 मध्ये लाँच केली जाणार आहे. ही क्रॉसओवर कार बलेनो प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. तसेच कंपनी मारुती सुझुकी जिम्नी भारतात लाँच करु शकते. काही दिवसांपूर्वी याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यात म्हटलं होतं की, कंपनी 5 डोर जिम्नी भारतात लाँच करू शकते.

जानेवारीमध्ये TATA लॉन्च करणार दोन जबरदस्त कार्स

या महिन्यात टाटा मोटर्स दोन नव्या कार सादर करणार आहे. त्यापैकी एक कार ही एसयूव्ही असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टाटा मोटर्सकडून 13 जानेवारीला आकर्षक अशी अल्ट्रोज कार लॉन्च करणार आहेत. यावर्षी कंपनी Tata Altroz EV सुद्धा लॉन्च करणार आहे. इतकंच नाही तर टाटा मोटर्स सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही (SUV) सेगमेंटमध्ये एचबीएक्स (HBX) सुद्धा बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. खरंतर, टाटाने 2019 च्या जिनिव्हा मोटर शोमध्ये ही मायक्रो एसयूव्ही सादर केली होती. ही कार Mahindra KUV100 NXT आणि Maruti Suzuki Ignis यांना जोरदार स्पर्धा देणार असल्याचं बोललं जात आहे.

एसयूव्ही (SUV) कार आवडणाऱ्या कार प्रेमींना टाटाची नवीन ग्रॅविटास नक्की आवडेल. ही एसयूव्ही टाटा मोटर्सच्या 7 सीटर हॅरियरचं अपकमिंग व्हर्जन आहे. नवीन एसयूव्ही ग्रॅविटास 2.0 Kryotec इंजिनसह देण्यात येणार आहे. इतंकच नाही तर 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन, 6 स्पीड AT यामध्ये देण्यात येणार आहे. यामध्ये चाकांचा आकारही मोठा देण्यात आला आहे. या एसयूव्हीची किंमत 18 लाख ते 24 लाखांदरम्यान असू शकते. ही कार हॅरियरच्या ओमेगा प्लॅटफॉर्मवर तयार केली जाणार आहे.

Renault ची ‘ही’ कार ठरणार सर्वात स्वस्त एसयूव्ही?

देखभालीसाठी कमी खर्च आणि उत्तम ड्रायव्हिंग एक्सपिरीयन्सच्या अनुभवासाठी सध्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची सुविधा असणाऱ्या कारची मागणी सध्या वाढली आहे. ग्राहकांचा वाढता कल लक्षात घेता अनेक कंपन्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची सुविधा असणाऱ्या कारचे उत्पादन करत आहेत. जगप्रसिद्ध असेलेली फ्रान्सची Renault कंपनीसुद्धा किगर (Kiger) नावाची नवी कार बाजारात आणत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार एसयूव्हीची सुविधा असणारी ही आतापर्यंतची सर्वांत स्वस्त कार असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारची किंमत 5.50 लाख आहे. याआधी Nissan Magnite या कंपनीची एसयूव्ही असणारी कार नुकतीच लॉन्च झाली होती. या करची किंमत 4.99 लाख रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार 1 जानेवारी 2021 पासून या करची किंमत वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे Renault तयार करत असलेली Kiger या कारची किंमत सर्वात कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

MG Hector Plus 7 Seater ची प्रतीक्षा संपणार

एमजी मोटर इंडियाने (MG Motor India) नुकतीच घोषणा केली आहे की, हेक्टर प्लसची 7 Seater एडिशन 2021 च्या जानेवारी महिन्यात लाँच केली जाणार आहे. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला हेक्टर प्लस सहा सीटर असलेल्या लेआऊटमध्ये कॅप्टन सीट्ससह सादर करण्यात आली होती. एमजीने त्यांची पहिली कार हेक्टर भारतीय बाजारात 2019 मध्ये लाँच केली होती. कंपनी आता या मध्यम आकाराच्या लोकप्रिय एसयूव्हीला अपडेट करणार आहे. मिड साइज एसयूव्ही एमजी हेक्टरला सध्या भारतीय बाजारात चांगली पसंती मिळत आहे. MG Motor India ही प्रसिद्ध कार 7 सीटर व्हेरियंटसह (MG Hector Plus 7 Seater) जानेवारी 2021 मध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे. सध्या भारतात MG च्या MG Hector, MG ZS EV, MG Hector Plus 6 Seater आणि MG Gloster या कार उपलब्ध आहेत.

Jeep ची बहुप्रतिक्षित एसयूव्ही 7 जानेवारीला लाँच होणार

जीप कंपनी (Jeep) जीप कंपास फेसलिफ्ट (Jeep Compass facelift) ही एसयूव्ही 7 जानेवारी 2021 ला लाँच करणार आहे. कंपास फेसलिफ्टच्या इंटरनॅशनल डेब्यूनंतर अवघ्या काहीच दिवसात ही शानदार कार लाँच केली जात आहे. या गाडीच्या डिझाईनने अनेकांना भुरळ घातली आहे. डिझाईनसह शानदार इंटिरियर आणि एक्सटिरियरमुळे अनेकजण या कारच्या लाँचिंगची वाट पाहात आहेत.

हेही वाचा

मोठा वेटिंग पिरियड, तरिही डिसेंबरमध्ये Thar च्या 6500 युनिट्सचं बुकिंग; या कारमध्ये काय आहे खास?

2021 मध्ये येणार जबरदस्त इलेक्ट्रिक कार, एकदाच चार्ज करून 500 किमी धावणार

(Many indian and foreign brands will launc SUV’s in India in 2021)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.