Maruti Eeco ने विक्रीत गाठला 10 लाखांचा टप्पा, या गाडीला इतकी मागणी का? जाणून घ्या
मारुती इकोनं विक्रीत 10 लाखांचा टप्पा गाठला आहे. कंपनीने ही गाडी 2010 मध्ये लाँच केली होती. कंपनीने मते, या सेगमेंटमध्ये इकोचं मार्केट शेअर 94 टक्के इतका आहे.सध्या मारुति सुझुकी इको ही गाडी 13 वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.
मुंबई : भारतात मारुती सुझुकीच्या गाड्यांना मोठी मागणी आहे. टॉप 10 कार विक्रीची दर महिन्यांची आकडेवारी पाहिली की याबाबतचा अंदाज येतो.मारुती कंपनीच्या इको गाडीनं आणखी मैलाचा दगड पार केला आहे. मारुती इकोनं विक्रीत 10 लाखांचा टप्पा गाठला आहे. कंपनीने ही गाडी 2010 मध्ये लाँच केली होती. कंपनीने मते, या सेगमेंटमध्ये इकोचं मार्केट शेअर 94 टक्के इतका आहे.सध्या मारुति सुझुकी इको ही गाडी 13 वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये पाच सीटर, सात सीटर, कार्गो आणि रुग्णवाहिकेचा समावेश आहे.मारुति सुझुकी इंडिया लिमिटेडचे मार्केटिंग विभागाचे वरिष्ठ अधिकारी शशांक श्रीवास्तव यांनी सांगितलं की, “व्हॅन सेगमेंटमध्ये या गाडीचा 94 टक्क्यांपेक्षा जास्त शेअर आहे. ग्राहकांची गरज गेल्या काही वर्षात या गाडीनं पूर्ण केली आहे. म्हणूनच इतकी मागणी आहे. त्यामुळे आज या गाडीनं 10 लाख विक्रीचा टप्पा गाठला आहे.’
मारुती इको गाडीनं पहिल्या पाच लाख विक्रीचा टप्पा गाडी लाँच झाल्यानंतर 8 वर्षांनी गाठला होता. त्यानंतर अवघ्या पाच वर्षात कंपनीने 5 लाखांचा टप्पा गाठला. यावरूनच या गाडीची मागणी गेल्या काही दिवसात वाढली आहे, असंच म्हणावं लागेल. या गाडीची गुणवत्ता, विश्वासनीयता यावरून दिसून येते. “आमच्या प्रेम करणाऱ्या सर्व ग्राहकांचे आम्ही आभार मानतो. त्यांनी आमच्या गाडीला पसंती दिली. देशात या गाडीची विक्री सर्वाधिक आहे.”, असं मारुति सुझुकी इंडिया लिमिटेडचे मार्केटिंग विभागाचे वरिष्ठ अधिकारी शशांक श्रीवास्तव यांनी सांगितलं.
इको गाडीला पसंती का?
मारुती इको गाडीमध्ये चांगली बूटस्पेस आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या ग्राहकांनी या गाडीला सर्वाधिक पसंती दिली आहे. खासगी आणि टूरिस्ट व्यवसाय करणाऱ्यांची या गाडीला पसंती आहे. इको मल्टी पर्पज व्हॅनमध्ये 1.2 लिटर अॅडव्हान्स के सीरिज ड्युअल जेट, ड्युअल व्हीव्हीटी इंजिन आहे.या कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी व्हेरियंट देखील उपलब्ध आहे. या गाडीचं इंजिन 80.76 पीएस पीक पॉवर 6000 आरपीएम पेट्रोल आणि 71.65 पीएस पॉवर 6000 आरपीएमवर सीएनजी व्हेरियंटवर जनरेट करते. इकोची पेट्रोल गाडी एक लिटर पेट्रोलवर 20.20 चा मायलेज देते, असा कंपनीचा दावा आहे.तर सीएनजी मॉडेल एक किलो सीएनजीवर 27.05 किमी धावते.
जानेवारी 2023 मध्ये गाडीची मागणी
मारुती इको जानेवारी 2023 या महिन्यात टॉप टेनमध्ये होती. मारुतिची इको ही गाडी या यादीत आठव्या स्थानावर असून कंपनीची सहावी गाडी आहे. या गाडीचं मार्केटमधील स्थिती गेल्या काही वर्षांपासून जैसे थेच आहे असंच म्हणावं लागेल. जानेवारी 2023 मध्ये कंपनीने 11709 युनिट्सची विक्री केली आहे.