Maruti: 35 किलोमीटरचा मायलेज देतेयं मारुतीची ही कार, किंमतही एकदम ओक्के आहे!
ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या या कारचे आता नावे व्हेरियंट लॉन्च झाले आहे. नवीन व्हेरियंट लॉन्च होताच ग्राहकांची मागणी आणखी वाढली आहे.
मारुती सुझुकी (Maruti Suzuki Celerio) सेलेरियोच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. ऑगस्ट 2022 मध्ये, त्याची विक्री वार्षिक आधारावर 1094% वाढल्याचे समोर आले. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सेलेरियोच्या एकूण 53 युनिट्सची विक्री झाली होती, तर ऑगस्ट 2022 मध्ये त्याची विक्री 5,852 युनिट्सवर पोहोचली होती. ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या या कारचे आता नावे व्हेरियंट लॉन्च झाले आहे. नवीन व्हेरियंट लॉन्च होताच ग्राहकांची मागणी आणखी वाढली आहे. विक्री युनिट्सच्या बाबतीत, ते ऑगस्ट 2022 मध्ये टॉप-25 यादीत 23 व्या स्थानावर आहे.
CNG वर सर्वाधिक मायलेज देणारी कार
सध्या, कंपनी Celerio चे पेट्रोल आणि CNG दोन्ही मॉडेल्स विकत आहे. देशातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या कारपैकी ही एक आहे. मारुती सुझुकीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, Celerio CNG चा मायलेज 35.60 km/kg CNG आहे. मारुतीच्या अल्टोपेक्षा हा जास्त मायलेज आहे. CNG अल्टोचा मायलेज 31.59 kmpl आहे. सेलेरियोचा मायलेज पेट्रोलवरही चांगले आहे.
किंमत 5.25 लाख रुपयांपासून सुरू
Celerio पेट्रोल प्रति लिटर 24.97km ते 26.68km पर्यंत मायलेज देऊ शकते असा कंपनीचा दावा आहे. Maruti Suzuki Celerio CNG ची किंमत 6.69 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. मात्र, पेट्रोल व्हेरियंटची सुरुवातीची किंमत कमी आहे. त्याच्या बेस व्हेरिएंटची किंमत 5.25 लाख रुपये आहे, तर टॉप व्हेरिएंटची किंमत 7 लाख रुपये आहे. सेलेरियोमध्ये 1.0-लिटर पेट्रोल इंजिनसह CNG पर्याय उपलब्ध आहे.
वैशिष्ट्ये
पेट्रोल व्हर्जनमध्ये 5-स्पीड मॅन्युअल (स्टँडर्ड) आणि 5-स्पीड AMT ऑफर केले जाते, तर CNG व्हेरियंटला फक्त 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळते. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, यात अँड्रॉइड ऑटो/ऍपल कारप्ले सपोर्टसह 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण यांसारखी सर्व वैशिष्ट्ये मिळतात. यात पॅसिव्ह कीलेस एंट्री, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS आणि हिल-होल्ड असिस्ट देखील मिळतात.